#Thread

विषय - मोदींचे हिंदुत्व

भाजप हा पक्ष राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या दोहोंच्या प्रेरणेतून स्थापन झालेला आहे.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून भाजपचा हिंदुत्व कडे जोर आणखीनच वाढला.आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी हे "हिंदुहृदयसम्राट"
म्हणून ओळखले जाऊ लागले. पण मोदींचे हिंदुत्व हे खूप आधीपासूनच जहाल आणि प्रखर आहे. आता ते जाणून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल.

🔸 १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने फक्त २ जागा जिंकल्या. १ गुजरात (महेसणा) आणि १ आंध्र प्रदेशात.

🔸 तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत मागितली. मग त्यावेळी संघाने नरेंद्र मोदींना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पाठविले.

🔸 भाजप हा आपली विचारधारा खोलवर रुजवण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हे अहमदाबाद भाजपचे
शहराध्यक्ष होते. तेव्हा शाहाबानो प्रकरणावरून गुजरातेत अनामत आंदोलन पेटले होते व नंतर त्याचे रूपांतर हिंदू- मुस्लिम दंगलीत झाले. हीच ती वेळ होती जेव्हा भाजपने हिंदुत्वाचा नारा बुलंद ठेवत हिंदूंची साथ दिली होती.

🔸 नंतर त्याचे फळ भाजपला मिळाले सुद्धा...१९८५-८६ च्या अहमदाबाद
महानगरपालिकेची निवडणूक याच हिंदू- मुस्लिम वर लढली गेली जिच्यात भाजपला भरघोस मतं मिळाली. त्यापासून ते आजमितीला काँग्रेसला ३५ वर्षात फक्त एकदाच जिंकली. या सगळ्यामुळे नरेंद्र मोदी हे गुजरातेत हिंदूंचा एक चेहरा म्हणून समोर आले.

🔸 बरोब्बर १६ वर्षांनी, २००१ मध्ये नरेंद्र मोदी हे
भाजपकडून मुख्यमंत्री झाले. २६ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरा कांड झाले त्यात अनेक हिंदूंना जिवंत जाळले गेले. याचा बदला नंतर हिंदूंनी घेतलाच.. त्यामुळे गुजरातमधील मुस्लिम समाज हा हिंदूंना घाबरून जगू लागला. त्यात आणखीन भर म्हणून, मोदींनी गुजरातमधील मुसलमानांचे अवैध धंदे, वीज चोरी,
अवैध वसुली, हिंदूंचे धर्मांतरण यांच्यावर बंदी घातली.

🔸 अखेर २०१४ साली सेक्युलॅरिझमचा दिखावा करून मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर
१) भारतीय राजकारणात मुस्लिम असणे निम्न दर्जाचे झाले.जर भाजपच्या विरोधात कोणी मुस्लिम उमेदवार असेल तर त्यांची हार पक्की..
२) राजकीय पक्षात मुस्लिमांचे
तुष्टीकरण केल्यानंतर त्यांची व्होट पॉवर कमी झाली.

३) पाकिस्तान सोबत व्यापार संपवून त्यांची अर्थव्यवस्था दुबळी केली त्यामुळे भारतातील मुस्लिम आणि इस्लामिक देशांना एक चपराक बसली.

४) पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून त्याला संदेश दिला की.. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.
५) मोदी सरकार कुठल्याही प्रकारच्या मुस्लिम संघटनेच्या दबावाला बळी पडली नाही. मग तो तीन तलाकचा मुद्दा असुदे किंवा तब्लिगी जमातचा मुद्दा असुदे.

६) caa कायदा संमत करून मोदी सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंना भारतात शरण देऊन त्यांचे धर्मांतरण रोखले.
७) कलम ३५(अ) आणि ३७० रद्द करून तसेच काश्मिरी पंडितांना परत जाऊन राहण्याची परवानगी दिल्यामुळे मुस्लिमांचे काश्मीरमधील वर्चस्व आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांचे भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे स्वप्न जवळजवळ संपलेच आहे.
८) आणि आता जर लोकसंख्या नियंत्रण कायदा संमत झाला तर
भारतीय मतदान प्रणालीतून कमीतकमी ६-७ कोटी रोहिंग्या, पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोर हे हद्दपार होणार आहेत. त्यामुळे मुस्लिम केंद्रित राजकारण हे संपूनच जाईल.

ह्याचमुळे मुसलमान हे मोदींचा विरोध करतात आणि मोदींना पण चांगलंच माहिती आहे.
You can follow @Theprasad_2001.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.