मुसाफिर-अच्युत गोडबोले
#BookReview
हि एका व्यक्तीची आत्मकथा आहे यावर खरतर विश्वासच बसत नाही,
सोलापूर सारख्या छोट्याश्या गावातुन सुरु झालेला हा प्रवास तुम्हाला भारतासोबत अमेरिका, जपान आणि बऱ्याच देशांमध्ये घेऊन जाईल
आणि बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींशी भेटही करून देईल.
👇थ्रेड १ https://twitter.com/Atarangi_Kp/status/1291953675963793408
जीवनातील साहित्याचा, संगीताचा प्रचंड प्रभाव आणि जडलेलं नातं
हळुवारपणे उलगडत जाईल.व्यापक नजर,अफाट कुतूहल आणि त्यातून घडलेलं अफाट वाचन याची प्रचिती होईल
खरतर मला आज कोणी विचारलं कि अच्युत गोडबोले कोण तर मला म्हणावं लागेल Treasure of Knowledge, Great Reader and Great Leader.
👇
विज्ञान,कला,विचाररांचा भांडार,चित्र,संगीत,समाजकार्य,चळवळी, तुरुंगवास, दृष्टिकोन, त्यासोबतच IT क्षेत्रातील कामगिरी,अनेक कंपन्यांचे CEO पद ,अर्थशास्त्र आणि बरच काही, एक व्यक्तीने तिच्या आयुष्यात एवढं अफाट ज्ञान आणि चढउतार बघितले कि कोणत्या क्षेत्राबद्दल बोलू हेच कळत नाही
👇
#रिम
पंडित जसराज,दुर्गा भागवत, भीमसेन जोशी, मनोहर ओक, अतुल खाते,नारायण सुर्वे आणि बऱ्याच व्यक्तीशी ओळख आणि अनुभव एवढ्या विस्तृत पणे वाचायला / अनुभवायला मिळाले कि वाचताना गुंग होऊन गेलो. हे आत्मचरित्र वाचताना खूप काही शिकता आलं आणि गोडबोले सरांचा प्रत्येक अनुभव जगता आला.
👇
#मराठी
कोणत्याही क्षेत्रात असाल,कोणताही विषय आवडत असेल तरीही हि आत्मकथा नक्की वाचा,खूप काही शिकायला तर मिळेलच शिवाय साहित्याकडे,शिक्षणाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन घेऊनच या कादंबरीतून बाहेर याला यात शंका नाही
#थोडक्यात_मांडण्याचा_प्रयत्न
आवडल्यास RT नक्की करा https://amzn.to/2PVtzTE 
You can follow @Atarangi_Kp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.