हम कथा सुनाते हैं..
"फक्त दहा वर्ष मेधा. दहा वर्षांनंतर मी पुन्हा आपल्या फैक्ट्रीकडे लक्ष देईल काळजी करू नकोस."
हे वचन देऊन राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. पहिल्या वहील्या उमेदवारीच्या प्रचाराला बायको, आई-वडील,सासु-सासरे, भाऊ आणि मित्रपरिवार असा सगळा कबिला. 👇
अशी सगळी मायेची आणि जिवापाड माणसं कमावणारी व्यक्ती साधी नव्हती. त्यांच्या नावातच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. हाफ बाह्यांचा शर्ट, त्याला साजेशी पैन्ट, चेहऱ्यावर नेहमीचे मनमोहक हास्य, पायांमध्ये चप्पल किंवा स्लीपर. नंतरच्या काळात डोळ्यांवर रूळावलेला गोल चष्मा जो गळ्यात लटकवलेला.👇
24 ऑक्टोबर 2000 साली म्हणजे सक्रिय राजकारणात प्रवेश करून जेमतेम 6 वर्ष झालेल्या मनोहररावांची गोव्याच्या राजभवनात
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतांना असलेली भावनिक द्वंद्वस्थिती ही सामान्यांच्या समजण्या पलिकडे आहे. ज्या कुटूंबाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास झाला..👇
त्यातील आई-वडील आणि सर्वात मुख्य म्हणजे पत्नी समोर नव्हती. प्रेमविवाह होता दोघांचा. आयआयटी मुंबई मध्ये शिक्षण घेतांना दर रविवारी घरचे जेवण जेवायला मिळेल या हेतुने बहीणी कडे जाणाऱ्या मनोहररावांना बहिणीची नणंद मेधा आवडली आणि पुढे लग्न करून ती एका म्हापुस्याला आली.👇
सहसा कमावता नोकरदार जावई असणं हे प्रतिष्ठेचं असणाऱ्या काळात चांगली नोकरी सोडून कंपनी टाकायची असा विचार करून आलेल्या मनोहररावांना जावई म्हणून स्विकारणं खरीच मोठी गोष्ट म्हणावी लागेल.

गोष्ट आहे.. मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर यांची. हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.
👇
13 डिसेंबर 1955 पोर्तुगीज गोव्यातल्या म्हापुस्यात मनोहरचा जन्म झाला. शालेय शिक्षण पुर्ण करता करता साधारण दहावीच्या वर्षी हा मुलगा संघ शाखेतील मुख्यशिक्षक बनला. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परत संघकार्याला वाहुन घेतले. स्वतःचा व्यवसाय सांभाळत वयाच्या 26 व्या वर्षी...👇
उत्तर गोवा संघशाखेचे कार्य जोमाने वाढवण्यात मनोहरचं कार्य मोलाचे ठरले. गोव्यातुन रामजन्मभूमी आंदोलनासाठी संघटन करण्यात सर्वात पुढे कोण...? तर मनोहर. ते स्वतःला संघप्रचारकच म्हणत. लाघवी स्वभाव आणि जे मिळेल ते स्विकारत संघातुन भाजपमध्ये प्रवेशकरता झालेल्या मनोहररावांना...👇
..महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत लढावे लागले. जनसंपर्काची हातोटी, संघटन कौशल्य ओळखून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पहिली निवडणूक लढली ती 1994 साली. आणि मनोहरराव गोवा विधानसभेचे सदस्य झाले. नुकताच सुरू केलेला व्यवसाय..संघकार्य आणि आता राजकारण.. कुटूंबासाठीचा वेळ..? 👇
तेव्हा मेधा वहीनींना मनोहररावांनी फक्त दहा वर्ष राजकारणात राहण्याचे वचन दिले होते. जुन 1999 ते नोव्हेंबर 1999 गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले मनोहरराव 2000 साली गोव्याचे मुख्यमंत्री झाले.मधल्या काळात आई-वडील आणि पंधरा वर्षांची सोबत करणारी पत्नी त्यांना एकटे सोडून गेले.👇
मेधा वहीनींना रक्ताचा कर्करोग आहे हे कळाल्यानंतर ते अर्धे खचले. उपचारांसाठी गेल्यानंतर पाच सहा महिने सांगितल्यानंतरही अवघ्या एका महिन्यात पत्नीशोकाने ते पुरते खचले."विमानात जाणारी माणसे जिवंत परत येत नाहीत" अभिजीतला आणि उत्पल ला समजावतांना मनोहरराव खचत चालले होते. 👇
त्यांनी स्वतःला संघ, पक्ष आणि व्यवसायाच्या कामामध्ये गुंतवले. उण्यापु-या दोन वर्षांच्या पहिल्या टर्ममध्ये 2001 साली संघाचीच एक शाखा असणाऱ्या विद्याभारतीच्या 51 शाळांना मंजुरी देत त्या सुरू करण्यात आल्या. शिक्षणाचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून टिकाही सहन केली.👇
5 जुन 2002 साली परत एकदा निवडून येत गोव्याचे मुख्यमंत्री झाले. आणि जानेवारी 2005 मध्ये चार भाजप आमदारांच्या राजीनाम्याने सरकार अल्पमतात आले. प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. 2007 च्या निवडणूकांत दिगांबर कामत यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. पण 2012 मध्ये..👇
भाजपा मनोहररावांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून 24 जागांसह सत्तेत परतली तेही कॉंग्रेसला अवघ्या 9 जागांवर रोखत. 2012 ते 2014 गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असतांना..2014 च्या लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजले होते. सर्वात आधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नांव..👇
2013 सालीच जाहीर करणारे मनोहररावच होते. 2014 साली स्वतःच्या सरकारमधील तीन मंत्र्यांना फिफाचा फुटबॉल विश्वचषक पहायला पाठवण्यासाठी केलेला खर्च हा सरकारी तिजोरीतुन झाल्याचे सांगत त्यांना देशभरातुन प्रचंड टिकेचा सामना करावा लागला. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात आलेल्या सरकारमध्ये..
सुरवातीला संरक्षण मंत्र्यांचे पद तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे होते. मोदींना तिथे मनोहरराव हवे होते. संसदेतील खासदार म्हणून त्यांचा प्रवेश हा उत्तरप्रदेशातुन राज्यसभेवर झाला आणि मनोहरराव मोदिंच्या मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री झाले.👇
मेटलर्जी अर्थात धातुविज्ञान सारख्या विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असलेला व्यक्ती मुख्यमंत्री किंवा राजकीय नेता म्हणून पहिले नांव मनोहर पर्रीकर हे लक्षात असु द्या. हा माणूस मुख्यमंत्री असतांनाही किती सामान्य जीवन जगला असे कोणी विचारले तर ही छायाचित्र पुरेशी आहेत. 👇
उरी येथे भारतीय जवानंनी केलेला हल्ला किंवा आज आपल्याला मिळालेली राफेल विमानं, सैनिकांना मिळणारे उच्चप्रतीचे स्वस्तातील बुलेटप्रुफ जैकेट्स, शुज आणि संरक्षण साहित्य निर्मीतीसाठी भारतातील गुंतवणूक वाढवण्यात मनोहररावांचा प्रमुख सहभाग आहे.👇
आमीर खानच्या पत्नीने केलेल्या वक्तव्यावर दिलेली टिप्पणी, 'ज्यांना भारतात पटत नाही त्यांनी नरकात जावं' असेल किंवा 'प्रत्येकवेळी भारताने सावध पवित्रा न घेता पहिला वार करायला काय हरकत आहे.' यासाठी त्यांना टिकेचा सामना करावा लागला. यात कोणाला अडचण झाली असेल हे लक्षात आलेच असेल. 👇
सर्व काही सुरळीत चालू असतांना गोव्यामध्ये झालेल्या निवडणूकानंतर मनोहररावांना गोव्यात परतावे लागले. विजय सरदेसाईंच्या नेतृत्वात विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पर्रिकरच हवेत या अटी मुळे मनोहररावांना गोव्यात परतावे लागले. आणि मार्च 2017 मध्ये मनोहरराव गोव्याचे मुख्यमंत्री.👇
हा टप्पा शेवटचा होता. 2017 ते 2019. स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झालेलं होतं. मार्च 2018 ते सप्टेंबर 2018 उपचारांसाठी न्युयॉर्क मध्ये थांबावे लागले. याही काळात गोवन जनतेच्या प्रश्नांसाठी मनोहरराव उपचार चालू असतांनाही काम करत होते. पण कारण कोणालाही माहित नव्हते.ऑक्टोबर 2018 👇
गोवा सरकारकडून अधिकृतरीत्या पर्रीकरांच्या कर्करोगाबद्दल जाहीर करण्यात आले. त्याही परिस्थितीत मनोहरराव गोव्याच्या जनतेसाठी कार्यरत राहिले. मुख्यमंत्री कार्यालय घरामध्ये स्थापन झाले. जनसंपर्क कमी झाला. सहजपणे कोणालाही उपलब्ध होणारे मनोहरराव घरात कोंडले गेले.👇
17 मार्च 2019 रोजी मनोहररावांनी संघ स्वयंसेवक, मुख्यशिक्षक, तीन वेळेचे मुख्यमंत्री आणि यशस्वी संरक्षण मंत्री आणि सर्वात महत्वाचे गोव्याच्या जनतेचा सच्चा सेवक, लोकनेता या सर्व पदांचा राजीनामा देत इहलोकीचा निरोप घेतला. दोन छायाचित्रे मनोहररावांचे कार्याप्रतीचं दायित्व दाखवतील 👇
कोणी विचारले की मेधा वहीनींना दिलेल्या वचनाचं काय..? तर ते म्हणत
'ज्यासाठी थांबायचे होते ते कारणच राहिले नाही. घरात थांबलो तर आठवणीने वेडा होईल त्यापेक्षा देशाची सेवा करणे काय वाईट..?'

एवढ्या डेडिकेशन ने काम करणारे नेतृत्व तयार करणारा भाजप एकमेव पक्ष असावा.👇
शेवटच्या काळात भेटायला आलेल्या राहुल गांधीने त्या भेटीचं केलेलं राजकारण फरक दाखवणारं आहे पक्षीय संस्कारांचं. उत्तरात मनोहररावांनी लिहलेल्या पत्राला राहुल गांधी आजही काय उत्तर द्यावं या विचारात आहे. ही त्याची लायकी.
शेवटच्या श्वासापर्यंत गोवेकरांच्या सेवेत असलेल्या मनोहररावांना👇
श्रद्धांजली द्यायला पणजीच्या मीरामार बिचवर झालेली गर्दी त्यांच्याप्रती प्रेमाचं उदाहरण आहे. अभिजीत आणि उत्पल पर्रीकर या नावाचे नेते भाजपात नसतील हा पक्षाचा आणि मनोहररावांचा संस्कार आहे. विलक्षण व्यक्तिमत्वाच्या माणसाचं आत्मचरित्रही तसंच.
You can follow @swami_vachan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.