आपण बऱ्याच वेळा ऐकतो
डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटींग वेबसाईट्स, ऑनलाईन बिझनेस .....आणि बरच काही...
पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की आहे तरी काय आणि आज सगळीकडे याचा बोलबाला का आहे ?
येत्या काही वर्षातच डिजिटल मार्केटिंग हे व्यवसाईकांच मार्केटिंग आणि
#मराठी #म
#1/N
व्यवसाय वाढवण्याचं मुख्य साधन असणार आहे.त्यामुळे प्रत्येक मराठी व्यावसायिकाने याचे महत्व समजून घेणे आणि वेगवेगळ्या साधनांचा पुरेपूर उपयोग करून घेणे खूप महत्वाचे आहे.
आज अनेक उद्योजक वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य वापर करून आपला व्यवसायात वाढवत आहेत. चला तर मग समजून घेऊ.
#2/N
व्याख्याच सांगायची झाली तर इलेक्ट्रॉनिक मेडिअम आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंग ला म्हणतात डिजिटल मार्केटिंग.
पारंपरिक मार्केटिंग मध्ये होर्डिंगस, वर्तमानपत्राच्या जाहिराती, छापील जाहिराती, यांचा समावेश होतो आता या जाहिराती
#3/N
आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात का , आणि आपल्या अपेक्षेनुसार निकाल देतात का हे कळण खूप कठीण असतं.
याच जागी डिजिटल मार्केटिंग चे काही फायदे समजून घेऊया.

🎯लक्षीकृत जाहिरात : Precise Targeting

डिजिटल मार्केटिंग जाहिरातदारांना, वय, लिंग, विषय, कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड
#4/N
वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते.
पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे व्यावसायिकांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण जाते.
#5/N
⏱ रिअल टाइम ऑप्टिमायझेशन:

डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या जाहिरात मोहिमांना रिअल टाइममध्ये बदलू शकतो म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात मध्ये बदल करू शकत नाही .
#6/N
🔭 परिणाम मोजणे सहज शक्य होते

डिजिटल मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे, आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे, किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे,किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे,लोक आपल्या वेबसाइटवर
#7/N
किती वेळ घालवत आहेत, ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत , ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्या सेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो, जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.
#8/N
🗣ग्राहकांशी सहज संवाद
ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांबरोबर सोशल मीडिया च्या माध्यमातुन संवाद वाढविण्यास मदत करते. ब्रॅण्ड सद्य परिस्थितीत ग्राहकांशी कनेक्ट राहू शकतात आणि त्यांच्या खरेदीच्या एकूण प्रवासादरम्यान त्यांना ब्रँड च्या संवादात व्यस्त ठेवून खरेदीस मदत करू शकतात.
#9/N
👨🏻‍💼 ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद
डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा हा कि तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. याप्रकारे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला पाहिजे त्या मार्केटिंग संवादाने तुम्ही सेवा किंवा वस्तु घेण्यास प्रवृत्त करू शकता.
#10/N
💰 कमी खर्चिक
डिजिटल मार्केटिंग अत्यंत स्वस्त आहे. जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता.ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या बजेट ने जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम
#11/N
होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता.
💰कमी खर्च जास्त फायदा💎 :
पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते कारण आपल्या
#12/N
उद्योगास आवश्यक असणाऱ्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो ज्यामुळे त्यासाठी खर्च हि कमी लागतो. सोबतच डिजिटल मार्केटिंग मधुन तुम्ही भेट देणारे ग्राहकांचा मागोवा ठेवू शकता, आणि ते कोणत्या माध्यमातून तुमचे ग्राहक बनले या वर देखील लक्ष देऊ शकता.
#13/N
हे झाले डिजिटल मार्केटिंग चे फायदे आता याचे प्रकार कोणते आहे म्हणजेच माध्यम कोणती हेही सोबत जाणून घेऊ सर्व प्रकार नमूद न करता फक्त ५ महत्वाचे प्रकार जाणून घेणे खूप महत्वाचे आहेत.
#14/N
१. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन -
म्हणजे सर्च इंजिन वरच्या क्रमवारीत तुमच्या वेबसाईट/ प्रॉडक्ट्स चा क्रम (रँकिंग) करण्याची प्रक्रिया.
सर्वात सहज आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग.
#15/N
२.सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतो.

सोशल मीडिया माध्यमांमध्ये
फेसबुक
ट्विटर
यूट्युब
लिंकडइन
पिंटरेस्ट
स्नॅपचॅट
गुगल प्लस
सोशल मीडिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे,एक प्रभावी माध्यम आहे
#16/N.
३.कंटेंट मार्केटिंग
कन्टेन्ट मार्केटिंग तुमच्या सेवा किंवा प्रॉडक्ट्सच्या बद्दलचे महत्त्वाचे संदेश एका स्वरूपात आणि लक्ष्यित प्रेक्षकांसोबत सुरवातीपासून संबंध तयार करण्यात मदत करते. आपल्या ग्राहकांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी, एक उत्कृष्ट कन्टेन्ट मार्केटिंगचा आरखडा
#17/N
बनविणे खूप गरजेचे आहे, ज्याने शेवटी बिसनेसला सेल्सच्या रूपात फायदा होऊ होतो.
कन्टेन्ट मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती :
ब्लॉग
व्हिडिओ (ध्वनी चित्रफीत )
इन्फोग्राफिक्स
वेबिनार्स
पॉडकास्टस
ईबुक
व्हाईट पेपर
#18/N
४.ऍफिलेट मार्केटिंग

अफिलिएट मार्केटिंग हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण इतर कंपन्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करून त्यातून कमिशन मिळवू शकता. यात आपण ब्रँड च्या वस्तू किंवा सेवा लोकांना विकतो आणि त्या बदल्यात ब्रँड आपल्याला काही टक्के कमिशन देते.
#19/N
अनेक कंपन्यांनी हि संधी उपलब्ध करून दिली असून या द्वारे सर्वसामान्य व्यक्ती ब्रँड चे प्रॉडक्ट विकून त्याद्वारे पैसे कमावु शकतो.
ऍफिलेट मार्केटिंगची परवानगी देणाऱ्या कंपन्या :
अमेझॉन
फ्लिपकार्ट
अली एक्सप्रेस
#20/N
५.ईमेल मार्केटिंग

ई-मेल मार्केटिंग हा डायरेक्ट मार्केटिंग चा मोठा भाग असून इथे ई-मेल चा वापर संभावित ग्राहकाशी संपर्क करण्यासाठी होतो. हे ई-मेल प्रचाराचे, प्रॉडक्ट किंवा सेवेच्या माहितीचे, किंवा सेवेतील झालेल्या बदलाबाबतीत माहिती देणारे असु शकतात.
#21/N
ई-मेल मार्केटिंग हे चांगले मार्केटिंगचे मेडीयम आहे कारण आपण संभावित ग्राहकाशी प्रत्यक्ष बोलू शकतो. ई-मेल मार्केटिंग द्वारे तुंम्ही ग्राहकांना व्यस्त ठेवू शकता, आणि सोबतच ग्राहकाला तुमच्या ब्रँड शी नाते जोडायला भाग पाडता.ई-मेल मार्केटिंग ला ड्रीप मार्केटिंग असे हि म्हणतात
#22/N
कारण यात तुम्ही रोपाला हळू हळूहळू पाणी दिल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात ब्रँड बद्दल विश्वास निर्माण करू शकता.डिजिटल मार्केटिंग हि बदलत्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यवसायात उच्च फायदा प्राप्त करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टी समजून
#23/N
कमीत कमी खर्चात ज्यास्तीत जास्त फायदा होईल! हे नक्की !
ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल ही अपेक्शा 🙏
#24 🙏
डिजिटल मार्केटिंग बद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर या फेसबुक पेज ला नक्कीच लाईक करा
https://www.facebook.com/Go-Digital-104201018165449/
You can follow @Atarangi_Kp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.