सावरकर आणि आंबेडकर यांची कधीच तुलना होऊ शकत नाही.बाबासाहेबांनी सावरकरांच्या 'हिंदुत्व' व 'हिंदुराष्ट्र' या संकल्पनांचा त्यांच्या 'Pakistan: the partition of india' या 1940सालच्या पुस्तकात शिस्तीत समाचार घेतलेला आहे.
ते मी इथे सप्रमाण देतो त्यामुळे हा RWचा प्रचार एकदाचा थांबेल
(1) https://twitter.com/malhar_pandey/status/1303363973320908800
पुण्यभू पितृभू अशी हिंदुराष्ट्राची संकल्पना सावरकरांची आहे. त्यावर बाबासाहेब म्हणतात की या हिंदुराष्ट्रात मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू यांना स्थानच नाही. तसेच बौद्ध, जैन, शीख यांना बळजबरीने हिंदू म्हणावे लागेल. बाबासाहेब या व्याख्येतले धोके पुढे मांडतात.
(2)
बाबासाहेब जिना आणि सावरकरांची तुलना करतात. ते म्हणतात की दोघांनीही परस्पर पूरक अशी द्विराष्ट्रवादाची मांडणी केली आणि एकमेकांना उपयोगी पडेल असेच काम केले. पण त्यातही त्यांना सावरकर गोंधळलेले वाटतात. सावरकरांना वाटते की मुस्लिमांना हिंदूंच्या तुलनेत दुय्यम स्थान असावे.
(3)
बाबासाहेब आता सावरकरांची शिस्तीत मजा घेतात. त्यांना अतार्किक आणि सतत भूमिकेच्या कोलांट्या उड्या मारणारे म्हणतात.
सोबतच सावरकरांच्या द्विराष्ट्र वादाने भारताच्या सुरक्षेला भयंकर धोका निर्माण होणार आहे असे भाकीत बाबासाहेबांनी फाळणीच्या 7 वर्षे आधीच केले होते.
(4)
इथे तर बाबासाहेब खूप एन्जॉय करतायेत.ते म्हणतात हा द्विराष्ट्रवाद पण काही ओरिजनल सावरकरांचा नाही.तो तुर्की,ऑस्ट्रीयाच्या मॉडेल वरून उचललाय.
आणि हे मॉडेलच किती विध्वंसक आहे हे सावरकर भूतकाळात न जगता वर्तमानात जगले असते तर त्यांना कळले असते,असेही ते म्हणतात.
बाबासाहेब बास की ओ😹
(5)
समारोपात बाबासाहेब म्हणतात, की हिंदुराष्ट्राचा सिद्धांत हिंदूंचा अभिमान सुखावू शकेल पण हिंदूंसाठी कधीच स्थिर आणि शांततामय भविष्य निर्माण करू शकणार नाही. आणि मला हे सर्वात महत्त्वाचे वाक्य वाटते.
तर बाबासाहेबांनी त्यांच्या मिश्किल शैलीत सावरकरांना पार चितपट केले आहे.
(6)
आशा करतो की इथे हा प्रॉपगंडा थांबेल.
यातून एक गोष्ट लक्षात घ्या की सावरकरांच्या त्याज्य संकल्पना, ज्याविषयी बाबासाहेबांनी तेव्हाच इशारा दिला होता, आता bjp सरकार CAA-NRC च्या माध्यमातून प्रत्यक्षात आणत आहे.
बाबासाहेबांच्या लिगसीसाठी आपण त्याविरुद्ध लढलं पाहिजे. ✊🌸
(E)
You can follow @arvindgj.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.