#Thread

किल्ले-अजिंक्यतारा
महाराष्ट्रामध्ये अशी काही शहरं आहेत ज्यांचं नाव घेताच आपल्या मनात इतिहास उभा राहतो,तसेच एक शहर म्हणजे राजधानी सातारा.याच साताऱ्याच्या सर्वोच पदावर दिमाखात इतिहासाची साक्ष देत उभा आहे तो म्हणजे किल्ले अजिंक्यतारा.आज याच किल्ले अजिंक्यतार्याची #गडावरी
पुण्यापासून अंदाजे १२० किमी अंतरावर हा किल्ला आहे,सातारा शहराच्या जवळ येऊ लागलो कि लगेच दृष्टिक्षेपास पडतो.साताऱ्याच्या अगदी मध्यभागी हा किल्ला आहे असा भासतो.गाडी अगदी वर पर्यंत जाण्याची सोय आहे.
(2/17)
ह्या किल्ल्याचा इतिहास तसा मोठा आहे म्हणून आधी इतिहास बघुयात आणि मग किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची थोडी माहिती घेऊयात.म्हणलं जातं हा किल्ला भोज शिलाहाराने बांधला आहे,गावकऱ्यांकडून या विषयी बऱ्याच कहाण्या ऐकावयास मिळतात.
(3/17)
कालांतराने इस्लामिक सल्तनती वाढू लागल्या आणि हिंदूंच्या अधिपत्यातून हा किल्ला या राजवटींकडे गेला. नगरची सुप्रसिद्ध चांदबीबी हिला ह्या किल्ल्यावर १५८० च्या दरम्यान अटक केले गेले होतं.छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बऱ्याच काळानंतर जिंकला,
(4/17)
१६७३ साली हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला आणि तो बराच काळ तसाच स्वराज्याकडे होते,पण १६९९ मध्ये इथे एक लढाई झाली.औरंगझेबाने ह्या किल्ल्याला वेढा घातला.या वेळेला या किल्ल्याचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.यांनी मोठ्या शर्थीने हा किल्ला वाचवला.
(5/17)
किल्ला जिंकता येत नाही हे समजल्यावर औरंगझेबाने या किल्ल्याच्या एका ताटाखाली सुरुंग खोदला आणि तो फोडला,तो फुटताच संपूर्ण तट कोसळला आणि तो औरंगझेबाच्या सैन्यावर येऊन पडला,त्याच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले.
(6/17)
मराठ्यांनी अजिंक्यतारा किल्ला बराच वेळ लढवून ठेवला अन एक वेळ अशी अली कि सगळे अन्न धान्य संपले आणि मग किल्ला सोडून जावा लागला.औरंगझेबाने या किल्ल्याचे नाव अजिमतारा असे देखील ठेवले.
(7/17)
या किल्ल्याने बरेच चढता उतरता काळ पहिला,हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा १७०६ मध्ये स्वराज्यात दाखल केला.छत्रपती राजाराम महाराज यांनी हा किल्ला जिंकून घेतला.१७०८ मध्ये जेव्हा शाहू महाराज आले तेव्हा हा किल्ला त्यांच्याकडे गेला.
(8/17)
या किल्ल्यावर छत्रपती ताराऊसाहेब १७३० साली अटकेत होत्या.हा किल्ला बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार आहे.१८१८ मध्ये जेव्हा मराठा साम्राज्य पडले तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि या किल्ल्याची वाताहत चालू झाली.
(9/17)
किल्ला साधारण १३०० मीटर उंच आहे,किल्ल्याला दोन दरवाजे आहेत,उत्तर दिशेला महादरवाजा आणि दक्षिणेस धाकटा दरवाजा.तट बंदी शाबूत आहे आणि त्याची रुंदी १० फूट असून उंची साधारण १५ फूट आहे,किल्ल्यावर बरेच बुरुज आहेत.या किल्ल्यावर बाजीराव दुसरे यांनी बांधलेल्या वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत
10
मंगळाई देवीचे मंदिर सुद्धा या किल्ल्यावर आहे,ह्या किल्ल्याची वेग वेगळ्या राजवटींच्या काळात डागडुजी केली गेली,पण हा किल्ला सर्वात आनंदी तेव्हाच होता जेव्हा यावर साक्षात पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज राहत होते.

(11/17)
किल्ल्याच्या सर्वोच टोकावरून खाली पाहिले तर उत्तरे कडे सातारा शहर दिसते,पश्चिमेकडे यवतेश्वर,दक्षिणेस सज्जनगड.सूर्यास्त होताना या किल्ल्यावरून खाली पाहताना एक शांततेची भावना असते, आणि मनात प्रश्नाचे काहूर माजते.
(12/17)
हे गड किल्ले म्हणजे आपल्या भूतकाळाचे,इतिहासाचे जिवंत साक्षी आहेत पण दुर्दैवाने यांच्याबद्दल लोकांना काही वाटत नाही हा विचार येऊन डोळ्यात क्षणभर अश्रू येतात.मी दरवेळेला सांगतो तसं,जेवढा शक्य होईल तेवढा इतिहास वाचा,तो वाचून अश्या किल्ल्याना भेट द्या,
(13/17)
तुम्ही जर मनापासून इतिहास वाचला असेल तर तिथले बुरुज,भिंत,तळी,मोडलेले दरवाजे तुमच्याशी संवाद साधतील.
इथे महाराज आले होते,इथे कधीतरी ते चालत गेले होते असं जाणवेल आणि नकळत आपण तिथे एका पायरीवर नतमस्तक होऊ !
(14/17)
सातारा शहराचा आणि माझं काय नातं आहे देव जाणे,पण जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा अनुभवाची,प्रेमाची आणि इतिहासाची शिदोरी नक्की घरी घेऊन जातो.
(15/17)
आजची गडावरी इथेच थांबवूयात,असेच भेटूयात पुढच्या गडावरी निम्मित! हा थ्रेड कसा वाटला ते जरूर कळवा,काही सुधारणा असतील तर अवश्य सांगा ! तो पर्यंत राम राम !
(16/17)
बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय !
सनातन हिंदू धर्म कि जय !

(17/17)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.