एकंदर अर्नब प्रकरण रोचक वळणावर आहे ..... पहा त्याने कस सगळ वाढवत वाढवत पार शिगेला नेल ..... आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी त्याच्या मागे अहंकारा मुळे अक्षरशः फरपटले जात आहेत, अगदी नको त्या गोष्टी करून बसत आहेत . तो एक शोमन आहे अन त्याने काल व्यवस्थित नाटक रंगवले आहे .... 

शांतपणे काही करणे आणि कुणाला करू देणे हे त्याच्या स्वभावात नाही .... काल प्रथमच पोलीस अगतिक पाहिले मी , धरता येईना अन सोडता येईना अस त्याची अजिजी करून समजावत होते पण त्याने बळ वापरायची वेळ आणलीच अन त्याला तेच हव होत ... ... अब्रू गेली राज्यकर्त्याची ...
त्याच्यावरचे काही आक्षेप
त्याच्यावरचे काही आक्षेप
१ ) अर्नब मागे भाजप आहे ... असू शकेल , काही यंत्रणेतले लोक असतील , काही सरकारी लोक असतील .... सध्याचा भाजप काही पूर्वीचा नाही, आता तो हाती असेल ते सर्व मार्ग वापरणारा आहे जे एकेकाळी कॉंग्रेस एकोसिस्टीम ची एकहाती मिजास होती ... का वाईट वाटतेय ??

अर्नब मागे भाजप आहे अस म्हणण्या पेक्षा त्याने उपस्थित केलेल्या मुद्या मुळे तुम्ही इतके हैराण का होताय हे महत्वाचे आहे .
२) तो विकाऊ आहे ...... मला नाही वाटत .... त्याच्या मागे तगडे फायनान्सर आहेत कंपनी चालवणे म्हणजे पोरखेळ आहे का ?
२) तो विकाऊ आहे ...... मला नाही वाटत .... त्याच्या मागे तगडे फायनान्सर आहेत कंपनी चालवणे म्हणजे पोरखेळ आहे का ?

आता तर रिपब्लिक चा TRP परत उसळी मारून वर येणार . असलं काही करण्यात त्याला रस असेल अस दिसत नाही , त्याला काम करून मिडीया सम्राट व्हायचं आहे हे स्पष्ट दिसतय . चाय बिस्कुट वर खुश होणारा प्राणी नाही तो , महत्वाकांक्षी आहे .
राजकारणात महत्वाच असत ते परसेप्शन किंवा इमेज ....
राजकारणात महत्वाच असत ते परसेप्शन किंवा इमेज ....

उद्धव ठाकरे, मायनो सेना आणि दोन्ही कॉंग्रेस यांनी सरकार बनवण्या पासून जी नीतिमत्ता आणि जे काही एकंदर गुंडाळून ठेवल त्याने अगोदरच लोकांचं मत त्यांच्या बद्दल फारसं चांगल नाही .... कंगना असो नाहीतर अर्नब यांच्या प्रतिक्रिया हिंसक आणि दादागिरीच्या आहेत ते लोकांना आवडत नाहीये , 

इमेज चा स्वतः च्या हाताने असा सत्यानाश करणारा पहिला राजकारणी उद्धव ठाकरे !
सामान्य माणूस हे सगळे पाहून काय विचार करतो ? तो अचंबित आहे , तो थक्क होतोय की हे चाललेय काय ...... पोलीस सत्तर दिवस एक मृत्यू हा आत्महत्या का खून हे ठरवू न शकल्याने सुप्रीम कोर्ट तपास काढून घेते अन मग

अहंकार दुखावलेले सरकार विविध मार्गांनी खुनशी पणा करतेय .... एक पत्रकार आरोप करतो , एक नटी आरोप करते .... त्यांच्या मागे अक्खे सरकार हात धुवून लागलेय का ? काही तथ्य आहे का काही लपवायचे आहे ? सरकार राज्यकारभार करायला असते , जनतेचे प्रश्न सोडवायला असते असा सामान्य जनतेचा समज 

इथ सर्व सरकारी यंत्रणांनी काही व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्या मागे लागून त्यांचा आवाज बंद करायचा प्रयत्न करून खोटा ठरवला आहे . कशाला असत सरकार ? दडपशाही करायला ?
काल अर्नब जिंकला , सरकार फक्त दडपशाही करायला आहे , खुनशीपणा करायला आहे , दंडेली करायला आहे हे त्याने वदवून घेतले
काल अर्नब जिंकला , सरकार फक्त दडपशाही करायला आहे , खुनशीपणा करायला आहे , दंडेली करायला आहे हे त्याने वदवून घेतले
. सरकारातल्या लोकांची वर्तणूक संशयास्पद असली असे कुणी जरी सुचवले तरी त्याच्या मागे सूडचक्र चालू होणार हे त्याने सिद्ध करून दाखवले !

कंगणाचे तोडकाम असो किंवा अर्नब ची अटक , निमित्त काढून दडपशाही हा या सरकारचा नियम हा समज काल पक्का झाला .
हेच दादागिरी , दडपशाही चे परसेप्शन शिवसेनेला संपवणार आहे , सरकारात येऊन सुद्धा तुम्ही राडेच करता , तुम्ही परिपक्व नाही हा मेसेज ठळक पणे गेला !
जय हिंद
हेच दादागिरी , दडपशाही चे परसेप्शन शिवसेनेला संपवणार आहे , सरकारात येऊन सुद्धा तुम्ही राडेच करता , तुम्ही परिपक्व नाही हा मेसेज ठळक पणे गेला !
जय हिंद