#आजचा थ्रेड 01-11-20
विम्बल्डन सेंटर कोर्टपासून दक्षिणेला एक - दीड किलोमीटर चालत गेल्यावर विम्बल्डन हायस्ट्रीट लागतो. ह्या हायस्ट्रीटवर बरीच छोटीछोटी दुकानं आणि रेस्तरॉं आहेत. इथल्या २१ए नंबरमध्ये ‘ब्रू’ नावाचं एक छोटंस रेस्तरॉं आहे. हे रेस्तरॉं हा आजचा विषय नाहीये.
विम्बल्डन सेंटर कोर्टपासून दक्षिणेला एक - दीड किलोमीटर चालत गेल्यावर विम्बल्डन हायस्ट्रीट लागतो. ह्या हायस्ट्रीटवर बरीच छोटीछोटी दुकानं आणि रेस्तरॉं आहेत. इथल्या २१ए नंबरमध्ये ‘ब्रू’ नावाचं एक छोटंस रेस्तरॉं आहे. हे रेस्तरॉं हा आजचा विषय नाहीये.
आजचा विषय आहे त्या रेस्तरॉंवर असलेली - इंग्लिश हेरिटेजने लावलेली - एक छोटीशी निळी गोल पाटी. ह्यावर लिहीलंय की ‘Sister Nivedita (Margaret Noble) 1867 - 1911 Educationalist and Campaigner for Indian Independence lived here’
(भावार्थ: भगिनी निवेदिता (मार्गारेट नोबेल) १८६७-१९११ शिक्षणतज्ञ आणि भारतीय स्वातंत्र्याच्या प्रचारक इथे रहात होत्या)
मार्गारेट नोबेलचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ चा. आईवडील स्कॉटीश पण अनेक पिढ्या आयर्लंडमध्येच राहिलेल्या. आपण शिक्षिका व्हावं हे मार्गारेटचं स्वप्न.
मार्गारेट नोबेलचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ चा. आईवडील स्कॉटीश पण अनेक पिढ्या आयर्लंडमध्येच राहिलेल्या. आपण शिक्षिका व्हावं हे मार्गारेटचं स्वप्न.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी - १८८४ मध्ये - तिने शिक्षिकेची नोकरी पत्करली. नोकरीनिमित्त ती अनेक भागांत राहिली. शेवटी १८९१ मध्ये ती विम्बल्डनमध्ये तिच्या आईसोबत रहायला आली. (ह्याच घरावर ती निळी पाटी आहे.) नोव्हेंबर १८९५ मध्ये लंडनमध्ये ३ महिने वास्तव्यासाठी आलेल्या
स्वामी विवेकानंदांना ती पहिल्यांदा भेटली. त्यांच्या उपदेशावरून ती १८९८ मध्ये पहिल्यांदा कलकत्त्याला गेली. २५ मार्च १८९८ रोजी विवेकानंदांनी तिला ‘भगिनी निवेदिता’ हे नाव आणि आजन्म ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. ‘रामकृष्ण मिशन’ च्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा होता.
वंदे मातरम्’ हे गीत शाळांमध्ये प्रार्थना म्हणून म्हणायची कल्पना हिनेच सर्वप्रथम अंमलात आणली. भारतात भारतीयांना भारतीय पध्दतीने शिक्षण दिले जावे ह्याबद्दल ती आग्रही होती. हिंदू तत्वज्ञान आणि विशेषकरून वेदांत ह्यांच्या अभ्यासात तिला विशेष आवड होती. हिंदू धर्म आणि तत्वज्ञानावर हिने
दहापेक्षा जास्त पुस्तकं लिहीलेली आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी बनलेली बंगालमधील सर्वप्रथम क्रांतीकारी संस्था - ‘अनुशीलन समिती’मधल्या क्रांतिकारकांच्याही ती खास संपर्कात होती. लपूनछपून त्यांना ती मदत करत होती. १९०५ सालच्या बंगाल फाळणीविरोधात तिने तिच्या भारतातल्या आणि
इंग्लंडमधल्या भरपूर ओळखी वापरून क्रांतीकारकांना अनेकदा गुप्त बातम्या पुरवल्या. डॉ ॲनी बेझंट आणि ऑरोबिंदो घोषांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शनही हिनेच केले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ जगदीशचंद्र बोस ह्यांना ती तिचा मुलगा मानत असे.
त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ती वेळोवेळी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करत असे. भारतभर प्रवास करून ती जणू भारताचाच एक हिस्सा बनली होती. १३ ऑक्टोबर १९११ रोजी दार्जीलिंगमध्ये तिचा पोटाच्या विकाराने मृत्यू झाला. तिच्या तिथल्या समाधीवर लिहीले आहे - ‘ही भगिनी निवेदिताची समाधी आहे -
जिने आपले सर्वस्व भारतासाठी दिले’.
२८ ऑक्टोबर १८६७ चा जन्म आणि १३ ऑक्टोबर १९११ चा मृत्यू. ह्या दोन्ही ऑक्टोबरमधल्या तारखा होऊन केलेल्या आहेत पण आज हिंदू धर्म आणि तत्वज्ञान ह्यांचा स्वीकार करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का?
२८ ऑक्टोबर १८६७ चा जन्म आणि १३ ऑक्टोबर १९११ चा मृत्यू. ह्या दोन्ही ऑक्टोबरमधल्या तारखा होऊन केलेल्या आहेत पण आज हिंदू धर्म आणि तत्वज्ञान ह्यांचा स्वीकार करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का?
ते जाऊदे - लॉर्ड मेकॉलेच्या इंग्रजधार्जिण्या शिक्षणपध्दतीला विरोध करून भारतीय शिक्षणपध्दतीचा प्रचार करणारी मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का? तेपण जाऊ दे - बंगालच्या क्रांतिकारकांसोबत मिळून भारताला इंग्रजी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणारी
मार्गारेट नोबेल आपल्या कोणाच्या लक्षात आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. पण ह्याने काय फरक पडतो? जाऊ दे ना. आपण आपल्या दिनक्रमांत मस्त राहूयात. चित्रपटांबद्दल - राजकारणाबद्दल आणि राजकारण्यांबद्दल - आयपीएलबद्दल -
आणि तत्सम अनेक निरर्थक विषयांवर आपली आपापसातली वंध्य चर्चासत्रे आपण चालू ठेवूयात. आपल्या संपूर्ण विस्मरणात गेलेल्या मार्गारेट नोबेलसारख्या प्रभृतींची यादी ‘इंग्लिश हेरिटेज’ ठेवतं आहेच की. मग झालं तर! आपण कशाला आपला बहुमूल्य वेळ असल्या फालतू गोष्टींत घालवा - नाही का?
- संकेत कुलकर्णी (लंडन)