सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान सोलकढी विषयी थोडे...

सोलकढी म्हंटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं! कारण तिची चवच इतकी अप्रतिम असते की एक ग्लासभर जरी प्यायल्या तरी माणूस संतुष्ट होत नाही! याच बाबत काही न माहीत असलेल्या गोष्टीं सांगतोय. #म #Threadकर ✍️
सोलकढी हे एक असं पेय आहे ज्यात तिखट, आंबड, गोड, तुरट सर्व समतूल्य प्रमाणात घातले जातात. १९५८ साली जेव्हा मालवणला मराठी साहित्य संमेलन भरले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे असणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी पहिल्यांदा सोलकढी चाखली आणि मोहीत झाले. +👇
त्यावेळी त्यांनी सोलकढीला "भैरवीची" उपमा दिली. याचं कारण मी पुढे स्पष्ट करणार आहे. सोलकढी हे पेय प्रादेशिक खाद्यसंस्कृतीतलं पेय आहे. कोकम किंवा आमसूल यापासून बनवली जाणारी सोलकढी.
"रातांबी" च्या झाडाच्या फळांपासून कोकम किंवा आमसूल बनतात. + 👇
विशेषतः हि झाडं कोकणात आणि मुख्यतः तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतात म्हणुनच सोलकढी हे मालवणी माणसाचा अभिमान आहे असं मिरवण्यात काहीही मला शंका वाटत नाही.
तळकोकणात रातांबी/रातांबे धरल्याची वार्ता कोणी सांगताच घरातले सर्वजन टोपली किंवा फाटी आणि काठी घेऊन रातांबे + 👇
जमवायला जातात आणि झाडाखाली बसून खातात देखील! रातांब्यांचा लालबुंद रंग अगदी डोळ्यात भरतो. तिव्र आंबट गोड अशी रातांब्याची चव असते.
सर्व जन रातांबे गोळा करून घरच्या खळयात फळं कापायला बसतात आणि फळं कापता कापता आया बापडयांच्या गजाली सुरू होतात. + 👇
मालवणी गजाली ऐकून असलाच आज पण तसंच आहे. रातांबे कापताना हात हे मऊ होतात त्यामुळे आम्लाच्या गुणधर्मामुळे जखम झोंबते. या गोष्टीची काळजी घ्यावी. मग हि चार भागात कापलेली फळं वाळवणासाठी ठेवली जातात आणि मग सुकल्यावर जे तयार होतं ते "कोकम" किंवा "आमसूल" किंवा मालवणीत "सोला". + 👇
यांचा रंग सुकल्यावर काळपट होतो आणि रातांब्यांपासून प्रक्रिया करून रस बनवतात त्याला "आगुळ/आगळ" म्हणतात तो शिंपडला जातो आमसुलांवर.
बाकी नंतर तुम्हाला माहीतच आहे कि नारळाच्या दुधात कोकम रस मिसळून आणि मिरची, लसून, किंचीतशी साखर आणि मीठ टाकून सोलकढी बनते. +👇
सोलकढी अगोदर कोकणापुरताच मर्यादीत होती मग पुढे चव जशी भिनत गेली तशी ती जगप्रसिद्ध झाली.
सोलकढीचा उल्लेख मराठी साहित्यात आढळतो. कवी विजय चिंदरकर यांनी आपल्या कवितेत

हा सारा अन् थाट हवा
आणि हवीत सारी अवतीभवती
सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या त्या तानेवरती...

अशी एक चारोळ आहे. +👇
१९५८ साली मालवण मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात हि कवीता आचार्य अत्रे यांनी वाचली सोलकढी पिऊन कवीतेतील भैरवीची उपमा सोलकढीला दिली. मालवण मध्ये भरलेल्या संमेलनावर त्यांनी आपल्या मराठा नावाच्या अग्रलेखात या बद्दल उल्लेख केला होता. + 👇
पण सोलकढी बनवण्यासाठी जी मेहणत घ्यावी लागते ती फेस काढणारी असते.
इथे कोकणी नसणाऱ्या लोकांना एकच सोलकढीचा प्रकार ठाऊक आहे. पण तळकोकणात आणि गोव्यात "फुटी सोलकढी" देखील बनवली जाते.
सोलकढी हि खासकरून मांसाहारी जेवन म्हणजे कोकणात मासे व चिकण असल्यावर दिली आणि तावाने प्यायली जाते +👇
तर अशी आहे चविष्ट आणि भारावून टाकणारी सोलकढी! जी अगोदर कोकणापुरताच मर्यादीत होती ती भारतभर पसरली मग जगमान्य झाली.

तुम्हाला हा थ्रेड कसा वाटला हे नक्की कळवा!
साभार! 🙏🙏
@fu_baifu @ChintuTheJefe @TUSHARKHARE14 @vaibhavidharne4 @lankesh009696 @d_d_dhuri @ShubhangiUmaria @KKW_NH66
आणि खवय्ये लोकांसाठी खास डॉक्टरांनी [ @Nilesh_P_Z ] लिहीलेला प्रसिद्ध नाशिकच्या मिसळवरील थ्रेड नक्की वाचा! 👇👇🙏 https://twitter.com/Nilesh_P_Z/status/1324194514425147394?s=19
वाचकांच्या आग्रहाखातर सोलकढीचा दुसरा प्रकार "गोवन फुटी कढी" ची रेसिपीची युट्यूब लिंक 👇😁
You can follow @irajratna.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.