#TheEndGame

“एखाद्याला संपवायचं असेल तर त्याला त्याच्या अस्तित्वाचीच भीती दाखवुन आपलंसं करायचं आणि संधी साधून असा वार करायचा की तुकडेच तुकडे!”

अजितदादा नाराज आहेत असं दाखवुन दादांना भाजपासोबत पाठवलं, रातोरात फडणवीसांसोबत हातमिळवणी करून भल्यापहाटे शपथविधी पुर्ण करून घेतला.
इथे शिवसेना शंभर टक्के सैरभर होणार हे पवारांनी व्यवस्थित हेरलं होतं. दोन दिवस हे सरकार चाललं आणि साहेबांनी पुढचा डाव टाकला. वाघाच्या घोड्याला म्हणजे संजुभौलाच दाणा टाकला!

आणि त्यांचाच घोडा त्यांच्यावरच असा चढवला की गोंधळलेल्या सेनेच्या मनात बदल्याची भावना निर्माण करून दिली! 👇🏽
बदल्याच्या भावनेपुढे मैत्री-नातीगोती-तत्त्वं-संस्कार सगळंच शून्य. ही भावना इतक्या पातळीवर नेली की साहेबांनी सेनेचा हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला आणि त्यावेळच्या युती समर्थकांसमोर शिवसेनेला नागडं केलं. हिच शिवसेनेच्या ऱ्हासाची पहिली मजबूत आणि महत्त्वाची पायरी होती.
प्रश्न मुख्यमंत्री पदाचा- सेनेकडे शिंदेंसारखे काही उत्तम नेते आहेत जे मुख्यमंत्रीपदाचा भार लीलया पेलू शकतात. पण उद्धवसाहेबांच्या वृत्तीत राजकारणाचा लवलेशही नाही, त्यांना मुख्यमंत्री केलं तर सेनेतलं कोणी नाराज होणार नाही आणि उद्धवला आपण हवं तसं खेळवू शकतो ही पवारांची पुढची खेळी!
झालं, उद्धवांनी शपथ घेतली. मविआ सरकारने प्रत्येक चांगल्या कामाला स्थगिती द्यायला सुरूवात केली आणि बिल फक्त सेनेच्याच नावावर फाटत गेलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवांत राहिले. जनतेचा रोष वाढतोय हे ठाऊक असूनही पवारांनी काहीच ठोस पावलं उचलले नाहीत, त्यासाठीच तर अट्टाहास केला होता!
पोहता न येणाऱ्या उद्धवला पाण्याने भरलेल्या विहीरीत टाकलं आणि सोबत संजूभौलासुद्धा भोपळा म्हणुन सोडलं, जो वाचवतोय की बुडवतोय तेच कळेनासं झालंय!😂😂

या विहिरीतून उद्धव कधी आणि कसे बाहेर येणार हाच प्रश्न… बाहेर येणार का तेही माहित नाही, पण जेव्हा येतील तेव्हा ते नागडेच असतील!😔🙏🏽
You can follow @schNyooton.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.