बाबरी नक्की कुणी पाडली? (पुराव्यासकट)👇🏻

६ डिसेंम्बर १९९२ चा तो दिवस. जवळपास २ लाख कारसेवकांनी बाबरी वर भगवा फडकवून बाबरीचा विध्वंस करण्यात आला आणि परिणाम म्हणून देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या. +
त्यानंतर दहाच दिवसांत, म्हणजे १६ डिसेंबरला काँग्रेसच्या केंद्र सरकारने घडलेल्या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी एका कमिशनची स्थापना केली.

स्थापनेनंतर तीन महिन्यांनी ह्या लिबरहन कमीशन ने ह्या घटनेमागे नेमकं कोण होतं हे शोधण्यासाठी आपले इन्व्हेस्टीगेशन सुरू केले. +
तब्बल ४८ एक्सटेनशन आणि १७ वर्षे एवढा प्रचंड वेळ घेऊन २००९ ला प्रधानमंत्री असणाऱ्या मनमोहन सिंहांकडे या कमिशनने आपला रिपोर्ट जमा केला जो की नंतर गृहमंत्री पी चीदंबरम यांनी संसदेत मांडला होता. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की जे झालं ते काही अकस्मात नव्हतं, पूर्वनियोजित होतं+
१६ वर्षे केलेल्या चौकशीत कमिशनद्वारे कल्याण सिंह, लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, मुलायम सिंह असे अनेक राजकारणी तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी या सर्वांच्या साक्षी नोंद करून घेतल्या गेल्या. कमिशनने इतरही शेकडो लोकांच्या साक्षी घेतल्या. +
बाबरी विध्वंसाची घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री असणारे कल्याण सिंह यांना या कमिशनद्वारे सगळ्यात मोठा दोषी मानलं गेलं. मनाप्रमाणे अधिकारी नेमून सर्व प्रशासनाला शांत बसायला भाग पाडलं असा निष्कर्ष कमिशनच्या रिपोर्टमधून निघत होता. +
बाबरी विध्वंस घडवून आणायला कारणीभुत ठरलेल्या ६८ लोकांची एक यादीच रिपोर्टच्या १७१ व्या सेक्शन मध्ये दिली. त्यात अटलजी, अडवणीजी असे भाजपचे अनेक नेते आणि त्याशिवाय धर्म संसद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम जन्मभूमी न्यास या संस्थांशी संबंधित लोक होते. +
या ६८ लोकांमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्वर सावे, योधनाथ पांडे, सतीश प्रधान, मोरोपंत पिंगळे हे लोकही होते.

आज बघितलं तर भाजपमध्ये सर्वांना सन्मान आहे. कुणाचंही योगदान ते विसरले नाहीत. भूमीपूजेला कोठारी बंधूंच्या परिवाराला निमंत्रण द्यायला ते विसरले नाहीत. +
पण मग शिवसेनेला आज फक्त बाळासाहेबच का आठवतात? त्यांच्याबरोबर ६८ लोकांच्या यादीत असणारे इतर ४ जण कधीच यांना का आठवत नाहीत?+
बाळासाहेबांचा उल्लेख नेहमी होतो, पण मग त्यांच्या सोबत हिंदुत्वासाठी लढलेल्या इतर सामान्य शिवसैनिकांची मात्र वडिलांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी बिनधास्तपाने कुर्बानी दिली जाते ही शोकांतिका आहे. +
You can follow @RutujaaBhamare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.