काल पासून आरक्षण विरोधी खुप पोस्ट बघितल्या.. अगोदर दुर्लक्ष केल पण त्या नंतर संविधान विरोधी पोस्ट आणि व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधून कॉपी पेस्ट केलेले स्टेटस बघुन ह्यांच्या बुद्धीची कीव आली आणि म्हटल चला आपणच ह्यांच्या डोक्यात प्रकाश टाकायला हवा..
1)
पहिले तर व्हाट्सअप युनिव्हर्सिटी च्या जोरावर उडणाऱ्या ताई दादांना मी सांगतो कि बाबांनो 2 रु. किलो तांदूळ हे रेशन कार्ड बघुन देतात आरक्षण बघुन नाही.. 2 रु किलो तांदूळ शेणात आणि 60 रु किलो मातीत उगवतात असं नाही होत.. ह्या 2 रु किलो तांदळाची किंमत तुम्हाला नाही कळणार कारण तुमचा
2)
बाप टॉयलेट साफ करायला जात नाही, तुमची आई इतरांच्या घरी भांडे घासायला जात नाही.. आरक्षण हे जात/धर्म बघुन नाही तर प्रत्येक समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती बघुन दिलेलं आहे आणि तुम्ही 60 रु किलो तांदूळ खाणारे आहात म्हणून तुम्हाला आरक्षण नाही..,
3)
दुसरी गोष्ट अशी कि " घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे जातात " असं तुम्ही म्हणतात तर तुम्हाला गाढवाच्या टोळीत येण्यासाठी एवढी धडपड का..?????.. तुम्ही जातीने जरी मागास नसलात तरी विचारांनी मागास आहात हे हजारो वर्षांपासून तुमच्या बापजाद्यांनी सिद्ध केलेल आहे आणि आज तुम्ही ही केलत..
4)
तुमचे विचार बघुन आता तर मला वाटतंय आरक्षण बौद्धिक दृष्ट्या बघुन द्यायला हवं होत.. नाही का..?

तिसरी गोष्ट अशी कि.. संविधान म्हणतंय जात पात मानू नका.. पण माझा प्रश्न असा आहे तुम्ही संविधान मानता का ???? तुम्ही जात सोडायला तैयार आहात का ?..
नौकऱ्या जाती नुसार
5)
पोलीस केस जाती नुसार
फि माफी जाती नुसार..
तर मंग मंदिरात पुजारी जाती नुसार,
बलात्कार झाल्यावर न्याय जाती नुसार,
बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून अंगावरून गाड्या घालण्यात येतात (शिर्डी सागर शेजवळ प्रकरण )..
रमाबाई नगर हत्याकांड,
नितीन आगे प्रकरण,
आणि दोन दिवस आधी
6)
निळा झेंडा दिसला म्हणून झालेल कन्नड प्रकरण...,

अशे कित्येक बलात्कार आणि हल्ले रोज होतात..
ह्या पलीकडे सर्व शाळा तुमच्या, कॉलेज तुमचे, एवढया जमिनी तुमच्या..
एवढं असून तुमच्या कडे गणपती, दिवाळी, दसरा, असे कित्येक सण व बेकायदेशीर हुंडा घ्यायला पैसे आहेत पण फि भरायला
7)
नाही..
कित्येक लोकांना EBC व पंजाबराव देशमुख सारख्या स्कॉलरशिप मिळतात..
आणि कोणत्या 99% वाल्याला admission मिळालं नाही त्याला आधी आमच्या पुढे आना समस्त आंबेडकरी समाज त्याची दखल घेईल..
एका category मध्ये एक नाही तर अनेक जाती येतात आणि आम्हाला मार्क कमी लागत असतील तर
8)
जागा हि कमीच असतात..
तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर ते तुम्ही सरकार ला मगा पण संविधानावर बोट ठेऊ नका..
संविधान पटत नसेल तर खुशाल तुमच्या समाजा साठी मनुस्मृती लागू करा..
9)
जोपर्यंत जाती आहेत, जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण राहणार..
तुम्ही जात सोडा आम्ही आरक्षण तुमच्या तोंडावर फेकून मारुत..!
👊 रोखठोक...
" जय संविधान 🇮🇳 जय भीमच "....

✍ #Shreya_wathore..
You can follow @Jollybo71936649.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.