#मराठीमीडिया
सप्टेंबर 2018 ची घटना आहे न्यूज 18 लोकमत चैनल ने टीआरपी वाढावा म्हणून खटाटोप सुरू केला होता त्याच खटाटोपातून राफेल प्रकरणात शरद पवारांची मुलाखत घेतली गेली,निरगुडकर यांनी राफेलचा बाण शरद पवारांच्या दिशेने फेकला,त्यावर पवारांनी शब्दाचे बाण फेकत आम्ही कुठं आरोप केलाय
पण
मोदींनी स्पष्टीकरण द्यावे असं म्हंटलं होत,काहीतरी खळबळजनक करण्याच्या नादात निरगुडकरांनी या वाक्याचा निष्कर्ष काढत,शरद पवारांची राफेल वरून नरेंद्र मोदींना क्लीनचीट असा शब्दप्रयोग करत बातमी लावली.

या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली,राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी राजीनामा ही दिला
पवारांच्या भूमिकेवर नेहमी प्रमाणे संशय व्यक्त केला जाऊ लागला,एकंदरीत या सर्व प्रकरणामुळे शरद पवार चिडले,एकीकडे शरद पवार चिडले असताना असाईनमेंटकडून सुप्रिया सुळे यांना फोन गेला अन त्यांना शरद पवार यांच्या राफेल च्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया मागण्यात आली,त्यावर सुप्रिया सुळे ही जाम
भडकल्या व ही कसली पत्रकारिता म्हणत महिला असाईनमेंटला खडे बोल सुनावले,त्यामुळे न्यूज 18 लोकमत मधील वातावरण आणखी चिघळले,त्यावर महिला असाईनमेंट हेड ने अंतर्गत व्हाटसप ग्रुप वर मॅसेज करून या पुढे शरद पवार,सुप्रिया सुळे,अजित पवार,यांचा कुठलाही कार्यक्रम कव्हर करू नये व
व कोण्या स्ट्रिंजर रिपोर्टर ने कार्यक्रम कव्हर करू का विचारले तरी ही कव्हर करू नका असा पवित्रा घेतला.

हा बहिष्कार सुप्रिया सुळे यांना समजताच त्यांनी न्यूज 18 लोकमत न बघण्याचा व चॅनल वर अघोषित बहिष्कार टाकण्याचा आदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला,त्यामुळे
वातावरण अधिकच तापले व पवार यांनी पॉवर गेम करत प्रकरण वर पर्यंत नेले, वरून दबाव आणला,अगोदरच स्लाइनवर असलेल्या निरगुडकर यांची विकेट पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली,महाराष्ट्रात राजकारण पवाराभोवती फिरते अन पवाराशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही हे निरगुडकर यांच्या लक्ष्यात आले.
पुढच्या काही दिवसात निरगुडकर यांनी पवारापुढं सपशेल लोटांगण घालत लेखी माफीनामा पाठवला,निरगुडकर यांनी माफीनामा पाठवला असला तरी ते प्रकरण लवकर शमण्याची चिन्ह नव्हती,एकंदरीत राफेल प्रकरण शरद पवारांच्या अंगलट येण्या ऐवजी निरगुडकर यांच्या अंगलट आले,अन उदय निरगुडकर यांनी न्युज18 लोकमत
मधून राजीनामा देत बाहेर पडणे पसंत केले,शरद पवारांच्या बाबतीत पहिल्यांदा ताठर भुमीका घेणाऱ्या उदय निरगुडकर यांनी शेपूट घातल्याने न्युज18 लोकमत चे कर्मचारी मात्र अस्वस्थ होते.

ही अशी आहे आमची मराठी मीडिया आहे,अर्णबच्या बाबतीत ही राज्य सरकारने बऱ्याच पातळीवर आकांडतांडव केला पण
वाकेल तो अर्णब कसला तो या सर्वांना पुरुन उरेल,अन राज्य सरकारने अर्णब च्या नादी लागू नये कारण तो खांडेकर अथवा निरगुडकर नसून अर्णब गोस्वामी आहे.

#sanket_naragude_reddy_post
You can follow @piyushhh100.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.