#THREAD :बिहार, #Arnab आणि सेना!

गेले काही दिवस लिबरल लोकांसाठी एका भयानक स्वप्नासारखे जात आहेत.बायडेन च्या विजयाचा आनंद साजरा करता करता भारतात अगदी पोट निवडणुकींपासून ते राज्याच्या निवडणुकीपर्यंत सगळीकडे भाजपचा ध्वज बघून अनेकांना बौद्धिक "मूळव्याध" झाली असेल हे निश्चित!

(1/16)
पण काल अर्णब च्या सुटकेनंतर तर काय अवस्था झाली असेल परमेश्वरालाच माहिती. पण या सगळ्यात धग सोसावी लागत आहे ते शिवसेनेला.बिहार निवडणुकीच्या आधी मराठी अस्मितेसारखीच आम्ही बिहार मध्ये 'बिहारी अस्मिता' जपण्यासाठी म्हणून आमचे उमेदवार उभे करत आहोत असं एक सैनिक मला म्हंटला,
(2/16)
तेव्हा मला त्या वाक्यावर हसावं कि प्रतिक्रिया द्यावी हे समजलं नाही,पण काहीही न बोलता निघून गेलो. त्याच सैनिकाने 'एक्झिट पोल' पाहून त्याच्या ट्विटर टाइमलाईन वर वाट्टेल त्या गोष्टी टाकल्या होत्या,फटाके फोडायला तयार राहा वगैरे ट्विट्स सुद्धा होते.
(3/16)
पण निकाल आल्यावर झालं काहीतरी वेगळंच.२१ ठिकाणी उभ्या असलेल्या शिवसैनिकांना नोटा पेक्षा सुद्धा कमी वोट मिळाले आणि शिवसेना खर्यार्थाने राष्ट्रीय पटलावर स्वतःची छाप निर्माण करणार याची हमी झाली.स्वतःचा झालेला दारुण पराभव असून सुद्धा सैनिक
(4/16)
पक्षाची चूक मान्य करण्याऐवजी महाराष्ट्र भाजप चे १०५ आमदार आम्ही घरी कसे बसवले हेच सांगण्यात व्यस्त दिसले. म्हणजे उद्या कुठेही हरले तरी हेच उदाहरण देतील हे निश्चित झालं, कारण बाळासाहेबांची कारकीर्द सोडली तर सेने कडे सांगायला हाच काय तो दुसरा प्रसंग.
(5/16)
त्या नंतर नेहमी प्रमाणे स्वतःच्या अगदी संयमित,सुशील,सुसभ्य शब्दात वक्तव्य करायला पुढे आले सामना चे संपादक आणि सेनेचे अत्यंत हुशार नेते संजय राऊत.बिहार निवडणुकीत 'राजद' ने त्यांच्या विजयाचे श्रेय 'सेनेला' द्यावे असे सांगून सेनेला राष्ट्रीय पटलावर एक शक्तिशाली
(6/16)
पक्ष म्हणून स्थापन करण्याचा पाय रोवला,जरी त्यांच्या २१ च्या २१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असले तरीही.
एवढं सगळं होत असताना,२ दिवसापूर्वी आनंदात असलेल्या सैनिक,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचा आनंद थोडा कमी झाला आणि तो आनंद द्विगुणित पणे
(7/16)
कमी करण्यासाठी म्हणून 'सर्वोच न्यायालयाने' अर्णब गोस्वामीला बेल मंजूर केली. अर्णब बद्दल झालेल्या गोष्टींमध्ये सैनिक अतोनात प्रयत्न करून सांगत होते कि त्याला 'अन्वय नाईक' प्रकरणात पकडले गेले आहे आणि त्याचा 'अभिव्यक्तीस्वातंत्र्याशी' काहीही संबंध नाही !
(8/16)
पण ' वकील हरीश साळवे' यांनी या सगळ्या गोष्टींवर खुलासे करत अर्णब ची बाजू एखाद्या बलाढ्य बुरुजासारखी उभी केली आणि त्याच्यावर असलेले आरोप बाजूला काढले. अन्वय नाईक आणि त्यांच्या घरचे कुणाचे खास मित्र आहेत हे सर्वश्रुत असताना,
(9/16)
अर्णब ला राजकीय सूडाच्या भावनेतून अटक केली गेली आहे हे काही लोक मुद्दामहून विसरले. यावर मराठी पत्रकारिता जगतातील अनेक प्रामाणिक,निष्पक्ष, हुशार पत्रकारांनी अर्णब च्या अटकेवर वाट्टेल तसे विनोद करून, टीका टिपण्या करून स्वतःच्या निष्पक्षतेचे प्रमाण दिले.
(10/16)
तो आत आहे या आनंदाने उड्या मारत असणाऱ्या सर्वाना 'दिवाळीचा बोनस' मिळाला आणि अर्णब गोस्वामी तळोजा जेल मधून बाहेर पडला.
बाहेर येताच तो जेव्हा रिपब्लिक च्या स्टुडिओ मध्ये आला तेव्हा अगदी त्याच्या विरोधकांना आणि समर्थकांना वाटले कि हा आता तरी थोडा शांत पणे बोलेल.
(11/16)
पण त्यातले काहीही होताना दिसले नाही यावर तो पहिले वाक्य म्हणाला," उद्धव ठाकरे जी, GAME HAS JUST BEGUN " ! आणि तो आता अन्य भाषांमध्ये सुद्धा रिपब्लिक चालू करणार आहे अशी घोषणा केली. काही क्षणातच कदाचित मराठी पत्रकारांच्या डोळ्यासमोर अंधारी अली असेल
(12/16)
.या सगळ्यात अर्णब ला राष्ट्रीय पटलावर नायक करण्याचे कार्य सेने कडून अनावधानाने घडले हे निश्चित.
बिहार ची निवडणूक,अर्णब ची केस आणि सामान्य सैनिकांना त्यांच्या उच्च नेत्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहून प्रचंड वाईट वाटतं
(13/16) !
माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्णब बद्दल घेतलेला निर्णय इतक्या वाईट पद्धतीने 'BACKFIRE ' होईल असं कदाचितच कुणाला वाटलं असेल ! असो, हा सगळा लेख शक्य तितक्या मराठीत लिहण्याचा उद्देश हाच कि मी 'माझ्या परीने मराठी अस्मिता जपण्याचे कार्य असे करतो आहेत !
(14/16)
मला माहित आहे कि या लेखाने प्रेरित होऊन अनेक सैनिक माझ्या या थ्रेड वर येऊन माझे कौतुक करायला येणार आहेत,भैय्या,संघोटे, बामन, असे बोलून मला वेगवेगळ्या उपाध्या देणार आहेत
(15/16)
आणि त्यातल्या त्यात काही हुशार असलेले लोक त्यांचे विचित्र तर्क घेऊन येणार आहेत ! बघुयात कोण काय बोलत आहे ते ! धन्यवाद ! जय श्री राम !
(16/16)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.