येत्या ३ नोव्हेंबरला अमेरिकेच्या निवडणूकीचा सोक्षमोक्ष लागेल..आत्ता सध्या अमेरिकेत निवडणूकीची धामधूम चालली असुन तुम्हाला माहिती त्याप्रमाणे #अमेरिका मध्ये दोनच पक्ष आहेत.. #RepublicanParty#DemocraticParty..
Republican कडुन #DonaldTrump आहेत तर Democratic कडुन #JoeBiden
#म #रिम
सुरूवातीला दोन्ही पार्टींचा इतिहास...
सर्वप्रथम एक लक्षात घ्या की अमेरिका‌ हा जगातील पहिला देश आहे ज्याने लिखीत राज्यघटना लिहीली..आता पार्टींबद्दल जाणुन घेऊ.
#DemocraticParty च चिन्ह 'गाढव' असुन त्याच्यामागे इतिहास आहे.सुरूवातीला डेमोक्रेटिकचे उमेदवार मत मागायला गेले की
लोक त्यांना गाढवं म्हणायचे.ते इतक प्रसिद्ध झाल की पक्षाने त्यांचे चिन्हच गाढव घेतले..थोडक्यात कॉंग्रेसने मोदींना 'चौकीदार चोर है' अस म्हणुन म्हणुन प्रसिद्ध केल्यावर मोदींनी त्याचाच वापर कॉंग्रेसविरुद्ध केला आणि स्वताच 'मै भी चौकीदार' म्हणायला सुरुवात केली..अगदी तसेच.. #म #रिम
डेमोक्रेटिक चा रंग निळा असुन नकाशावर जे चौकोन निळे असतील ते या पक्षाचे.
#RepublicanParty चे चिन्ह 'हत्ती' आहे.जेव्हा अमेरिकामध्ये गृहकलह चालु होता तेव्हा रिपब्लिकन वाल्यांनी कलह थांबवला.हत्ती एखादी गोष्ट थोपुन धरायला खुप ताकदवान असतो म्हणुन यांनी 'हत्ती' हे चिन्ह निवडले.. #म #रिम
रिपब्लिकन चा रंग लाल असुन नकाशामध्ये जेव्हढे लाल चौकोन दिसतात ते सर्व रिपब्लिकन या पक्षाचे..
चौकोन म्हणजे राज्य..ज्या ठिकाणी रिपब्लिकन जिंकली ते सर्व लाल राज्य( #redstate)..ज्या ठिकाणी डेमोक्रॅटिक जिंकली ते सर्व निळे राज्य( #bluestate)..२००० सालापासुन रंग वापरायला सुरुवात झाली #म
आपण ट्रंप व बिडेन यांची व यांच्या पार्टीची माहिती घेऊ..
प्रथम #republicanparty म्हणजेच #DonaldTrump यांच्याबद्दलचे ठळक मुद्दे जाणुन घेऊ..
१)या पक्षात लिंकनसारखी महान व्यक्ती होऊन गेली.ज्यांनी लोकतंत्र व ब्लॅक लोकांसाठी आयुष्य वेचलं.
२)हा पक्ष श्रीमंत लोकांना उचलुन धरणारा पक्ष आहे
३)या पक्षाचे उद्दिष्ट आहे की कर(टॅक्स) कमी करावा कारण कर भरणारे श्रीमंत लोकं आहेत व वरच्या मुद्द्यात मी सांगितलच आहे.
४)हा पक्ष ईसाई(christian),यहुदी(jew) व भारतीय लोकांना उचलुन धरतो..आणि अलिकडेच भारतीयांना जास्त उचलुन धरलय कारण चीन😄🙏
५)हा पक्ष म्हणतो कर कमी घ्या पण भत्ते जास्त
द्या म्हणजे आरोग्य भत्ता इ.
६)या पक्षाची सगळ्यात चुकीची मागणी कोणती तर देशाच्या प्रत्येक नागरिकाकडे हत्यार,बंदुका पाहिजे.अमेरिकेच्या संविधानातच उल्लेख आहे की जर सरकारने सशस्त्र बंड केलाच तर नागरिकांकडेही हत्यार पाहिजेत ज्यामुळे ते सरकारला विरोध करू शकतील..पण याचे दुष्परिणाम
सांगायचे म्हणले तर ५वी६वी च्या मुलांकडेही बंदुका असतेत.आपण अमेझाॅन,फ्लिपकार्ट वरून ज्याप्रकारे हु म्हणुन सामान घेतो अगदी तसच तिकडं कोणीही बंदुका घेऊ शकत..मध्ये एका मुलाने ब्रेकअप झाल म्हणुन मुलीला गोळी घातली..एका शिक्षकाने गृहपाठाबद्दल विद्यार्थ्याला खडसावलं तर त्याने सरांना गोळी
मारली..ट्रंपना याबाबतीत विचारल असता महाशय म्हणतात,"त्या सरने पण सोबत बंदुक ठेवायला पाहिजे होती"😅 धन्य रे देवा🙏😅
७)ट्रंप यांनी #Usfirst साठी व्हिसाला खुप कडक करायचे ठरवले आहे.अस नाही की फक्त भारतापुरते तर संपूर्ण जगासाठीच..जे साॅफ्टवेअर इंजिनिअर इ. लोक #H1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात त्यांच्यावरही लिमिटेशन लादायच चालु आहे.
८)पर्यावरणाबाबतीतही ट्रंप गंभीर नाहीत जसेकी पॅरिस करारमधुन माघार...
आता #DemocraticParty म्हणजेच #JoeBiden यांचे वरिल मुद्द्यांबाबत मत जाणुन घेऊ..प्रत्येक मुद्द्याची वर तुलना करा म्हणजे समजायला सोपे जाईल.
१)या पक्षात आत्ताच एक महान राष्ट्राध्यक्ष होऊन गेले..ते म्हणजे बराक ओबामा..व सर्वात महत्त्वाचे की बिडेन तेव्हा उपराष्ट्राध्यक्ष होते.
२)हा पक्ष मध्यमवर्गीयांसाठी झटणारा पक्ष आहे.(वस्तुस्थिती वेगळी असली तरी असच म्हणायचं 😜)
३)या पक्षाच म्हणणं आहे की कर जास्तीत जास्त गोळा केला पाहिजे कारण संपुर्ण देश हा लोकांकडून मिळणार्या करावरच चालतो..
४)हा पक्ष ईसाई,मुस्लिम व ब्लॅक(कृष्णवर्णीय) लोकांना उचलुन धरतो.. #BlackLives
५)या पक्षाच म्हणणं आहे की भत्ता नावाचा प्रकार शक्यतो कमीच असावा..
६) डेमोक्रेटिक पक्षाची सगळ्यात जास्त योग्य मागणी ही आहे की तो पक्ष सरसकट हत्यारांना विरोध करतो..त्यांचे म्हणणे आहे की ज्यांना खरच हत्यार बाळगायची गरज आहे अथवा सक्षम लोकांनाच हत्यार ठेवण्याची परवानगी देण्यात यावी..
७)बिडेन यांच्यामते अमेरिकेत बाहेरून स्थलांतरित लोकं आली पाहिजेत जेणेकरून देशात स्पर्धा वाढिस लागेल व देशाची प्रगती साधता येईल..स्थलांतरित लोकं स्वताच्या बुद्धीकौशल्यावर निवडलेले असतात.त्यांना टाळणे कितपत योग्य.
८)बिडेन म्हणतात पर्यावरणाला वाचवणे,जोपासणे आपली सामुहिक जबाबदारी आहे.
आज थोडा बेसिक फरक सांगितला असुन उद्या नवीन थ्रेडमध्ये ट्रंप व बिडेन यांचा जगाबद्दलचा दृष्टिकोन काय आहे व खासकरून दोघांचे भारताबद्दल आणि भारतीयांचे(तिकडचे देखील) दोघांबद्दल काय मत आहे जाणुन घेऊया
🙏💯🔥✌️
#म #मराठी #लिम #USElections2020
@MarathiDeadpool @gpekmaratha @ImLB17
You can follow @realkunal7.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.