सातवाहन हा शेषनागाचा वंश समजला जातो. सातवाहनांची वंशावळ वायू ,ब्रह्मांड, भागवत व विष्णू पुराणात ४५६ वर्ष दिली आहे.प्रत्येक राजाच्या काळाची एकूण बेरीज करता या वंशाचा एकूण काळ ४४२ जवळपास एवढा येतो.प्रबंध- चिंतामणी या ग्रंथानुसार एक ब्राह्मण कन्या नागडोहावर पाणी भरण्यासाठी
गेली असता तेथील शेषराजाने तिला पाहिले व तो तिच्या सौंदर्यावर अनूरक्त झाला व त्याने तिच्याशी लग्न केले.तिचा पुत्र म्हणजेच सातवाहन होय.उज्जैनच्या विक्रमादित्याने जेव्हा पैठणवर प्रचंड सैन्य पाठवले तेव्हा बाल सातवाहनने आपल्या पित्याकडून (शेषराजाकडून) अमृत कुंभ आणून एका विहिरीत ओतला व
विहिरीतील अमृतजल मातीच्या सैनिकांवर , हत्तीवर , घोड्यांवर शिंपडून त्यांना सजीवत्व प्राप्त करून देऊन त्यांच्या बळावर विक्रमादित्याचा पराभव केला.पैठणमध्ये आजही मातीचे सैनिक , हत्ती, घोडे सापडतात व अमृतकुंभ ओतलेली विहिर केवळ पैठणमध्ये सातवाहनांच्या राजवाड्यात दाखवितात.