व्यवसायाच्या सुरूवातीला आमचे ठराविक असे एक दोन खुप मोठे आणि महत्वाचे ग्राहक होते...(आजही ते तेवढेच महत्वाचे आहेत) एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बाॅस बदलून आले. एक महिनाभर होऊनही ते मला टाळत होते.

मला ते अगदी स्पष्ट जाणवतही होते..
1/18

#MyStory #BusinessDots #सत्यकथा #मराठी #म
मी तासन् तास त्यांच्या ॲाफिसच्या बाहेर वाट पहात बसायचो,त्यांना ते दिसायचेही पण ते वेळ द्यायचे नाहीत.

आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी जे तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव जो आमच्याकडे होता तो अगदी भारतातल्या सर्वात मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता. 2/18
व्यावसायिक दृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो पण काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते..
नजरानजर झाली तरी ते इतक्या खालच्या पातळीने पहायचे की माझीच मला लाज वाटायची..आणि मी ओशाळून जायचो, तिथले ॲाफीसबाॅय,रिसेप्शनचे लोक ही मला हसायचे,हळूहळू मला काय कळायचे ते कळाले होते.3/18
माझ्यासमोर खुपच मोठा पेच होता... नविनच व्यवसाय, नवे ॲाफिस घेतलेले, कामगार वाढविलेले, मशिन्स घेतलेल्या आणि आता हा रोजचा अपमान....

बरं तो ही सहन करत होतो, पण हाती काहीच लागत नव्हते... समोर फक्त अंधार दिसत होता... त्या कंपनीतील बऱ्याच जणांना फोन लावले पण काही ऊपयोग नाही. 4/18
आतापर्यंत आपल्याबरोबर असे काही होईल याचा कधी विचारच केला नव्हता, प्रामाणिकपणे फक्त काम,काम आणि काम..
पण आता वेगळा विचार करण्याची वेळ आली होती.आम्ही आहे ते मनुष्यबळ अन तंत्रज्ञान वापरून दुसऱ्या दोन क्षेत्रात वेगाने प्राॅडक्ट डेव्हलपमेंट सुरू केली,५/६ दिवस तर मी घरीच गेलो नाही 5/18
लोकांचे स्किल बिल्डिंग,ट्रेनिंग झाले आणि काही नव्या ॲार्डर्सही घेतल्या.

१५ दिवसात दोन नव्या दिशांचा शोध लागला म्हणा..आता आत्मविश्वास वाढला होता आणि पुढच्या काही योजनाही तयार झाल्या.

त्यातीलच एका योजनेचा भाग म्हणून मी परत एकदा त्याच साहेबांना फोन केला अन भेटीची वेळ मागितली 6/18
आश्चर्य म्हणजे त्यांनी लगेच अर्ध्या तासाच्या आत भेटायला ये म्हटले,

तो तसा ४५ ते ५० मिनीटांचा प्रवास पण मी स्वत: ड्रायव्हींग करत अत्यंत वेगाने त्यांच्या ॲाफिसमधे पोहचलो आणि पाच मिनिटे आधीच त्यांच्या केबिनबाहेर ऊभा राहिलो.(मनातल्या मनात माझे काय करायचे ते ठरले होते)
#MyStory 7/18
तब्बल दोन तासांनी त्यांनी इशाऱ्याने मला आत बोलावले आणि परत एकदा माझ्याकडे एकदम तुच्छतेने पहात-

“आमच्याकडे लोकांना काही अक्कल नाही, त्यामुळे तुम्हाला ॲार्डर मिळत होत्या आता इथून पुढे तुम्ही L1 (सर्वात स्वस्त) असाल तरच या कंपनीत यायचे अन्यथा नाही.” असे ते एका दमात बोलले.

8/18
आता माझा नंबर होता- “मी आपल्यासोबत काम करू नये अशी जर तुमची इच्छा असेल काही हरकत नाही...तुम्हाला जिथून योग्य वाटेल तिथून आपण काम करून घ्या”
(मी हाताने माझे व्हिजीटिंग कार्ड सरकावले) आणि पुढे म्हटले
“काही अडचण आली तर हे माझे कार्ड, मला केंव्हाही परत बोलवा मी नक्की येईन कारण 9/18
या कंपनीने गेली दिड वर्षे मला, माझ्या सहकाऱ्यांना आणि कुटूंबालाही सांभाळलेय...” माझ्या या अनपेक्षित, थंड, शांत प्रतिक्रियेनंतर ते साहेब अचानक अस्वस्थ झाले.

तसा मी क्षणाचाही विलंब न करता म्हटले, “सर आपली आता सुरू असलेली किंवा पुर्वी झालेल्या कामांचीही काळजी करू नका. 10/18
मी ती पुर्ण करूनच देईन आणि पुढेही आपल्याला कायम सर्व्हिस देईन.”

खरेतर ही मिटींग माझ्यासाठी सर्वात निर्णायक होती!

साहेबांना काय बोलावे हे समजत नव्हते, त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, मी तेव्हढ्यात माझी खुर्ची सर्रकन मागे सरकावून ऊठलो, शेकहॅंडसाठी हात पुढे केला आणि 11/18
नम्रपणे त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले, पण आता तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता....त्यांना अगदी खरोखर घाम फुटला होता, मी असे काहीतरी म्हणेन याचा त्यांना तिळमात्रही अंदाज नव्हता.

ते खाडकन जागेवरून ऊभे राहिले आणि एकदम जोरात ओरडले 12/18
“ही कसली पद्धत? असे कसे तुम्ही जाऊ शकता, आता अचानक आम्ही काय करू? वरिष्ठांना काय सांगू? आमच्याकडे तर अजून पर्यायी व्यवस्था पण केलेली नाही, आम्ही खुप मोठ्या संकटात पडू, तुम्ही आम्हाला या वेळी मदत केलीच पाहीजे.”

मी सन्मानपुर्वक त्यांच्या डोळ्यात पाहून पाॅज घेत हलकेच म्हणालो 13/18
“बसा,आता आपण शांतपणे बोलुया” आणि मला माझी “योजना” सफल झाल्याची जाणीव स्पष्टपणे साहेबाच्या घाबऱ्याघुबऱ्या चेहऱ्यावर दिसत होती.

खरे पाहता मी हे सर्व जाणीवपूर्वक केले होते, पण त्यासाठी माझी पुर्वतयारीही जोरदार होती.मानसिक शांतता,कष्ट करायची तयारी आणि त्याला बुद्धीची जोड असेल 14/18
तर दहाही दिशा तुम्हाला मोकळ्या असतात.

अपमान आणि एखाद्याने केलेले दुर्लक्ष हे तुम्हाला नवी ऊर्जा,नवी कल्पना देऊन जातात, आपण त्याकडे नवी संधी म्हणून पाहिले तर काहीच अशक्य नाही.

मी तर अगदी मनापासून त्यांचा कायम ऋणी आहे कारण त्यांच्यामुळे अत्यंत कमी वयात पायाखालची जमीन सरकणे 15/18
म्हणजे काय हे कळाले होते, आणि त्यामुळेच आमच्याकडे मल्टी प्रॅाडक्ट बास्केटचा जन्मही झाला.

संकट आली कि आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देत बसतो किंवा दुसऱ्यांनाच प्रश्न विचारायला लागतो, त्या ऐवजी अशा वेळी शांतपणे उत्तर शोधायचे, यशाचा तोच हमखास मार्ग असतो...

#MyStory #मराठी 16/18
संकट संधी घेऊन येत असतात, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा.

फक्त समोर दिसतोय त्या प्रश्नापलिकडे पहायला शिकायचे,आणि सर्वात महत्वाचे स्वत:वरचा विश्वास आणि मनाचे संतुलन कायम ठेवायचे. सर्वात समर्पक उत्तर अगदी सहज सापडते.

टिप - त्या साहेबांनाही पुढे जाऊन त्यांच्यामुळे आम्ही कसे 17/18
इतर प्राॅडक्टचीही डेव्हलपमेंट केली आणि चांगला मार्ग सापडला हे काही दिवसांनी सांगितले आणि आभारही मानले त्यांनीही पुढे आमच्या इतरही कंपन्यांना मदत तर केलीच शिवाय आजही ते काही लागले तर मार्गदर्शन करतच असतात. 18/18

#सत्यकथा #मराठी #म

#MyStory #BusinessDots
#WeekendWisdom
You can follow @wankhedeprafull.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.