श्रीमंत पालकांच्या मुलांना कोटा (राजस्थान) मधून ७० बसेस पाठवून फुकट परत आणणारे महाराष्ट्र सरकार, गोर गरीब, मध्यं वर्गातल्या पालकांच्या मुलांना #NEET परिक्षेसाठी Exam Centre वर पोहोचवायला तिकीटाचे पैसे घेवून तरी जिल्ह्याच्या/तालूक्याच्या ठिकणाहून बसेसची सोय करणार आहे का?
@advanilparab @AUThackeray @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @bb_thorat @AmitV_Deshmukh

Exam conduct कराणार्या NTA ने राज्यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचवायला मदत करा ही सुचना का दुर्लक्षित केली जात आहे?
देशातील अनेक राज्य बसेसची फुकट सोय करत आहेत. महाराष्ट्र सरकारला पालक फुकटात मागत नाहीत, तिकीटाचे पैसे देतो म्हणतायत, तरी सुद्धा दुर्लक्ष, का?
राज्यात अनेक ठिकाणी जनता कर्फ्यु लागलेत, मुलांना खाजगी वाहने मिळणार नाहीत. ७०:३० कोटा रद्द केलात पण विद्यार्थी केंद्रावर पोहोचलाच नाही तर त्या कोट्याचा काय उपयोग?
राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घेणार आहे का?

@rautsanjay61 साहेब, सरकारने कामे नाही केली तर सोनू सुद जन्माला येतात. प्रत्येकाला "मातोश्रीचं" दर्शन घडवण्याची तयारी आहे का आपली??
लॉकडाऊन मुळे पालक संघटीत होवून मागणी करू शकत नाहीत, त्याचा गैरफायदा घेवून सत्तेच्या मखमली गालिच्यावर विराजमान होवून जावू नका.

म्हणून हा प्रपंच.

🙏🙏🙏
You can follow @abhijeetpTOI.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.