#thread
३१ आॕक्टोंबर १९८४ रोजी #इंदिरागांधी ची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून हत्त्या केली होती. त्यामागील कारण काय होते ? Operation blue Star काय होतं ? दमदमी टकसाल संघटना काय आहे ? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत..

#म #रिम (1/n)
१९७० साली पंजाबमध्ये एक संघटना उभारीस आली "दमदमी टकसाल" यांचे अध्यक्ष होते "जनरल सिंग भिंडरावाले" सुरवातीला यांच्या ५ मागण्या होत्या

१) यमुना - सतलज नदींना जोडणार्‍या कॅनल ला विरोध

२) पंजाबांचे वेगळे राज्य

३) चंदिगड हे फक्त पंजाबची राजधानी व्हावी (2/n)
४) कॅनलचे मुख्यालय पंजाबमध्ये व्हावे

५) रक्षा, विदेश, संचार, मुद्रा हे केंद्र सरकार ने सांभाळावे बाकीचे सगळे अधिकार राज्यांना द्यावे.
पुढे चालून या संघटनेनं उग्र रूप धारण केलं, जनरल सिंघ आपल्या उग्र भाषाणाद्वारे सिख लोकांना चिथवण्याचे कार्य केले बघता बघता संघटनेनं हजारो
(3/N)
सशस्त्र कार्यकर्ते बनवले त्यांना शस्त्रांच प्रशिक्षण दिलं आणि आपल्या संघटनेचे धोरणच बनवले " आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्हाला आमचा देशच वेगळा पाहिजे" ज्याला नाव देण्यात आले "खलीस्थान"

#खलीस्थान चळवळीसाठी विदेशातून पैसा, शस्त्रसाठा लागत असलेली सगळी मदत पुरवण्यात (4/n)
येत होती संघटना अधिका अधिक मजबूत बनत गेली.आपल्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही म्हणून हिंस्र रूप धारण करून हत्त्या करायला सुरुवात केली यांची वाढती प्रसिद्धी बघता अकाली दल यांनीही मतांसाठी पाठिंबा दिला. यानंतर प्रत्येक विरोधी लोकांची हत्त्या करायला सुरूवात केली (5/n)
१९८०: निरंकार समुदयाचे प्रमुख गुरूबचन सिंग यांची हत्त्या
सप्टेंबर १९८१: "पंजाब केसरीचे" संपादक लाला जगत नारायण यांची हत्त्या एवढंच नाही तर पोलीस महासंचालक "अडवाल" यांच्या कार्यालयावर हल्ला केला. त्यातून ते कसेबसे वाचले तर त्यांची सूवर्णमंदिराच्या पायर्‍यांवर हत्या केली.
(6/n)
१९८१ ला जेव्हा पंजाब पोलिस जनरल सिंग भिंडरावाले ला अटक करायला गेली तर त्यांच्यात हिंसक झडप झाली यात ११ लोकांचा मृत्यू झाला.
अटकेपार शिख छात्र संघटना जी दमदमी संघटनेचाच भाग होती त्यांनी लोकांचे जीव तर घेतलेच पण श्रीनगर वरून दिल्ली ला येणारं #Airindia विमान हायजॅक केलं. (7/n)
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला

"प्रतीलारी" मासिकाचे संपादक सुमीत सिंग यांची हत्त्या

BJP चे आमदार हरबसलाल खन्ना व त्याचे अंगरक्षक यांची हत्त्या

प्राध्यापक विश्वनाथ तिवारी यांची हत्त्या ... इत्यादी मोठमोठ्या पदांवरील व्यक्तींना मारल्या गेलं.
(8/n)
राज्याची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे संघटना अतिउग्र झाली आहे आत्ताच कार्यवाही केली नाही तर पुढे चालून देश्याची अखंडता आणि एकात्मता धोक्यात येऊ शकते हे वेळीच ओळखून मार्च १९८४ ला राष्ट्रपती राजवट लागू केली आणि सगळी सुत्र इंदिरा गांधींनी आपल्या हाती घेतली. (9/n)
राष्ट्रपती राजवट लागू करताच जनरल सिंग भिंडरावाले यांना लक्षात आलं आणि आपले सगळे कार्यकर्ते घेऊन ते सरळ सुवर्णमंदिरात दाखल झाले तिथूनच ते पुढील योजना राबवू लागले कारण त्यांना माहिती होतं सुवर्णमंदिर हा लोकांचा श्रध्देचा विषय आहे इथे त्यांच्यावर कोणीही कार्यवाही करू शकणार नाही.
पण पंतप्रधानही iron lady इंदिरा गांधी होत्या जिंथ प्रश्न देश्याच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि अखंडत्वाचा येतो मग त्यापुढे काहिच नाही.

सुवर्ण मंदीराला चार व्दार आहेत

१ व्दारा समोर इमारत आहे तीला अखाल तख्त म्हणतात त्यात यांनी ठाण मांडलं सोबतच सगळा
(11/n)
शस्त्रसाठा ( AK47 ते Rocket launcher सगळंच )

बाकी तिन्ही व्दाराच्या पुठे भुयारं खोदले त्यात Automatic machine Guns बसवण्यात आल्या जेणेकरून कोणी आत आलच तर त्याचा पायाला गोळ्या लागेल जर खाली वाकला तर छातीत आणि डोक्यात.
चारही बाजूंनी बूरूज बांधण्यात आले त्यावर बंदूकधारी
(12/n)
लोकं होते सोबतच आजूबाजूच्या इमारती वरही आपले लोकं सशस्त्र उभे केले अशी सर्व योजना त्यांनी आखली होती. खलीस्थान मिळवायचंच हाच विचार करून होते.
पण आता मोहिम इंदिरा गांधींच्या हातात होता त्यांनी आधीच तिन्ही दलाचे प्रमूख, IB & RAW यां सगळ्यांची बैठक घेऊन माहिती गोळा करायला सांगितली.
१ महिन्या नंतर परत बैठक झाली. योजना आखली गेली आणि याला नाव देण्यात आलं "Operations Blue Star"

या योजनेत तीन प्रमूख नेमले गेले
१) kuldip singh Brar (B.S.F.)
२) Ranjeet Singh Dayal (Indian Army)
३) krushswamy Sundar (Panjab police)

मुख्य म्हणजे २ प्रमुख हे सिख होते (13/n)
यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण इंदिरा गांधीना त्यांच्यावर पुर्ण विश्वास होता.
१-८ जून दरम्यान सगळं पंजाब कडक लाॅक करण्यात आलं. भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिराला तीन वेढे घातले, संपुर्ण अमृतसर ला दोन वेढे घातले, पंजाब पाकिस्तानच्या सीमेवर सैनिक तैनात करण्यात आले (14/n)
जेणेकरून कुठलीही मदत पोहचू नये, काहीही झालं तरी सैन्य तयार असायला हवं.
३ जून सैन्याने आत शिरकाव करायला सुरुवात केली
२ व्दारातून, पण त्यांनी अगोदरच बखारी खोदून ठेवल्या होत्या सैन्य आत गेल्याबरोबर मोठ्या प्रमाणात त्याच्यवर गोळ्यांचा वर्षाव झाला बखारी मधून पायात गोळ्या (15/n)
घातल्या जात घोत्या खाली झोपले कि डोक्यात गोळ्या मारल्या जात होत्या ३-४ जून या दोन दिवसात सैनिक आतही जावू शकलं नाही आणि आपले २०-२५ सैनिक मारल्या गेले कारण आधीच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा त्यांनी साठवूनच ठेवला होता.
या विरोधाला तोंड द्यायला सरळ रणगाड्याची मागणी करण्यात आली
(16/n)
सरकारने मान्यही केलं पण कडक आदेश होते रणगाडे मंदिरावर चालवण्यात येणार नाही रणगाड्याचा उपयोग आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठीच करायचा.

शेवटी रणगाड्यासोबत रात्री सैनिक घूसले एक एक तुकड्यांचा फडशा पाडत समोर जात होते तेवढ्यात रणगाड्याचे लाईटवर गोळीबार करून फोडण्यात आले (17/n)
सैन्य मध्येच फसलं पण बरं झालं आधीच दोन रणगाडे आणले होते दुसरा रणगाडा अखाल तख्त च्या बाजूने गेला त्यामागे सैन अखाल तख्त मुख्य टार्गेट होतं कारण तिथेच जनरल सिंग भिंडारवाले आणि त्याचे जास्तीत जास्त सोबती तिथेच होते. अखाल तख्त वरुन प्रचंड गोळीबार झाला, २००-३०० भाविकांना (18/n)
त्यांनी बंदी बनवलं होतं त्यांना ढाल बनवून गोळीबार करत होते तरी आपले सैनिक त्यांना उत्तर देत होते शेवटी सुवर्ण मंदिरावर ताबा मिळवण्यात सैन्य यशस्वी झाले.
दमदमी टकसाल च्या लोकांना मारण्यात आलं, जनरल सिंग भिंडरावाले चा खात्मा झाला या घटने नंतर असे सशस्त्र उठाव करण्याची (19/n)
मजल नाही झाली कोणाची. पण या एका operation blue Star साठी आपले ८३ जवान शहीद झाले. १ जूनला तिथे आलेल्या ४९२ भाविकांचा बळी गेला.
८ जून १९८४ ला operation संपलं. पण आपल्या सैन्याची महानता बघा पुर्ण मंदिराची साफ- सफाई करुन १५ जूनला मंदिर समितीकडे सुपुर्द केलं.

(20/n)
यानंतर बर्‍याच अफवा पसरवण्यात आल्या कि मंदिरात दारु वगैरे पिण्यात आली वगैरे पण हे साफ खोटं आहे भारतीय सैनिक हे कदापि करू शकत नाही.
दमदमी टकसाल इथं संपली नाही. या घटनेच्या ४ महिन्या नंतरच इंदिरा गांधींना IB & RAW कडून सतत सांगण्यात येत होतं कि तुम्हाला तुमच्या अंगरक्षकाकडून (21)
धोका आहे त्यांची बदली करा पण इंदिरांनी मान्य केलं नाही त्यांचं म्हणणं आपण एका धर्मनिरपेक्ष देशात राहतो कोणाच्या धर्मावरून त्यांच्यासोबत वागणं योग्य राहणार नाही.
पण कट करून ३१ आॕक्टोंबर १९८४ रोजी सकाळी ९:२९ मिनिटांनी सतवंत सिंग आणि बेवंत सिंग दोघांनीही गोळ्या झाडून (22/n)
इंदिरा गांधींची हत्या केली त्याचवेळी त्यांचा गाडीचालक सुध्दा गैरहजर होता त्यांना AIMS येथे आणण्यात आलं आणि प्राण गेलेत हे जाहीर करण्यात आलं. सतवंत सिंग ला फाशी झाली बेवंत सिंगला जाग्यावरच ठार करण्यात आले.

१९८६ :-operations blue Star च्या वेळी होते अरूण कुमार वैद्य जे
भारताचे भुदल प्रमुख होते त्यांची रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची SP चौक पुणे येथे हरदिपसिंग आणि सुखदेव यांनी गोळ्या झाडून हत्त्या केली दोघांनाही फाशी झाली.

२०१२ :- K. k. Brar यांच्यावर इंग्लंड मध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. (24/n)
अजूनही दमदमी टकसाल संघटनेचे कार्यकर्ते अजूनही अस्तित्वात आहेत.

Source :- operation blue Star by k k brar/ internet
Picture:- Google. (25/n)
You can follow @kahipnapl13.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.