गेल्या दोन दिवसांत अर्णबच्या अटकेवर टीका करणाऱ्या लोकांचं मला काही कळतच नाहीये. म्हणजे तार्किकदृष्ट्या पाहाता यांचं म्हणणं काय आहे??
१. नाईक यांनी आत्महत्या केलीच नाही, का ती चिठ्टी लिहिलीच नाही? पण त्यात एक गोम आहे. नाईक मॅडमनी तक्रार दाखल केल्यावर जर आत्महत्या झालीच नसती
१. नाईक यांनी आत्महत्या केलीच नाही, का ती चिठ्टी लिहिलीच नाही? पण त्यात एक गोम आहे. नाईक मॅडमनी तक्रार दाखल केल्यावर जर आत्महत्या झालीच नसती
किंवा ती चिठ्टी त्यांनी लिहिलीच नसती, तर तसं म्हणायला सुमारे एक वर्षं अमृता-पतींचं राज्य आणि गृहखातं होतं. लक्षात घ्या, त्याही काळात कोणत्याही चौकशी यंत्रणेने असं म्हंटलेलं नाही...
२. एखाद्याने आत्महत्येच्या आधी ज्याचं नाव लिहिलेलं असेल, त्याच्यावर कारवाई, त्याला अटक करायची नाही का? मग आपण कोणत्या थोबाडाने आपण सुशांत प्रकरणात नाचत होतो? तिथे तर चिठ्ठीही नव्हती. मग सगळाच मामला गृहितकाचा होता.
३. बरं, मग आता अर्णबने राज्य सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतली, म्हणून राज्य सरकारने एका गुन्ह्यात त्याला अटक करायची नाही का? का ती केली की ती दडपशाही होते? या युक्तिवादातल्या मूर्खपणाला तर तोडच नाहीये...
अर्थात शिकल्यासवरलेल्या लोकांना हे सगळे तर्क दिसत नाहीत. एक विधवा आणि एक तरुण मुलगी यांची फरफट दिसत नाही. काहींनी तर त्या बिचाऱ्या बाई लिव्ह इन मध्ये होत्या आणि नवरा गेल्यावरही एव्हढ्या मेकप करून का आल्या, वगैरे अश्या पराकोटीच्या विकृत कमेंट्स दिलेल्या आहेत.
पुन्हा एकदा, आपण लक्षात घेऊ की त्या बाईंच्या बाजूने यात काहीही राजकारण नाही. जे त्यांच्याशी घडलं, ते आपल्या कोणाच्याही घरात घडू शकतं....
शिक्षितांच्या अकलेवर आणि नैतिकतेवर उभे करावे तेव्हढे प्रश्न कमीच आहेत...!!!
- अजित जोशी
शिक्षितांच्या अकलेवर आणि नैतिकतेवर उभे करावे तेव्हढे प्रश्न कमीच आहेत...!!!
- अजित जोशी