‘जो स्वप्न पाहतो, तो तरुण’ अशी तरुणाईची व्याख्या करता येईल. तरुणाईचं ते एक अभिन्न असं अंग आहे. स्वप्नच तुम्हाला उडायला आणि ‘जगायला’ आणि ‘कशासाठी जगायचं?’ हे शिकवतात.
या स्वप्नांच्या वाटेवर चालत असताना कधी काटे लागतील, कधी कोणी तुमचचे पाय ओढेल, कदाचित अनंत संकटंही येतील, पण संकटं आलीत म्हणून थांबायचं नसतं, त्यांच्या भीतीनं आपल्या प्रवासाला विराम द्यायचा नसतो. ही संकटं म्हणजे तर देवानं तुमच्या वाटेवर ठेवलेली संधी.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कुणी ‘असामान्य’ बनण्याच्या ध्येयानं पछाडलेले असता, त्यावेळी बय्राचदा तुमच्या आजूबाजूचं जग मात्र तुम्हाला ‘सामान्य’ ठेवण्यासाठीच जिवाचा आटापिटा करत असतं.
अशावेळी कामाला येतो तो ‘मित्र’. त्याची ‘पहचान’ मात्र आपल्याला झालीच पाहिजे.
अशावेळी कामाला येतो तो ‘मित्र’. त्याची ‘पहचान’ मात्र आपल्याला झालीच पाहिजे.
अडचणींना संकट समजू नका. त्यांना लाथाडू नका. ही संकटंच तर आपल्याला जगण्याचं आणि पुढे जाण्याचं बळ देत असतात. संकटं म्हणजे आपले दोस्तच. आयुष्याच्या प्रवासात ते तर हवेतच.त्यांच्याशिवाय आपण यशोशिखराकडे जाऊ शकत नाही,विजयाचा आणि यशस्वीतेचा आनंदही आपल्याला त्यांच्याशिवाय मिळू शकत नाही.
तुम्हाला माहीत आहे, जोराचा पाऊस सुरू झाला, की सगळे पक्षी ‘आसरा’ शोधायला लागतात, पण गरुड मात्र आसरा शोधण्यापेक्षा पाऊस पाडणा:या त्या ढगांच्याही वर ङोप घेतो. साध्या पक्ष्यांत आणि गरुडात हाच तर फरक आहे. मनात जिद्द असली तर आपल्या गरुडभरारीला कोणीही रोखू शकत नाही. कोणीच नाही.
सरधोपट मार्ग निवडण्यापेक्षा ज्या मर्गावर अजून फारसं कुणी चाललेलं नाही,अशा ‘अज्ञात’ मार्गाचा शोध घ्या,नवीन‘शोधण्याची’ आणि ‘नवनिर्मिती’ची धडाडी दाखवा.‘अशक्य’ या शब्दाला घाबरण्यापेक्षा त्याच्याच पाठी हात धुवून लागा,सगळे अडथळे आणिसंकटं स्वत:च आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट करून देतील.
पहिला विजय, पहिलं यश खूप महत्त्वाचं. या टप्प्यावर थोडं उभं राहा, किती मोठा पल्ला आपण पार केला, तो किती ‘कठीण’ होता, याची कौतुकभरली थाप भले स्वत:च्याच पाठीवर द्या, पण इथे थांबू नका. कारण याच पल्लय़ावर थांबलात, ‘खुश’ झालात, तर मागून आपल्याला ऐकू येऊ शकतं, ‘ह्यॅ, लक, दुसरं काय!’.
पहिल्यांदा यश आलं, विजय मिळाला, म्हणजे प्रत्येक वेळी आणि पहिल्याच प्रत्यक्षात येईल असं नाही, पण समजा आलंच अपयश, झालातच ‘फेल’, तर अशा वेळी खचू नका, धीर सोडू नका. थांबू तर मुळीच नका.
#डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्याख्यानांतील संदर्भाचा संपादित गोषवारा आणि सोबत छत्रपतींची शिकवण
#शैलेशTalks

#शैलेशTalks