1
उध्दवरावांची राजकीय आत्महत्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात रहस्यमय घडामोडी घडल्या. 20 नोव्हेंबर ला दिल्लीत पवार आणि मोदी यांच्यात भेट झाली, त्यात काय चर्चा झाली असेल, हेच सगळ्यात मोठं रहस्य आहे. पण त्या भेटीनंतर राज्यात वेगाने घडामोडी घडल्या.

2
पवारांनीच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव सूचित केले आणि 22 नोव्हेंबर ला त्यांनीच ते जाहीर केले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं होतं पण उध्दवरावांना मुख्यमंत्री व्हायचं होतं का? कारण शिवसेनेने त्यांचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले होते.

3
राष्ट्रपती राजवट लागण्यापूर्वी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांनाच निमंत्रित केले होते. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी लवकर होकार मिळावा म्हणून पवारांनी 23 नोव्हेंबर ला भल्या सकाळी एक भूकंप घडवला का?

4
भाजपचे शीर्ष नेतृत्व अजिबात मूर्ख नाही, की फक्त अजित दादांचे पत्र पाहिलं आणि राष्ट्रपती राजवट उठवून शपथविधी केला.
फडणवीस आणि अजित दादांचा शपथविधी हा पवारांनी शिवसेनेला चलबिचल करण्यासाठी घडवला का?

5
कारण, सत्तेत काँग्रेस - राष्ट्रवादी ला सुद्धा यायचं होतं विशेष करून राष्ट्रवादीला! पण शिवसेनेने युती मोडली तेव्हा सत्ता मिळाली असं चित्र झालं असतं तर शिवसेनेचा सत्तेत वरचष्मा राहिला असता. हा धडाकेबाज शपथविधी करून पवारांनी शिवसेनेलाच गोंधळात टाकले आणि मजबूर केले का?

6
त्यानंतर शिवसेनेला राष्ट्रवादीची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागणार होती अन्यथा भाजप व राष्ट्रवादी यांचं सरकार होतंच. जी शिवसेना भाजप सोबत कठोरपणे वागत होती त्या शिवसेनेला ह्या एका शपथविधीने लाचार केलं.

7
मुख्यमंत्री पद वगळता शिवसेनेला ह्या सत्तेतून काय मिळालं? सगळी महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे! महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर काँग्रेस व राष्ट्रवादी मौन ठेवून बसलेत पण बदनामी शिवसेनेची होतेय.

8
आता अशी परिस्थिती आली आहे की शिवसेनेला पळता पण येणार नाही. हात झटकायला हे जोशी सरकार अथवा राणे सरकार नाही तर आता हे ठाकरे सरकार आहे. शिवसेनेचे शीर्ष नेतृत्वच मुख्यमंत्री असल्याने खापर कोणावर फोडणार? अशी विचित्र कोंडी झाली आहे.

9
सुडबुद्धी माणसाची मती मारते. मुख्यमंत्री पदाची हाव इतकी होती की पुढे काय परिणाम होणार ह्याचा विचार पण केला गेला नाही. आज सामान्य माणूस ज्याला राजकारणात काहीही रस नाही तो ही ह्या सरकार वर नाराज आहे. स्वतः आततायीपणा करून खड्यात पडल्यावर आता इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही.

10
ह्या सगळ्यात भाजप काय करतेय? भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने तेव्हा सत्ता स्थापन व्हावी म्हणून शिवसेनेसोबत चर्चा का नाही केली? जर कोणी स्वतःहून खड्यात पडत असेल तर भाजप त्याला का अडवेल? हे राजकारण आहे, हरिभजन नाही. भाजपने चंद्रबाबूंना अडवलं नाही, आज त्यांची काय स्थिती आहे?

11
प्रतिस्पर्धीची विश्वसनीयता संपवणे ही सुद्धा एक राजनीती आहे. काँग्रेस तशी पण संपल्यात जमा आहे. शिवसेनेची विश्वसनीयता त्यांच्या कर्माने त्यांनी गमावली. ह्यापुढे महाराष्ट्रात लढाई भाजपसाठी एकतर्फी होणार आणि त्यासाठी पवार व उद्धव ठाकरे यांनी मोलाचा हातभार लावला.