भाषेच्या बाबतीत मराठी इतकी सुंदर,सोज्वळ तितकीच समृद्ध भाषा भारतवर्षात शोधूनही सापडणार नाही.. अजून हाच निकष भाषेची हेळसांड याबाबतीतही लागू होईल...मराठी इतकी हेळसांड अखंड भारतवर्षात कुठल्याच भाषेची झाली नसेल...
या अक्षम्य चुकीस जबाबदार आहेत खुद्द मराठी भाषिक. #म #धागा 👇
भारताकडे एक नजर टाकल्यास सहज लक्षात येईल असा मुद्दा म्हणजे भाषिक विभाजन...उत्तर भारत हा हिंदी बहुल तर दक्षिण भारत हा तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषिकांचा प्रदेश.. या दक्षिण भाषांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची अशी लिपी आहे...त्या भाषा त्याच लिपीत वावरतात. 👇
ती भाषा ते भाषिक प्राणपणाने जपतात,जगतात. हे दक्षिण भाषिकाचं जगणं मराठी भाषिकांच्या नशिबी नाही...कारण,मराठी ही हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहली जाते...दुसरीकडे लिपी एकच असल्याने मराठी भाषिक अस्सलपणे हिंदी वाचतात,बोलतात....त्यामुळे हिंदीजन मराठी भाषिकांना हिंदी भाषिकातील म्हणजे 👇
आपल्यातीलच समजतात हे दुर्दैव आहे.हेळसांड होण्यामागे हे कारण आहे हे मराठी जणांना कळतही नाही.
दक्षिणीचे तसे नाही. आपल्यावर हिंदी लिपी लादली जाईल या रास्त भीतीने आणि आपल्या भाषेच्या जागरूकतेने हे लोक हिंदीस सहज तिलांजली देतात.हिंदी विरोधात दक्षिणेत इतका क्षोभ का? हे त्याचं उत्तर👇
दक्षिण भाषिकांप्रमाणे मराठी माणसात ती जागरूकता होती पण त्या जागरुकतेला रिचवण्यात हिंदी व्यवस्था सहज यशस्वी झाली ही आमची शोकांतिका आहे...हिंदी राष्ट्रभाषा आहे हे अजूनही कित्येक मराठीजन मानतात..हे त्या शोकांतिकेचे दृष्य लक्षण.👇
भारतात हिंदी भाषिक जास्त आहेत म्हणून ती राष्ट्रभाषा आहे असा मापदंड लावणेच चूक.बहुमताचा निकष इथं असूच शकत नाही.धर्माप्रमाणे भाषा हा वैयक्तिक प्रश्न आहे.याचा यथेच्छ मान राखायला हवा.मानापानाच्या गोष्टीत मराठी तसे चातुर्यवान पण भाषेचा मान राखण्यात ते अयशस्वी ठरले ही बाब क्लेशदायक.👇
मी कित्येकदा म्हणल्याप्रमाणे जो पर्यंत मराठी ही ज्ञानभाषा होत नाही..ती उदरनिर्वाहाची भाषा होत नाही..तोपर्यंत त्या भाषेस राजाश्रय मिळणे सोडाच...उलट सामान्यजन ही मराठीची अवहेलनाच करतील.सरकार दरबारी हिंदीस झुकते माप मिळते ते काही ती भाषा बोलणारे बहूसंख्य आहेत म्हणून नाही..👇
तर इतर भाषेच्या तुलनेत तिची उदरनिर्वाहासाठीची क्षमता जास्त आहे म्हणून.हे लक्षात घ्यायला हवं.
सध्या मराठी सक्तीविषयी बराच माहोल सुरू आहे.अशी सक्ती हिंदी भाषिक कधी करत नाहीत..त्यांना ती करावी लागत नाही कारण ती भाषा आपसूकच तोंडी येते त्यामागे अर्थकारणात तिचे असलेले महत्व हे आहे.👇
एकदा का अर्थकारणात महत्व आले की,आमची भाषा शिका अशी कोणालाही विनंती, बळजबरी करण्याची गरज उरणार नाही.समजा, ती करायची झाली तर उलटी प्रतिक्रिया हमखास येईल.न्हवे त्या प्रक्रियेस सुरवात ही झालीय.महाराष्ट्रात अगोदर मराठी बोलणारे हिंदी भाषिक आजकाल निक्षून हिंदीच बोलतात.हे निरीक्षण आहे.👇
एकदा का भाषेला हवीतशी आर्थिक सुबत्ता लाभली की.. आमच्या भाषेची गळचेपी होते ही तक्रार आपल्याला करण्याची वेळ येणार नाही. भाषा मोठ्या होतात कशा आणि जगभर पसरतात कशा? याचं हे कारण आहे. हे आपल्याला वेळीच लक्षात यायला हवं. 👇
जाताजाता एक सत्य परिस्थिती सांगतो.बाकी समाजात वावरताना तुमचाही अनुभव असाच असेल कदाचित.
माझ्या आतेभावाचं इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे..मी नेहमी जातो तिथं.तिथं बिहारचे हिंदी भाषिक कामगार आहेत..चांगले ओळखीचे झालेत माझ्या ते.कंपनीच्या कामात व्यस्त असताना सगळ्यांच्या नकळत एक सवय लागलेली.👇
आपले मराठी भाषिक आपसात हिंदी बोलायचे आणि हिंदी भाषिक आपसात मराठी बोलायचे..याउलट हिंदी भाषिक मराठी भाषिकांसोबत मराठी बोलायचे पण मराठी भाषिक त्यांच्यासोबत हिंदीच बोलायचे..इथं सांगायचा मुद्दा आहे..तो म्हणजे आपली मानसिकता. 👇
आपल्या भाषेस आर्थिक सुबत्ता आणि उदरनिर्वाहासाठीचे साधन बनवण्यासाठीची पूर्वअट आहे.ती म्हणजे आपल्या मानसिकता बदलाची..तो बदल घडला की कोणाला मराठीची जबरदस्ती करावी लागणार नाही.तो बदल किती सावकाश होईल त्यावर आपल्या मातृभाषेचा अवकाश किती ते ठरणार आहे.❤️
You can follow @MarathiDeadpool.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.