केविन कार्टर हा दक्षिण आफ्रिकन छायाचित्रकार. अवघ्या ३३ वर्षांच्या अल्पायुष्याचा धनी. कलेसाठी त्याला छायाचित्रणातील ‘पुलित्झर पारितोषिक’ मिळाले पण अशा काही घटना घडल्या ज्यायोगे पुढचे जीवन जणू शापित ठरले, पारितोषिकाचा फारसा आनंद त्याच्या वाट्याला आला नाही.
केविन हा आफ्रिकेतील सुदानमधील अंतर्गत अराजक, वंशभेदाची रक्तरंजित लढाई आणि गृहकलहाचे चित्रीकरण करताना काढलेल्या एका छायाचित्रामुळे प्रकाशझोतात आला. भूक वेदनेने अंगातील त्राण संपल्यामुळे निवारा केंद्राकडे खुरडत सरपटत चाललेली एक लहान मुलगी आणि तिच्या मागावर असलेले गिधाड
हा हृदयद्रावक प्रसंग त्याने कॅमेऱ्यात टिपला. 1993-94 साली न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर जागतिक वर्तमानपत्रा - मासिकांत फोटो प्रसिद्ध झाला. पुढे यासाठीच पुलित्झरही मिळाले पण जगभरातून तीव्र टीकाही झाली. केवळ निरीक्षक म्हणून गेलेल्या आणि रोगराई इ. च्या भीतीने आफ्रिकन लोकांना प्रत्यक्ष
स्पर्शाची भीती असणाऱ्या केविनच्या मानसिकतेवर परखड प्रतिसाद उमटले. त्या मुलीचे पुढे काय झाले? तिला मदत मिळाली की नाही, आणि मुख्य म्हणजे छायाचित्र काढून झाल्यावर केविनने काय केले? असे प्रश्न विचारले गेले. यांची उत्तरे दुर्दैवाने त्याच्याकडे नव्हती कारण तो तिथे विमानातून
काही तासांसाठीच गेला होता. संयुक्त राष्ट्रांचे ते विमान स्थानिकांना मदत पोचवून तातडीने निघाले त्यामुळे आपण काढलेल्या फोटोतील मुलीचे पुढे काय झाले याबद्दल त्याला सुतराम कल्पना नव्हती.
या जगभरातील पडसादांचा केविनच्या मनावर निश्चितच परिणाम झाला
या जगभरातील पडसादांचा केविनच्या मनावर निश्चितच परिणाम झाला
असणार कारण त्यानंतर तो निराशेच्या आहारी गेला, उपलब्ध माहितीनुसार व्यसनाधीनही झाला आणि शेवटी त्याने वयाच्या 33 व्या वर्षी आपल्याच मोटारीचा एक्झॉस्ट केबिनमध्ये जोडून विषारी वायू भरून घेत आत्महत्या केली.
हे वाचून आणखी एक जागतिक स्तरावर खळबळ उडवणारे छायाचित्र आठवले.
हे वाचून आणखी एक जागतिक स्तरावर खळबळ उडवणारे छायाचित्र आठवले.
केविनच्या आधी सुमारे २१ वर्षे म्हणजे १९७२ साली ‘निक युट’ व्हिएतनाम लढाईचे चित्रीकरण करत होता. एका गावावर अमेरिंकेची मदत असलेल्या दक्षिणी विएतनामीज वायुसेनेचा नापाम बॉम्बहल्ला झाला. जळते मिश्रण सर्व पेटवू लागले आणि ९ वर्षांची ‘किम’ नावाची मुलगी आपले जळते कपडे काढून टाकत
निकच्या कॅमेऱ्याकडे पळू लागली. तिची दोन भावंडे आधीच मृत्युमुखी पडली होती. फोटो काढून झाला पण निक तेवढ्यावर थांबला नाही, त्याने किम आणि बरोबर आणखी अनेक लोकांना सायगांवमधल्या रुग्णालयात दाखल केले. अत्यवस्थ किम जवळजवळ दीड वर्षे रुग्णालयात राहिली. पुढे किमचे आयुष्य फार बदलले
निकच्याही फोटोवर जगभरात चर्चा झाली. त्यालाही पुलित्झर देऊन गौरवले गेले. मात्र अतिशय विचलित करणारे छायाचित्र असूनही केविनच्या वाट्याला दोन दशकांनी जी परखड टीका आली, तसे काही निकच्या बाबतीत झाले नाही. उत्तरोत्तर त्याची कला आणखी समर्थ होत गेली आणि त्याला उदंड कीर्ती-सन्मान मिळाले.
एका अत्यंत त्रयस्थ पातळीवर विचार केला तर दोघेही आपले कर्तव्य कला तितक्याच निष्ठेने जोपासत होते पण निकच्याही फोटोवर जगभरात चर्चा झाली. त्यालाही पुलित्झर देऊन गौरवले गेले. मात्र अतिशय विचलित करणारे छायाचित्र असूनही केविनच्या वाट्याला दोन दशकांनी जी परखड टीका आली,
तसे काही निकच्या बाबतीत झाले नाही. उत्तरोत्तर त्याची कला आणखी समर्थ होत गेली आणि त्याला उदंड कीर्ती-सन्मान मिळाले. आधी माणूस असायला हवे.ती माणुसकी दर्शविण्यातअजाणतेपणे केविन कुठेतरी कमी पडलाआणि त्याच्यासद्सद्विवेकबुद्धीला लागलेल्या टोचणीची किंमत जिवाचे मोल देऊन चुकती करावी लागली.
सुरक्षित चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या आपणा सर्वांना हे सर्व कल्पनातीत आहे. जिथे आयुष्याच्या प्रत्येक पळाचा भरवसा नाही अशा जागी चाललेले संहाराचे मानवनिर्मित थैमान, जीवनाची कवडीकिंमत आणि नैतिक-अनैतिकाच्या धूसर सीमारेषा यांची कितीही सहभावना असली तरी पुरेशी जाणीव होऊ शकत नाही,
असे काही वाचले की आपण बर्याच सुखात आहोत याचे अपराधी समाधानही उमटते तरीही असे काही वाचून दुखाय-खुपायचे राहत नाही हेही तितकेच खरे.
निक युटने छायाचित्र काढलेल्या ‘किम’वर ‘अरुण कोलटकरां’च्या “भिजकी वही”मध्ये तीन उत्कृष्ट कवितांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.
निक युटने छायाचित्र काढलेल्या ‘किम’वर ‘अरुण कोलटकरां’च्या “भिजकी वही”मध्ये तीन उत्कृष्ट कवितांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.
ते लिहितात:-
"हुकाला टांगलेली सोलीव बकरी
आणि कुळाचार सोडलेली
लाज गुंडाळून ठेवलेली बहिण
यांच्यात फरक करत नाही सुरी".
"हुकाला टांगलेली सोलीव बकरी
आणि कुळाचार सोडलेली
लाज गुंडाळून ठेवलेली बहिण
यांच्यात फरक करत नाही सुरी".
लेखकाच्या भावना:-
क्रूर गिधाडे टपली घेण्या घास
अंता आता मुक्तपणाने हास
मिरवत मृत्यू रक्तपताका भाळी
सावज गोळा करतो मारत हाळी
घोर अमानुषतेचा विकल उसासा
दूर कहाणी घडते हाच दिलासा !
ना जळते...ना झडते अपुले काही
पाहुन असले सल का बोचत राही ?
क्रूर गिधाडे टपली घेण्या घास
अंता आता मुक्तपणाने हास
मिरवत मृत्यू रक्तपताका भाळी
सावज गोळा करतो मारत हाळी
घोर अमानुषतेचा विकल उसासा
दूर कहाणी घडते हाच दिलासा !
ना जळते...ना झडते अपुले काही
पाहुन असले सल का बोचत राही ?
दोन "पुलित्झर पारितोषिक" विजेते छायाचित्रकार. त्यातील एकाला जग प्रसिद्धीशिखरावर पोहचवत तर दुसरा छायाचित्रकार वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी जगाच्या प्रश्नांनी हैराण होऊन आपले स्वत:चे जीवन संपवतो.
अजब हा नियतीचा खेळ सारा...
अजब हा नियतीचा खेळ सारा...
( #अमेय( http://www.maayboli.com ) नावाने गुगलवरील लेख आपल्यापर्यंत पोहचवत आहे.
)
संकलन:- #शैलेशTalks

संकलन:- #शैलेशTalks
