बेंजामिन नेत्यानाहू : इस्राएली लॉबी

ओबामा आणि बीबींमधील वैर जगजाहीर आहेच पण इतर राष्ट्राध्यक्षांशी त्यांचे संबंध कसे होते, मुळात बीबींचा कार्यकाळ नेमका कसा आहे, हे त्यांच्या सुरूवातीच्या काळापासून लक्षात येईल. अमेरिकेतील NRA नंतरची दुसरी तगडी लॉबी बीबींनी तयार केली.
बीबींचे वडील बेंझॉन नेत्यानाहू हे अतिउजवे होते. त्यावेळी इस्राएल मध्ये सेक्युलर वातावरण होते अशा Radical तत्वांना राजकारणात कोणतीही जागा नव्हती. बेंझॉनना जेरूसलेम मधील विद्यापीठाच्या इतिहास प्राध्यापक पदासाठी रिजेक्ट केले गेले. त्यांना हा घात सहन झाला नाही.
त्यांनी इस्राएल सोडले आणि अमेरिकेत स्थायिक झाले तिथे त्यांनी इतिहास प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. आपल्या तीनही मुलांना इस्राएली राष्ट्राची संकल्पना समजावून सांगितली. "WORLD is not ready to see Sovereign Israel, we need to fight for our rights every single second."
अतिशय कॉन्झर्वेटिव परिवारात वाढलेल्या बीबींना साहजिकच तीच मूल्ये आत्मसात करावी लागली. तीन भावंडातील हे दुसरे होते, त्यांचा मोठा भाऊ योनातन नेत्यानाहू लवकरच इस्राएलला गेले. इकडे बीबी MASSACHUSETTS UNIVERSITY मधून बॅचलर पदाची डिग्री घेतली.
ते पेनस्लिवेनियातील फिलाडे्लफीया भागात राहायचे तिथे त्यांची ओळख अमेरिकन ज्यूईश कम्युनीटीशी होऊ लागली. त्यांनी अनेक डिबेट्स स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. इस्राएली काऊंटर व्हयू मांडण्यात ते तरबेज झाले होते. 1967 ला अरब जगताने इस्राएलवर हल्ला केला.
1967 च्या ऐतिहासिक सहा दिवसांच्या युद्धात इस्राएलने प्रचंड विजय मिळवला होता. सिरियातील गोलान हाईट्स, इजिप्तच्या सिनाई पेन्नसुएला, गाझा स्ट्रिप, वेस्ट बँक सगळ्यांवर इस्राएली फोर्ससेने कब्जा मिळवला. या युद्धाने मिडल ईस्ट पूर्णपणे बदलला गेला. https://twitter.com/prathameshpurud/status/1223907363377176581?s=19
सिक्स डे वॉरने इस्राएली लोकांच्या मनात एक नरेटिव निर्माण झाला, जर तुम्हाला हवं असलेलं मिळत नसेल तर ओढून घ्या. सिक्स डे वॉर ही अरब वर्ल्डची सर्वात मोठी चूक होती. इकडे बीबींना आपल्या वडीलांच्या शिकवणी सार्थक ठरल्याचा आनंद होता. त्यांनी लगेच अमेरिका सोडली आणि इस्राएलला रवाना झाले.
सयरत मत्कल ही इस्राएली फोर्सची अतिशय महत्त्वाची संघटना यात काम करण्याचे प्रत्येक इस्राएली सैनिकाचे स्वप्न असते. बीबींना ही संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. 1972 ला Sabena Flight 571 या विमानास PLO ( Palestine Liberation Organization) ने हायजॅक केले.
या विमानात जवळपास सगळेच इस्राएली नागरिक होते. यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. सयरत मत्कलला ऑपरेशनची जबाबदारी दिली गेली. ऑपरेशनचे लीडरोल बीबींकडे होते. विमान दुरुस्ती करण्याच्या टिमच्या रूपात सगळे विमानात घुसले व सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला, बीबींच्या खांद्यावर गोळी लागली.
यशस्वी ऑपरेशन नंतर त्यांना इस्राएली पंतप्रधानांकडून शुभेच्छाही दिल्या गेल्या. बीबींचे वजन वाढत होते. 1973 ला बीबींना सर्व आर्मी रोल्स मधून निवृत्ती दिली गेली. ते अमेरिकेत परतले पुन्हा एकदा आपल्या Ph.d ची तयारी सुरू केली. अंतिम वर्षात असताना इस्राएलमध्ये Yom kipoor वॉर सुरू झाला.
यॉमकी पोर वॉर मध्ये सामील होण्यासाठी ते पुन्हा एकदा इस्राएलला परतले. या युध्दातही इस्राएलची सरशी झाली आणि पुन्हा एकदा अरब जगाचा पराभव. बीबींकडे आता कॅप्टन हे उच्च पद आलं. ते पुन्हा अमेरिकेत निघून गेले. तिथे इकॉनॉमिक कनस्लंटंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
इथून बीबींच्या राजकारणास सुरुवात झाली.

⚫ इस्राएली लॉबी :

द अॅडेव्होकेट्स शो मध्ये बीबींनी इस्राएली पक्षाची बाजू घेत अनेक डिबेट्स आपल्या खिशात घातले. प्रो इस्राएली ग्रूप्स बीबींना प्रत्येक इव्हेंटमध्ये सामील करायचे. आतापर्यंत बीबींनी आपलं बीन नितय लावले होते.
आता त्यांची जवळपास प्रत्येक मिलेनियर इस्राएली ग्रूप्समध्ये तगडी ओळख झाली. इस्राएलने बीबींची अमेरिकेतील इस्राएली स्पोकपर्सन म्हणून नेमणूक केली. 1984 ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्पोकपर्सन पदी त्यांची नेमणूक झाली तेव्हा नितयचे नाव बदलून बेंजामिन नेत्यानाहू केले गेले.
अमेरिकेतील इस्राएली लॉबी इतकी स्ट्राँग बनली की त्यांचे कनेक्शन थेटपणे राष्ट्रपतीं बरोबर होते. बीबींसोबत कनेक्शन म्हणजे थेट राष्ट्रपतींसोबत कनेक्शन असा काहीसा नरेटिव निर्माण झाला. रोनाल्ड रेगन अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचा प्रचंड प्रभाव होता. NRA नंतर ही सगळ्यात मोठी लॉबी होती.
इतक्या झगमगाटात बीबी इस्राएल मध्येही थोडेफार परिचित झाले. रोनाल्ड रेगन असेपर्यंत ते डिप्लॉमेटीक कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचले. आज अमेरिकेत इस्राएल हा विषय आला की सर्व प्रकारच्या गोष्टी मागे पडतात, यामागे याच लॉबीचा परिणाम आहे.
अचानक बीबींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व इस्राएल मध्ये परतले. राजकीय कारकिर्दीची सुरुवात लिकूड पार्टी या अतिउजव्या पक्षाच्या स्थापनेने केली. अनेक वेळा त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी आशा होती पण प्रत्येक वेळी ते वाचले.

क्रमशः बीबींचे राजकारण

_________
Pr@thamesh
https://twitter.com/prathameshpurud/status/1294148161376645120?s=19
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.