बीबी : ऑस्लो : बिल क्लिंटन अॅडमिनिस्ट्रेशन

अमेरिकेतून परतल्यानंतर बीबींनी एकस्ट्रीम राईट विंग पक्ष लिकूड पार्टीची स्थापना करत राजकारणाची सुरुवात केली पण इस्राएल मध्ये राईट विंगला तितके स्थान नव्हतेच. त्यामुळे त्यांणी सुरुवात तर फारच कठीण होती. अमेरिकेत डेमोक्रॅट्स सत्तेत होते.
1967 च्या सिक्स डे वॉरचे इस्राएली डिफेन्स फोर्सचे कमांडर एझाक रबिन इस्राएलचे पंतप्रधान होते. ते युध्दाचे नायक होते त्यांनी राजकारणात आपला जम बसवला होता. काहीसे लेफ्ट विंगचे असल्याने त्यांनाही इस्राएल- पॅलेस्टाईन समस्या सुटावी अशी अपेक्षा होती. बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष झाले.
बिल क्लिंटनच्या फॉरेन पॉलिसी मधील सर्वात महत्त्वाचा कोअर मुद्दा हा इस्राएल-पॅलेस्टिनी समस्याच होता. क्लिंटननी रबिन यांच्या सोबत बोलणीस सुरुवात केली. पॅलेस्टिनी हेड यासिर अराफत यांच्या सोबत बोलणी सुरू झाल्या.
( NOTE: रबिन 1967 ला अराफत यांच्या विरुद्ध युद्ध लढत होते.)
यासिर अराफत हे इस्राएली लोकांसाठी दहशतवादी होते. स्वतः रबिनना त्यांच्याशी बोलण्यात कोणताही रस नव्हता. क्लिंटन यांच्या पीस टॉक्स साठी हे तर गरजेचे होते. क्लिंटन यांना या दोघांना एकत्र आणण्यासाठी फार कसरत करावी लागली. क्लिंटनचे सल्लागार स्टिव बर्जर यांनी अनेक मुलाखतींमध्ये किस्से
सांगितले आहेत. क्लिंटन यांच्या प्रयत्नांना शेवटी यश मिळालेच. यासिर अराफत व रबिन बोलणीसाठी तयार झाले. रबिन पहिल्यांदा व्हाईटहाऊस भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांच्या मनात अनेक शंका होत्या असे बर्जर सांगतात. क्लिंटनना भेटल्यानंतर रबिन वेस्ट बँकसह स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी राजी झाले.
तिकडे यासर अराफत यांच्या सोबतही चर्चा पॉझिटिव्ह होती. ऑस्लो अकॉर्डस् ची पायाभरणी झाली. इस्राएली- पॅलेस्टिनी लोकांना शांततेची आशा होती सगळे या कराराची वाट पाहत होते. पण बीबींना हा करार देशद्रोहासमान वाटायचा. ऑस्लो बद्दल तीव्र नाराजी काही इस्राएली घटकांमध्ये होती.
ऑस्लो च्या हस्ताक्षराची तारीख ठरली, कार्यक्रमचा लवाजमा होता. रबिन आणि अराफत दोघे एकमेकांपासून लांब कसे राहतील याची व्यवस्था क्लिंटनना करायची होती, हँण्डशेक करणे रबिनना मंजूर नव्हते, अराफतना ते दहशतवादी समजायचे पण दुसरा कोणताही उपाय नव्हता.
रबिननी एकडे ऑस्लो वर हस्ताक्षर केले व हातमिळवणीही केली अन् इस्राएलमध्ये आंदोलनास सुरुवात झाली, या आंदोलनांमागे बीबीच होते. ऐतिहासिक कराराच्या पाश्वभूमीवर शांततेची नांदी टिकणार होती पण इस्राएली लोकांना अनेक शंका होत्या, जेरूसलेम बद्दलही बोलणी होणार का? हा महत्त्वाचा मुद्दा होता.
इस्राएली लोकांना जेरूसलेम बद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नव्हती पण रबिन यांच्यामुळे सर्व प्रकारच्या पर्यांयासाठी बहुतांश जनता राजी होती. तिकडे अँटी ऑस्लो आंदोलनास वेग आला. शेकडो, हजारो लोक रबिन विरूद्ध रस्त्यावर उतरले यांना बीबी रिप्रेझेंट करायचे. बीबी = अँटी ऑस्लो ही
प्रतिमा तयार झाली. रबिनंचा पॉलिटिकल ग्राफ हळूहळू कमी होत गेला. इस्राएल मधील KIKOR ZION शहरात सगळ्यात मोठी, भव्य अशी अँटी ऑस्लो रॅलीस सुरुवात झाली. लोकांच्या मनात प्रचंड रोष होता. यासिर अराफत यांच्या हिटलरच्या रूपातल्या पोस्टरनी जमाव भरला होता. रबिनना देशद्रोही ठरवणाऱ्या घोषणाही
दिल्या गेल्या. बीबींनी शेवटी या रॅलीला संबोधित केले. यासिर अराफात यांना खूनी, दहशतवादी संबोधित करत "आपला इस्राएल कधीही खुन्यांशी सौदेबाजी करत नाही, झुकत नाही पण या सरकारने यांच्या समोर झुकणे पसंत केल्याची", आक्रमक टिका बीबींनी केली. जमावामध्ये Extreme Anger दिसून येत होता.
बीबींनी यास रोखण्याचे जराही प्रयत्न केले नाही. दुसरीकडे रबिन यांना समर्थन देणारा प्रचंड मोठा जनसमूह होता, एका शांततेच्या समर्थनार्थ रॅलीतून रबिन बाहेर निघताना त्यांच्या वर तीन गोळ्या चालल्या गेल्या. रबिनंचा खून झाला. Extreme Right wing affiliated तरूण यिगार अमीरने ही हत्या केली.
संपूर्ण इस्राएल मध्ये शोक पसरला आणि बीबीं विरूद्ध प्रचंड आक्रोश होता. बीबींमुळेच रबिनची हत्या झाली, अशाप्रकारची संवेदनाच लोकांमध्ये निर्माण झाली. रबिन हे नोबेल पीस पुरस्काराचे विजेते होते त्यामुळे संपूर्ण जगातून शोक व्यक्त होत होता. स्वतः क्लिंटन इस्राएलला आले.
बीबींचे राजकीय प्रस्थ जवळपास संपल्यात जमा होते. जर रबिनची हत्या झाली नसती तर त्यांना निवडणूकीत हरवून बीबी पंतप्रधान बनले असते पण आता ते विलन होते. बिल क्लिंटननी शोकसंदेशात "Your prime minister was a martyr for peace but he was the victim of hate"
हा संदेश दिला. बिल क्लिंटन सारखा मोठा शत्रू बीबींनी निर्माण केला. आता रबिनचे उत्तराधिकारी शिमॉन पियर्स होते त्यांनी निवडणूक जिंकणे ऑस्लो साठी अतिशय गरजेचे बनले. एकीकडे ऑस्लो समर्थक पियर्स तर ऑस्लो विरोधक बीबी. क्लिंटननी आपला संपूर्ण जोर पियर्स कँम्पेन वर लावला.
बॅक चॅनेल फंडींग पासून ते पर्सनल कँम्पेन पर्यंत सर्व काही क्लिंटननी केलं. ते स्वतः इस्राएलमध्येही प्रचारासाठी गेले. क्लिंटन इस्राएलमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यामुळे निवडणूकीत पियर्स यांचा विजय जवळपास ठरलेला होता. ऑस्लोला विरोध करणारे बीबी एकटे नव्हते Extreme Palestinian groups
जसे हम्मासलाही हा शांतता करार नको होता. निवडणूकीच्या काही दिवसांआधी सिरीयल बाँमिम्बिंगला सुरुवात झाली. हम्मासने इस्राएली बस वर सुसाईड बाँमिम्बिंग करण्यास सुरुवात केली. शेकडोंच्या संख्येने जिवितहानी झाली. लोकांमध्ये राग होता, बाँमिम्बिंग थांबण्याची कोणतीही आशा
नव्हती.लोकामध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते. बीबींना नवसंजीवनी मिळाली. लोकांमध्ये अँटी ऑस्लो सेंटीमेंट्स वाढत गेल्या एकतर्फी वाटणारी निवडणूक काट्याची बनली पण पियर्स हेच संभाव्य विजेते होते पण अनपेक्षित रित्या अवघ्या एका टक्क्यांनी बीबींनी निवडणूक जिंकली. अमेरिकेसाठी हा धक्का होता
क्लिंटनच्या ड्रिम प्रोजेक्ट ऑस्लो अकॉर्डस् वर संशयाचे ढग जमा झाले. एका कॉन्झर्वेटिव नेत्याशी डिलींग करणे क्लिंटन सारख्या लिबरल नेत्यास अवघड जाईल याची अपेक्षा होतीच पण परिस्थिती आणखीनच बिकट होती. तरीही क्लिंटन यांनी जूळवून घेतले. बीबीं सोबत अनेक फोनकॉल्स केल्या, भेटी घेतल्या.
बीबींनी क्लिंटनना स्पष्ट पणे एक बाब सांगितली, "Our previous government signed it, but that doesn't necessarily mean that we are bound to it, finding a solution to the middle east problem is not an easy job." क्लिंटनना यावरूनच भविष्यातील रस्सीखेचीची चिन्हे दिसू लागली.
क्लिंटन आणि बीबीं मधील पर्सनल संबंधही तितके चांगले नव्हतेच कारण क्लिंटननी खुलेआम पणे बीबीं विरोधात कँम्पेन केली होती. अमेरिकेचा आतापर्यंतच्या इतिहासातील इतका खूलेआम इंटेरिअरन्स इतिहासात कधीच झाला नव्हता. इतक्या असहज वातावरणातही क्लिंटननी बीबींना ऑस्लो साठी राजी केले.
बीबी अतिशय सावध पाऊले टाकत होते कारण त्यांना आपल्या वोटर बेस नुसारही विचार करावा लागायचा. पंतप्रधान पदावर आल्यानंतर काही तडजोडी कराव्या लागतातच, ते लवकरच दिसून येऊ लागले. ज्या यासिर अराफतना त्यांनी खूनी,दहशतवादी संबोधले आता त्यांच्या सोबतच पुढील पीस टॉक्स करायच्या होत्या.
ज्याप्रमाणे रबिन नाखूश होते त्याच्या कित्येक पटींनी बीबींना हे अतिशय अवघड काम होते. क्लिंटनना शेवटी या दोघांच्या हातमिळवणी करण्यात यश मिळाले. रबिन यांच्या तुलनेत या टॉक्स अतिशय स्लो होत्या, क्लिंटनच्या कार्यकाळास काही वर्षेच उरली होती ते दुसऱ्या इस्राएली निवडणूकीची वाट पाहत होते.
बीबींच्या कार्यकाळात गाझा स्ट्रिप मधून IDFने 50 किमी पर्यंतची माघार घेतली, वेस्टबँक मधील हिब्रॉन शहरातून सैन्य माघारही झाली. पण ठोस असं काहीच हाती आले नाही. इस्राएलमध्ये ऑस्लो विरोधक जे बीबींचे वोट बँक होते त्यांनीही लिकूडला विरोध सुरू केला. एकूणच समतोलता साधत त्यांचे तोलही गेले.
इस्राएली निवडणूकीत बीबी सपशेल पराभूत झाले. जवळपास बीबींचे राजकीय जीवन संपल्यात जमा होते त्यांनी काही काळासाठी राजकारणातून ब्रेक घेतला.इहूद बराक यांच्या रूपात पुन्हा एकदा ऑस्लोला नवसंजीवनी मिळाली पण पुढे ऑस्लो अपयशी ठरली,बीबी 2008 ला पुन्हा पटलावर आले.

: समाप्त
_______
Pr@thamesh
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.