महाराष्ट्रातील फुले दांपत्यापासून बाबासाहेबांपर्यंत समाजसुधारकांनी सामाजिक विषयांवर प्रचंड लिखाण केलेलं आहे, ते सर्व वाचनीय आहे. मात्र समाजसुधारकांपैकी रुढार्थाने साहित्यिक म्हणावेत (कथा, कादंबरी, काव्य इ. लिखाण) असे दोन कर्तृत्ववान लेखक म्हणजे सानेगुरुजी आणि अण्णाभाऊ साठे. https://twitter.com/LetsReadIndia/status/1295593828003409921
सानेगुरुजी हे अगदी हळव्या मनाचे साहित्यिक. 'श्यामची आई' या त्यांच्या अजरामर कलाकृतीशिवाय धडपडणारी मुले, साने गुरुजींच्या गोड गोष्टी हा पुस्तकांचा संच, गांधीजींचं छोटेखानी चरित्र ही काही उत्कृष्ट पुस्तके.
'करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' या प्रेरणेने लिहिलेली असली तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचावीत अशी सानेगुरुजींची पुस्तके आहेत.
अण्णाभाऊंच्या साहित्याला त्यांनी सोसलेल्या चटक्यांची पार्श्वभूमी असली, तरी केवळ तेवढ्यापुरतं त्यांचं लेखन मर्यादित नाही. सामाजिक पार्श्वभूमीवर कादंबर्यांचं उत्तम चित्रण त्यांनी केलंय. फकीरा ही त्यातलीच एक अजरामर कादंबरी.
पण त्यापलीकडे जाऊन 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन, पोवाडे आणि 'माझी मैना गावाकडं राहिली' सारख्या कविता हे त्यांचं साहित्यही वाचनीय आहे.
टीप - या दोन्ही साहित्यिकांची पुस्तकं अधिकृतपणे pdf स्वरूपात उपलब्ध आहेत.