सलीम अली - The Birdman Of India

एक पक्षी विशेषतज्ञ म्हणून, संपूर्ण आयुष्य पक्षींसाठी समर्पित करणार्‍या आणि भारतवर्षाच नाव साता समुद्रापार चमकवणार्‍या पद्मभूषण आणि पद्मविभूषण 'सलीम अली' यांच्या बद्दल आज आपण या थ्रेड मध्ये जाणून घेणार आहोत.
#म #रिम #सलीम_अली
अजूनही बर्‍याच जनांना यांबद्दल माहीती नाहीय म्हणून छोटासा प्रयत्न! या महानायकाचं या क्षेत्रात कामच इतकं मोठं आहे की मी या लेखात मांडू शकत नाही तरी थोडक्यात मी यांचा जीवनपट तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय! भारतीय उपखंडात विविध पक्षींवर अध्ययन,अभ्यास, दुर्मीळ आणि माहीत किंवा+👇
न शोधलेल्या पक्षींवर आधारीत ग्रंथ आणि शोधनिबंध त्यांनी लिहीले आहेत.
सलीम अली यांचा जन्म १२नोव्हेंबर १८९६ साली मुंबई येथील मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील! त्यांचं पुर्ण नाव सलीम मोईनूद्दीन अब्दुल अली असं आहे. लहानपणीच वयाच्या दोन वर्षांच्या आतच त्यांचे आईवडील मरण पावले, त्यांचा+👇
सांभाळ हा त्यांचे मामा अमीरूद्दीन यांनी केला. सगळ्यात धाकटे असणारे सलीम यांनी वयाच्या दहाव्या वर्षी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळली. पण हा नक्की कोणता पक्षी आहे हे त्यांना समजेना म्हणून त्यांनी आग्रह धरून मामांच्या मदती व शिफारसीने पत्र लिहून मुंबईतील बाँबे नॅचरल+👇
हिस्टरी सोसायटीच्या कार्यालयात गेले आणि तेथे त्यांना पक्षींविषयी सर्व माहिती मिळाली! आणि तेथूनच त्यांच्या पक्षीप्रवासाला सुरूवात झाली. १९१३ साली मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स मधून प्राणीविज्ञानाची पदवी बीए आॅनर्स संपादन केली. +👇
त्यावेळी या पदवीला विद्यापीठाच्या पदवीइतकं महत्व नसे. त्यामुळे त्यांना भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत नोकरी मिळाली नाही. मग काही दिवसांनी त्यांनी बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या व्याख्याते पदी नोकरी मिळाली मग दोन वर्षांनी ते पुढील शिक्षणासाठी जर्मनीत बर्लिन +👇
विद्यापीठात गेले आणि त्यांची तिथे ओळख झाली Erwin Stresemann या पक्षीतज्ञाशी मग पुढे त्यांनी त्यांच्या सोबत पक्षी अध्ययन चालू ठेवले आणि काही वर्षांनी १९३१ साली ते भारतात परतले आणि बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या उपकार्यावाह आणि अध्यक्ष पदी नियुक्त झाले.+👇
या सोसायटीच्या मदतीने आणि वॉन थो या छायाचित्रकार मित्राच्या सहाय्याने त्यांनी हैद्राबाद पक्षीनिरीक्षण, त्रावणकोर-कोचीन पक्षी सर्वेक्षण, अफगाणिस्तान पक्षी सर्वेक्षण आणि कैलास मानसरोवर पक्षीयात्रा अशा बऱ्याच मोहिमा पार पाडल्या. सलीम अली यांनी बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या +👇
मदतीनेच सुगरण पक्षी विषयी अध्ययन केले तो घरटी कसे बांधतो, वीणण्याची पद्धत आणि ऋतू परिवर्तनानूसार त्याचात होणारे बदल व सवयी याबद्दलच पुष्कळ माहीत गोळा केली. जॉन हॅरेल कुक या पक्षीतज्ञ मित्राच्या मदतीने त्यांनी हिमालयातील 'फिंस बाया' या दुर्लभ पक्षीचा शोध लावला.+👇
आणि कच्छ मधील फ्लेमींगो पक्षी याबद्दल आणि लढाकमधील काळ्या मानेचा सारस याचा शोध १९७६ मध्ये लावला, आणि महत्वाचं म्हणजे माळढोक पक्षीबाबत विस्तृत माहिती मिळवली. पक्षींच्या जीवनात होणारे ऋतुनूसार बदल, खानपानाच्या सवयी, स्थलांतर करणार्‍या पक्षींचा व्यवहार, +👇
मानवी प्रवृत्तीचा हस्तक्षेप त्यामुळे येणारं पक्षींमधील वर्तन याबद्दल देखील त्यांनी बरीच माहिती संग्रहीत केली. सलीम अली यांनीच इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ ची भारत सरकारच्या मान्यतेने स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉईंट कॅलीमर +👇
हरिके लेक ही पक्षी अभयारण्ये निर्माण झाली. १९७७ मध्ये त्यांनी सायलेंट व्हॅलीच्या रक्षणासाठी जागृत मोहिम हाती घेतली व त्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी केंद्र शासनाकडे पर्यावरण खाते सुरू करावे यासाठी आग्रह धरला.
सलीम अली यांनी लिहीलेली पुस्तकं -
१. द बुक ऑफ इंडियन बर्ड्‌स १९४१ +👇
२. द बर्ड्‌स, ऑफ कच्छ
३.इंडियन हिल  बर्ड्‌स
४. द बर्ड्‌स, ऑफ त्रावणकोर-कोचीन
५. द बर्ड्‌स, ऑफ सिक्किम
ए फिल्म गाईड टू द बर्ड्‌स ऑफ द ईस्टर्न हिमालयाज
७. पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्‌स,ऑफ इंडिया अ‍ॅड सबकाँटिनेंट +👇
८. हँडबुक ऑफ बर्ड्‌स, ऑफ इंडिया अँड पाकिस्तान - [ लेखक- सलीम अली आणि दिलन रिपली ]
९. द फॉल ए स्पॅरो १९८५
आणि बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या हॉर्नबील मासिकपत्रीके मध्ये त्यांचे बरेच लेख आहेत. +👇
सलीम अली यांना मिळालेले पुरस्कार -
१. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेचे जॉयगोविंद लॉ सुवर्णपदक (१९५३)
२. ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन संस्थेचे सुवर्णपदक (१९६७)
३. इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे सुंदरलाल व्होरा मेमोरियल मेडल (१९७०) +👇
४. रशिया अ‍ॅकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सचे पावलोव्हस्की सेंचनरी मेमोरियल मेडल (१९७३)
५. नेदर्लंड्सचा ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब (१९७३)
६. इंटरनॅशनल जे. पॉल गेट्टी प्राईझ फॉर वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन (अमेरिका, १९७६) +👇
७. इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमीचे सी. व्ही. रामन पदक (१९७९)
८. भारत सरकारचा वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशनबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार ( सुवर्णपदक १९८३)
९. नेदर्लंड्सचा क्रमांडर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब (१९८६)
१०. जागतिक वन्य प्राणी निधीतर्फे ‘ स्कॉल ऑफ ऑनर ’ (१९८७) +👇
आणि निसर्ग आणि वन्य जीव यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल दादाभाई नौरोजी पारितोषिक (१९८७) असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांना अलिगढ विदयापीठाने १९५८ मध्ये आणि आंध विदयापीठाने १९७८ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडिया चळवळीचे संस्थापक होते. +👇
भारत सरकारने त्यांच्या या महान कार्यासाठी १९५८ साली 'पद्मभूषण' आणि पद्मविभूषण १९७६ साली देऊन गौरव केला. सलीम अली यांनी २० जून १९८७ साली मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
सलीम अली यांच्यामळेच पुढे तमिळनाडू राज्यात कोईंबतूर येथे त्यांच्या नावाने +👇
द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी ( SACON ) ही संस्था सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्यात चोडण बेटावरील ‘डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य' उभारण्यात आले.
तर असे होते हे सलीम अली आणि त्यांचा पक्षीप्रवास आणि पक्षीप्रेम. आज आपण जी पक्षी अभयारण्य पाहतो ती यांच्याच +👇
कार्याची पोचपावती आहे.
आणि एक सांगण्यासायखी गोष्ट म्हणजे सलीम अली यांचा लूक २०१८ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांच्या अक्षय कुमार आणि रजनीकांत अभिनीत #2Point0 मध्ये अक्षय कुमारच्या लूक साठी संदर्भिला होता.

साभार - गुगल बाबा/विकासपिडीया
You can follow @irajratna.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.