महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे - यावर बोलण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा होण्याची वाट बघावी लागत असेल - तर तुम्ही लबाड आहात.

दारिद्र्यावर लक्ष केंद्रित करावं - असं लिहिण्यासाठी तुम्हाला भारताच्या चांद्रयान-मंगलयान मिशन्स यशस्वी

१+
होण्याची गरज भासत असेल - तर - तुम्ही लबाड आहात.

आपले रस्ते धड नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला मुंबई-अहमदाबाद मेट्रोची बातमी यावी लागत असेल - तर तुम्ही लबाड आहात.

शेतकरी संकटात आहे - हे जाणवायला सरदार पटेलांचा पुतळा बांधला जायला हवा असेल - तर तुम्ही लबाड आहात.

२+
देशात शाळा, हॉस्पिटल्स, अनाथाश्रमं अधिक प्रमाणात हवे आहेत...हे विजडम मेंदूत उगवायला तुम्हाला श्रीरामांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचाच मुहूर्त योग्य वाटत असेल...तर...तुम्ही लबाड आहात.

वरील सर्व मुद्द्यांवर ऑन ग्राउंड काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. संस्था आहेत.

३+
तुम्ही त्यांच्या प्रयत्नांत सामील होत नाही. यशाशक्ती मदत करत नाही. त्यांची कामं सरकार-दरबारी सुलभपणे व्हावीत यासाठी आपले कॉन्टॅक्टस वापरत नाही, आवज देखील उठवत नाही.

या विषयांवर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं - यावर पॉलिसी डॉक्युमेन्ट्स अभ्यासत नाही, त्याबद्दल

४+
जागृती करत नाही, त्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून चिवटपणे प्रयत्न करत नाही.

पण सोशल मीडियावर एखादा विषय चर्चेत आला की तेवढ्यापुरती प्रवचनं देण्याचा मोह तेवढा होत असेल - तर तुम्ही टॉप लेव्हलचे लबाड आहात.

कारण तुम्ही असंबद्ध गोष्टींचे संबंध जोडत आहात.

५+
रस्ते "विरुद्ध" मेट्रो
दारिद्र्य "विरुद्ध" चांद्रयान
हॉस्पिटल्स "विरुद्ध" राम मंदिर

अशी अतार्किक व निखालस खोटी मांडणी करत आहात.

मेट्रोची गरज वेळी. रस्त्यांचं काम वेगळं. दोन्ही आवश्यक आहेत. एकाचवेळी.

६+
दारिद्र्य निर्मूलन आणि स्पेस प्रोग्रॅम दोघेही हातात हात हात घालून चालायला हवेत.

सरदार पटेलांच्या पुतळ्याला लागणारे रिसोर्सेस शेतकऱ्यांच्या रिसोर्सेसमधून तिकडे वळवलेले नसतात!

शेतकऱ्यांसाठी आहे त्याहून कोणती अधिकची तरतूद हवीये हे सांगा ना! मांडा गणित! त्याचा संबंध पुतळ्याशी

७+
जोडायची गरज नाही!

देशात नवीन सरकारी इस्पितळांची गरज, आहेत त्यांची दुरावस्था - हे प्रश्न सुटायलाच हवेत. पण त्यांचा राम मंदिर निर्माणाशी संबंध नाही.

सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा "एकावेळी एकच काम" करत नसते. राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट तयार केला म्हणजे अख्ख केंद्र सरकार

८+
तिकडेच बघत बसत नसतं.

आपले किल्ले टिकवण्यासाठी काय हवंय? आणा समोर व्हिजन डॉक्युमेंट...सगळे मिळून लढू या त्यासाठी! पण ते होईपर्यंत स्मारक उभारू नका, त्याचा विचार करू नका - अशी बायनरी मांडणी का करता?!

९+
आपल्या घरात एकाचवेळी वेगवेगळ्या आर्थिक गरजा असतात. मुलांचं शिक्षण, वडीलधाऱ्यांची तब्येत, आपल्या वैयक्तिक गरजा-आशा-आकांक्षा, भविष्याची सोय...अशी तारेवरची कसरत असते. यातील एकालाच प्राधान्य द्या, दुसरं सगळं हवेवर सोडा असं करतो का आपण? नाही! सगळं एकमेकांबरोबर गुंफत पुढे नेतो.

१०+
देशाचा गाडा असाच हाकायचा असतो. असाच हाकायला हवा.

अर्थात, फक्त प्रश्न मांडत सुटायचं व्यसन जडलं की हे सगळं समजणं, उमजणं अशक्य आहे.

लबाडी रुजली की पुढे सगळं खुंटलंच.

: ओंकार दाभाडकर
[email protected]

@threadreaderapp please unroll.
You can follow @OmkarDabhadkar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.