#Thread8
'अमृत आयुर्वेद'

विषय : पचनसंस्थेतील अल्सर

शरीराच्या क्रियेशी पचनसंस्था ही अत्यंत महत्वाची संस्था आहे.काही कारणाने H-Pylory या जंतूंच्या संसर्गाने जठरादी भागात दुखापत म्हणजे अल्सर्स होऊ शकतात. 1/10 https://twitter.com/Vedashree_19/status/1288893135792177152
त्याचप्रमाणे सातत्याने धूम्रपान मद्यपान सातत्याने तिखट व मसालेदार भोजन अतिरिक्त ताण ,त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे अल्सर होण्यास कारणीभूत ठरतात
आम्लपित्त झाल्यानंतर antacid घेतल्यावर तेव्हढ्यापुरते बरे वाटते पण पुढे पित्तासोबत पोट दुखते उलट्या होतात व जठराला जखमा होतात2/10
अल्सर चे अनेक प्रकार आहेत पण नेहमी जाणवणारा म्हणजे जठर व आतड्यांचा अल्सर हे आहेत . अल्सर च्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याची वेगळी लक्षणे देखील दिसतात , ती पुढीलप्रमाणे:
●पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे
●आम्लपित्त होणे
●सतत पित्त वर येऊन छातीत चमका निघणे3/10
●पोट कडक झाल्यासारखे वाटणे
●वारंवार पित्त होणे ,वजन कमी होणे , भूक मंदावणे
●अल्सर बळावल्यास दुखण्यामुळे रात्री उठून बसावं लागते. मळमळ, उलट्या , उलटी अथवा शौच्याद्वारे रक्त जाणे हे देखील होते
●अल्सर फुटल्यास पोट गच्च होऊन फुगते4/10
साध्या स्वरूपातील अल्सर असल्यास h-pylory जंतूंच्या विरोधातील प्रतिजैविके दिली जातात , त्याचबरोबर महिन्यापर्यंत आम्लपित्त मंदावण्यासाठी औषधे दिली जातात
कोणताच उपाय चालत नसेल तर मात्र शस्त्रक्रिया केली जाते 5/10
अल्सरच्या सर्वच रुग्णांना शस्त्रक्रिया न करता आम्लपित्त मंदावण्यासाठी गुणकारी औषधांची उपाययोजना केली जाते , ज्यायोगे अगदी गरज पडल्यास शस्त्रक्रियेचा विचार केला जातो अन्यथा नाही6/10
पण व्याधी होऊन त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ती व्याधी होऊच न देणे हे जास्त सोयीस्कर असते
वारंवार मसालेदार चटकदार पदार्थांचे सेवन टाळावे त्याचबरोबर धूम्रपान व मद्यपान करू नये
उगाचच रात्रीच जागरण टाळावे, आहार व निद्रा पुरेशी आणि योग्य वेळेत घ्यावी7/10
छोट्या मोठ्या दुखन्यांसाठी आपण सर्वसाधारणपणे crocin combifam brufen सारख्या वेदनाशामक घेऊन तात्पुरता आराम मिळवतो पण पुढे त्याची सवय लागते , त्यामुळे थोडी सहनशक्ती ठेवावी , अगदीच सहन न झाल्यास कृत्रिम वेदनाशंकांचा अल्पसा वापर करावा8/10
आम्लपित्त झाले की स्वतःच्याच मनाने किंवा chemistच्या सल्ल्यानेantacidघेण्याच्या सवयी लागतात,तात्पुरता दिलासा मिळत असला तरी आजाराचे गांभीर्य त्यामुळे समजू शकत नाही एकीकडे antacid घेऊन मसालेदार खाणे,मद्यपान करणे यामुळे अम्लपित्तावर इलाज होतच नाही उलट पुढे व्याधी अजून गंभीर होतात9
कित्येकदा अल्सरची च लक्षणे दिसत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते कदाचित ते कर्करोगाचे ही लक्षण असू शकते त्यासाठी वेळीच डॉ कडे तपासणी करावी
थोडक्यात दुखणे अंगावर काढून घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला , उपचार घेणे व योग्य इलाज करुन घेणे हेच शहानपणाचे ठरते 10/10
#आयुर्वेद_श्री
You can follow @Vedashree_19.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.