ब्रांड/यश काय असतं?

भारतीय माणूस जगात कुठेही गेला, तरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपतिंच्या नावाने ओळखला जातो,ते शिवाजीराजे म्हणजे ब्रांड 🚩

- ४०० वर्षांनंतर देखिल श्री रामदास स्वामींनी लिहीलेली गणपति बाप्पाची आरती कुठेही नं शिकवता ३-४ वर्षाचं मुल गुणगुणतं हे आहे यश🚩👇🏼
काय आहे ब्रांड? यश?

- ज्ञानेश्वरी लिहून २१ व्या वर्षी समाधी घेतली, पण आज ७४५ वर्षांनंतरही जनतेच्या ह्रदयात असलेले संत ज्ञानेश्वर म्हणजे ब्रांड 🚩

- वयाच्या ४० व्या वर्षी जगाला निरोप दिला, एकही युद्ध नं हरलेले, अटके पार भगवा फडकवणारे पेशवा म्हणजे ब्रांड 🚩👇🏼
काय आहे ब्रांड?

- "मेैं अपनी झांसी नहीं दूंगी" हे इंग्रजांना डोळ्यात डोळे घालून सांगणारी, त्यांना सळो की पळो करून सोडणारी झाशीची राणी आहे ब्रांड 🚩

- "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारंच" हे सांगून क्रांति करणारे लोकमान्य टिळक म्हणजे ब्रांड 🚩👇🏼
ब्रांड म्हणजे काय?

- फक्त आपले शब्द आणि लेखनीतून इंग्रजांची झोप उडवून टाकणारे हिंदूह्रदय सम्राट वीर सावरकर म्हणजे ब्रांड 🚩

- भारतातील सामान्य महिलांना उंबरठ्या पलीकडे जायची परवानगी नसताना, पहिली महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे ब्रांड 🚩
ब्रांड म्हणजे काय?

- आपल्या घरी विज नाही म्हणून काय झाले, जिथे विज आहे तिथे जाऊन अभ्यास करीन हे बाल वयात समजलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं जातं, हा असतो ब्रांड 🚩
काय आहे यश?

- वयाच्या ४थ्या वर्षापासनं गायन करून घर चालवून,भावंडांना मोठं केलं. स्वत: गानसम्राज्ञी बनल्या, त्या भारतरत्न लता मंगेशकर आहेत ब्रांड 🚩

- अभ्यासात कच्चा असलं म्हणून काय? स्वप्न आणि जिद्द असेल तर यशाचं शिखर गाठू शकतो, हे शिकवणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे ब्रांड 🚩
काय आहे ब्रांड?

- १९१३ मध्ये भारत पण सिनेमा बनवू शकतो हे जगाला सांगणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे ब्रांड 🚩

हे फक्त मराठी ब्रांड्स, भारतीय ब्रांड्स बद्दल बोलायचंच म्हणलं तर यादी खूप लांब जाईल ज्यात तुम्ही कुठेच नसाल ठाकरे सरकार... 👇🏼
महाराष्ट्र हा तुमच्या एकट्यामुळे उभा आहे असा अभिमान असेल तुम्हाला तर सांगू इच्छीतो,
तुम्हीं छत्रपतिंच्या चरणांची धुळ पण नाहीत.

स्वत:च स्वत:ला ब्रांड घोषित केल्याने कोणी ब्रांड नसतो बनत, त्या साठी कार्य, तपस्या, सेवा, त्याग आणि बरीच बलिदाने लागतात.👇🏼
तुमचं ब्रांड म्हणजे जवाहरलाल नेहरू ने स्वत:ला दिलेल्या भारतरत्ना सारखं आहे,
ज्याला आज कोणी किंमत देत नाही. 😁

स्वाभिमान असावा पण जर तुम्हाला अभिमान झाला असेल तर तुमच्या पतनाचा काळ सुरू झाला आहे आणि काळाला कोणीच रोखू शकत नाही.

- @Ok_Bharatiya 😊🚩
You can follow @Ok_Bharatiya.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.