📌📌📌

शिक्षणाच्या गंगेसाठी तिचे भगीरथ प्रयत्न

काल म्हटल्याप्रमाणे आज स्वप्नालीच्या न व्हायरल झालेल्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहितोय. काल लिहिता आले असते मात्र आज बातमी प्रसिद्ध होऊ घातली होती. त्यामुळे ब्रेक घेऊन निवांत लिहू म्हटलं. (१/१६)
तर, स्वप्नालीचे प्रयत्न आज राज्यभर प्रेरणादायी ठरतायत. काल बातमीनिमित्त कॉल केल्यावर स्वप्नालीला म्हटलं, 'अगं सोशल मीडियावर फेमस झालीयेस, तुझ्या जिद्दीला आज लोक सलाम ठोकतायत..' ती अगदी थंड आवाजात म्हणाली, सर मला काही माहीत नाही. मी सोशल मीडियावर नाही. (२/१६)
फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर अकाउंट नाही. ऑनलाइन लेक्चर्ससाठी वगैरे व्हॉट्सअप असावं म्हणून ठेवलंय.' आता या काळात विशीच्या मुलीला सोशल मीडियाची क्रेझ नाही म्हटलं की असेही हात आपोआप जोडले जातात. त्यात तिने एका निर्मनुष्य डोंगरावर झोपडी उभारण्याचा निर्णय घेणं म्हणजे (३/१६)
आणखी धाडसाचं काम होतं. एकटीला भीती वाटत नाही? हा पुढचा प्रश्न.. त्याच थंड स्वरात उत्तर.. एकटी कुठेय? पुस्तकांची साथ आहे. मग झटपट ६-७ पुस्तकांची नावं, अगदी लेखकांच्या नावासह तिने सांगितली. पुस्तकांचा विषय सुरु होताच तिचा आवाज अधिक खुललेला दिसला. (४/१६)
प्रकाश मोहाडीकरांचं 'माय माउली साने गुरुजी', विश्वास नांगरे पाटील यांचं 'मन मे है विश्वास' आणि यदुनाथ थत्ते यांचे 'पुढे व्हा' अशा पुस्तकांची नावे टिपता आली. ही पुस्तकं, 'नकारात्मकतेला बाजूला सारून मार्गस्थ होत राहा..' अशी सकारात्मक ऊर्जा देत राहतात असं तिचं म्हणणं. (५/१६)
आणि ती फक्त म्हणत नाही. ती प्रत्यक्षात कृती करून दाखवते. शब्दाला कृतीची जोड असेल तर स्वप्नालीसारखं बावनकशी सोनं डोंगरदऱ्यांवरही अडचणींना फाटा देताना दिसतं.

नेटवर्कअभावी ऑनलाइन लेक्चरला गैरहजेरी लागू नये म्हणून घरापासून २५ मिनिटे लांब असलेल्या (६/१६)
निर्मनुष्य डोंगरावर (आंब्याचा माळ) नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी छोटी झोपडी उभारणाऱ्या स्वप्नाली सुतारची संघर्षगाथा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुरुवातीचे काही दिवस तिने चक्क पावसात छत्री पकडून उभे राहत लेक्चरला हजेरी लावली. अखेर कुटुंबीयांनी स्वप्नालीची.. (७/१६)
शिक्षणासाठीची तळमळ पाहिली आणि तिला डोंगरावर छोटीशी झोपडी उभारण्याची परवानगी मिळाली.

स्वप्नाली लहानपणापासून गुणवंत! दहावी (९७ टक्के) आणि बारावीला (विज्ञान शाखा, ८७ टक्के) घसघशीत यश मिळवलं. बारावीनंतर 'पशुवैद्यक' होण्याची वाट निवडली. गावात सोय नसल्याने मुंबई गाठली. (८/१६)
गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. आई-वडिलांपासून दूर.. दिवा येथे आपला चुलत दादा सचिन मेस्त्री याच्याकडे राहत होती. लॉकडाउनमुळे कॉलेज बंद असल्याने कणकवली तालुक्यातील आपल्या मूळगावी दारिस्ते (सुतारवाडी) येथे ती परतली. यादरम्यान लॉकडाऊन वाढतच गेला. (९/१६)
त्यामुळे कॉलेजने ऑनलाइन लेक्चर्स सुरु केले. मात्र ज्याठिकाणी मोबाईलवर बोलायलाही रेंज उपलब्ध नाही, तिथे विनाअडथळा इंटरनेट सुविधा मिळणे दुरापास्तच. आजही कोकणातील अनेक गावांमध्ये ही अडचण दिसून येते. आता नेटवर्कअभावी कॉलेजचे ऑनलाईन लेक्चर बुडण्याची चिंता.. (१०/१६)
स्वप्नालीला सतावत होती. त्यामुळे गावाजवळील डोंगरभागात नेटवर्क मिळतेय का याची चाचपणी तिने सुरु केली. या डोंगरावर आंब्याचा माळ येथे पूर्ण नेटवर्क मिळत असल्याचे तिला लक्षात आले. मात्र पावसाळा सुरु असताना अभ्यास करायचा कसा हा नवा प्रश्न उभा राहिला. सुरुवातीला काही दिवस.. (११/१६)
पावसातच छत्रीचा आधार घेत लेक्चर्सना हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या बहिणीची धावपळ पाहून कुटुंबीयांची परवानगी घेत तिच्या भावाने छोटीशी झोपडी तयार करून दिली. विशेष म्हणजे, या निर्मनुष्य जागेत भरपावसात ऑनलाईन क्लासला हजेरी लावण्याचे धारिष्ट्य तिने दाखवले आहे. (१२/१६)
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अभ्यास, ९ ते १२.३० वाजेपर्यंत लेक्चरला उपस्थिती, त्यानंतर १.३० ते ६ या वेळेत प्रॅक्टिकल आटपून घर गाठणे असा स्वप्नालीचा दिनक्रम. तिचा हा संघर्ष तिच्या शालेय शिक्षिकेने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. चार्जिंगचा प्रश्न कायम राहिल्याने याच शिक्षिकेने.. (१३/१६)
पॉवरबँक आणून दिलीय. ही संघर्षगाथा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कॉलेजपर्यंत पोहोचली. कॉलेजकडून मुंबईतील हॉस्टेलमध्ये येऊन राहण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. मात्र दिव्यातील तिच्या काकाचे सर्व कुटुंब देखील गावाकडे परतले आहे. हॉस्टेलची ५० हजार इतकी फी.. (१४/१६)
आवाक्याबाहेरची वाटत आहे. त्यामुळे तूर्तास तिने नकार दिला आहे. सध्या @NiteshNRane होस्टेलचा खर्च उचलल्याचे कळते आहे.

आज पुन्हा बोलणे झाले. प्रचंड पाऊस होता. त्यामुळे नेटवर्क येत-जात होतं. याक्षणी आर्थिक माहितीची गरज आहे का? तुझा किंवा भावाचा संपर्क क्रमांक शेअर करतो..(१५/१६)
असे विचारले. तिने नम्रपणे नकार दिला. होस्टेलच्या फीचा प्रश्न होता. हा प्रश्न सुटला. त्यामुळे याक्षणी मला आर्थिक मदत नको. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने श्रीमंत झाले असाच तिचा बोलण्याचा सूर होता. स्वप्नालीच्या उत्तुंग स्वप्नाला सलाम, शुभेच्छा! (१६/१६)
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.