On Shivsena

१९८०-९० च्या दशाकपर्यंत प्रत्येक छोट्या-मोठ्या नगरात, खेड्यांमध्ये बड्या काँग्रेसी घराण्यांची सत्ता असायची. अशा वातावरणात हॉस्पिटल मध्ये डब्बा पोचवणार, रक्तदान करणार, अपघात झाला तर धावपळ करणार, दंगलींच्या काळात ‘रक्षा’ करणार, गणपतीच्या दिवसात तडीपार असणारा आणि
1/12
एरीयातील सगळ्या महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार तरुणांची विचारपूस करणार; हे युवा नेतृत्व म्हणजे १९९० च्या दशकातील सेना! प्रस्थापित विचार, राजकारण आणि व्यक्ती ह्यांना प्रथम आव्हान रस्त्यांवरच निर्माण होते; शिवसेनेने ते केले.
2/12
हिंसा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सारे प्रश्न सेनेच्या ह्या स्टाइलमध्ये गौण होते. मुंबईतील कामगार संघटनांच्या नावाखाली कम्युनिस्टांची वैचारिक अरेरावी, काँग्रेसचे इंदिरा-केंद्रित राजकारण आणि मुंबईत वाढणारी भाईगिरी ह्यांच्या पोकळीत शिवसेना फोफावली.
3/12
शिवसेनेची ने प्रस्थापितांना बाजूला सारून राजकारणाला खरा लोकतांत्रिक रंग देण्याचे काम केले. गल्लीतल्या युवा ‘नेतृत्वाला’ थेट विधिमंडळात पोचवले. समाजातील बिनचेहऱ्याच्या तरुणांमधले नेतृत्व शोधलेे, मुळात महाराष्ट्राच्या नेतुत्वाचा पिंड बदलला तो ठाकऱ्यांमुळे आणि शिवसेनेमुळे.
4/12
शोकांतिका ही कि मुंबईतील सत्ता, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियता, देशभर असलेली उत्सुकता ह्याचा एका थ्रेशोल्ड च्या पलीकडे कुठलाही सकारात्मक फायदा ना बाळ ठाकरेंना झाला, ना सेनेला, ना महाराष्ट्राला. बाळ ठाकरेंचे नेतृत्व केवळ मातोश्री-मुंबई-मराठी यामध्ये अडकून पडले.
5/12
शिवसेनेची सुरुवात मराठी आणि मराठी माणसांच्या हक्कांच्या रक्षणार्थ झाली. नंतर त्याला हिंदुत्वाच्या रुपात भव्यताही मिळाली. पण शेवटी ठाकरे प्राइवेट लिमिटेड, मातोश्रीचे vested interest आणि मुंबई कोणाची ह्या प्रश्नाभोवती घुटमळत राहिली.
6/12
मराठीचा मुद्दा जरी योग्य असला तरी त्याच्या प्रकटीकरणाची आणि प्रश्नाचे उत्तर शोधून पुढचा मुद्दा हातात घेण्याची कुवत सेनेने कधीच निर्माण केली नाही. सेनेने आपली पूर्ण शक्ती आणि सर्जनशीलता, मराठीचा मुद्दा कसा गंभीर आहे हे सांगून भावनेचा खेळ करण्यातच खर्ची केली.
7/12
मिडिया मधल्या आपल्या ताकदीवर बाळ ठाकरेंनी मथळे बरेच दिले, ‘बांडगुळ’ पत्रकारांनी त्यावर लेखही बरेच रखडले. पण त्यात content व narrative ह्या दोन्हींचा अभाव होता. मुंबईतील मराठी माणसाची लढाई क्लास 3/4 नौकऱ्या, वडा पावची गाडी आणि कल्याण-डोंबिवली ते वसई-विरार एवढीच मर्यादित झाली.
8/12
रस्त्यांवर राडे करून सेना विधिमंडळात, मंत्रिमंडळात पोचली. पण पुढे काय ह्याचे उत्तर लाल किल्ल्यावर भगवा फडकावण्याच्या आणि संसदेत मराठीत शपथ घेण्याच्या पलीकडे गेले नाही. रणनीतीक गोंधळ दिसतो तो येथे.
9/12
रस्त्यांवर राडे करून प्रश्न जरी मांडता येत असला तरी त्याचे उत्तर विधिमंडळात शोधण्याचे कसब सेनेच्या स्टाइल मध्ये बसणारे नव्हते. सैनिकांचे कार्यकर्त्या मध्ये आणि कार्यकर्त्यांचे राज्यकर्त्या मध्ये रुपांतर करण्याची व्यवस्था सेनेने निर्माणच केली नाही.
10/12
जातीपातींच्या पलीकडचे नेतृत्व उभे करणारे, शाखा-आधारित पक्ष उभे करणारे कुशल संगठक आणि प्रस्थापित राजकारणाच्या अरे ला कारे करणारे बाळ ठाकरे ‘पुरोगामी महाराष्ट्राने’ केवळ ‘हिंसक’ आणि ‘अर्वाच्य’ म्हणून नाकारले.
11/12
तर सेनेचा वैचारिक गोंधळ, राजकीय उद्देश्यांचा खुजेपणा आणि रणनीतीक अज्ञान याकडे ‘मराठी माणसाने’ केवळ मराठी म्हणून दुर्लक्ष्य केले. ह्यासारखी शोकांतिका आधुनिक महाराष्ट्राची दुसरी नाही !
12/12
You can follow @AngadFan.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.