A brief history of Ram Janmabhoomi (1528-2020)

या थ्रेड मधे रामजन्मभूमी साठी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिलेली आहे. स्वताहा वाचा व समजुन घ्या कि कोण रामाचा पक्षधर आहे आणि कोण विरोधात, कोणामुळे ५०० वर्षांपासून हे मंदिर बनु शकलं नाही आणि कोणी राजकारणासाठी फक्त नाव (1)
घेतलं, कर्तृत्व शुन्य आहे.

सन 1528-1529: बाबरने आपला सेनापती मिर बांकीला सांगुन रामजन्मभूमीवर मशीदीचे निर्माण करविले, जी एक इस्लामिक वर्चस्वाची पद्धत आहे.

सन 1722-39: सादत अली खान(अयोध्येचा पहिला नवाब) च्या काळात हिंदू मुस्लिम लढाया झाल्या पण मुस्लिम शासक असल्यामुळे प्रकरण दबले
सन 1853: जमीन अधिग्रहणसाठी इंग्रज शासनकाळात दंगा झाला, प्रकरण कोर्टात गेले, इंग्रजांच्या फैजाबाद कोर्टाने मंदीराच्या बाहेर हिंदू व आत मुस्लिमांना नमाज पढण्याची आज्ञा केली.
सन 1855: सुन्नी लीडर गुलाम हुसेन याने हनुमान गढीवर हमला केला, दुसरा हमला झाला तेव्हा साधुंनी जोरदार प्रतिकार केला, 70 मुस्लिम मेले.
(त्यांच्या म्हणन्यानुसार तिथे पुर्वी मशीद होती, राम मंदिरचा बदला घेण्यासाठी)
प्रकरण कोर्टात गेले, साधुंनी पुर्विच्या नवाबाचे दस्ताऐवज दाखवले
(3)
ज्यात मशीदचा कुठेच उल्लेख नव्हता. पण त्यावेळचा नवाब अलीने समाजाला खुश करण्यासाठी कोर्टात गढीशेजारी मशीद उभारण्याचा प्रस्ताव टाकला.
पण हिंदूंच्या पक्क्या पुराव्यामुळे हिंदूंच्या बाजुने निर्णय आला.
(4)
त्यानंतर लीडर अमीर अलीने गुट बनवुन हमला केला, पण इंग्रज सैनिकांनी त्यांना मारल.

सन 1857: स्वातंत्रसमरानंतर नवाब शासन संपले व इंग्रज शासन लागु झाले. तेव्हा साधुंनी मशीदवर कब्जा करून बाहेर चबुतरा बांधला व पुजा करत होते, त्याबद्दल भांडणे सुरूच होती.
(5)
सन 1858: अयोध्येत मशीदीत 60 निहंग सिख घुसले व नासधुस व मशीदीच्या भिंतींवर 'राम राम' लिहले.

सन 1859: इंग्रज सरकारने राम चबुतरा आणि मशीदीच्या मधात भिंत बांधली.
(6)
सन 1885: महंत रघुबीर दास (निर्मोही आखाडा) ने रामजन्मभूमीवर पुजेसाठी फैजाबाद हायकोर्टात केस दाखल केली. केस खारीज झाली.
पुन्हा सेक्रेटरी ऑफ स्टेटविरोधात केस केली, खारीज झाली.
(7)
सन 1934: बकरी ईदच्या दिवशी गोहत्येवरुन दंगा झाला आणि बाबरी मशीदला तोडलं गेलं पण इंग्रज शासनाने त्याची दुरुस्ती केली.

सन 1936: मशीद शिया कि सुन्नी यावर वाद, शेवटी सुन्नीच्या बाजुने निर्णय.
(8)
सन 1946: अखिल भारतीय रामायण महासभाने भुमि अधिग्रहणसाठी आंदोलन सुरू केले.
9 दिवस रामचरीत्रमानस पाठमधे योगी आदित्यनाथ चे गुरु महंत अवैद्यनाथ सामील झाले.
(9)
सन 1949: श्रीरामाची मुर्ती मशीदीत अवतरली.
नेहरूने मुर्त्या बाहेर फेकायला सांगितल्या तर महंत दिग्विजयनाथने म्हटले आम्ही जिवंत असे पर्यंत असं होवु देणार नाही.
(10)
युपी सरकारने मुर्ती हटवायचा आदेश दिला पण जिल्हा मेजिस्ट्रेट के के नायरने हिंदूंच्या भावना भडकतील व दंगे होतील म्हणून या आदेशाचे पालन करण्यास असमर्थता दर्शवली व पोलिसांनी विवादीत ढाचा म्हणुन कुलुप लावले.
(11)
सन 1950: गोपाल दास विशारदने याचिका दाखल केली, श्रद्धालुसाठी कुलुप खोलण्याची मागणी केली.
परमहंस रामचंद्र दास ने दुसरी याचिका टाकली, श्रीरामाच्या मुर्तींचे विनारोक पुजा करु द्यायची मागणी केली.
(12)
सन 1959 तिसरी याचिका निर्मोही आखाडाने दाखल केली, रामजन्मभूमीच्या कस्टडीची मागणी केली.

सन 1961 युपीच्या सुन्नी वक्फ बोर्डने याचिका टाकली, मुर्ती हटवाची मागणी केली व मशीदजवळील जमीन कब्रीस्तान असल्याचे सांगितले.
(13)
सन 1964: विश्व हिंदू परिषदेची स्थापना.
काही वर्षांनी राम मंदिर आंदोलनात लक्ष घातले व संतांना एकत्रीत करण्याचे काम केले.

सन 1984: राम मंदिराच्या पालखीच्या संरक्षणासाठी विहीपने तरुणांच्या युनिटचे गठन केले, बजरंग दल नाव देण्यात आले, मुळ उद्देश राम मंदिर आंदोलन तेज करने होता.
(14)
सन 1986 पुजा करण्यासाठी पट खोलण्याची याचिका जिल्हा मॅजिस्ट्रेट कडे दिली, यापहिले फक्त वर्षातुन एकवेळ पुजा करण्याची अनुमती होती.

याच वर्षी शाहबानो प्रकरण झाले, राजीव गांधींने कोर्टाचा फैसला बदलला. देशात मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप आक्रमक होऊ लागले,
त्यापासून बचाव करण्यासाठी
(15)
करण्यासाठी जड मनानी मंदीराचे कुलुप खोलण्याचा कोर्टाचा आदेश सरकारने मान्य केला.
(16)
फेब्रुवारीत मंदीराचे कुलुप उघड्याचा आदेश आला.

हा निर्णय देणारे जज के. यम. पांडेंना रोज 30-35 धमकीवजा पत्र यायचे, अफगाणिस्तान इराण मधुनपण, जे सहा महिने चालले.

याच वर्षी अली मिंया(अध्यक्ष) ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षतेखाली बाबरी मशीद ॲक्शन कमीटीची स्थापना झाली.
(17)
सन 1987: दुरदर्शनवर रामायणचे प्रसारण सुरू.
रामायण प्रसारण हे हिंदूंसाठी प्रेरणादायी असे अशोकजी सिंघल यांचे वक्तव्य.

सन 1989: विहीपने मशीदच्या बाजूला मंदीराचा पाया रचायला सुरवात केली व जस्टीस देवकीनंदन अग्रवालने मशीद स्थलांतराचा अर्ज दिला.
(18)
11 जुन 1989: भाजपाने पालमपुर बैठकीत प्रस्ताव पास केला कि कोर्टा याबाबतीत फैसले करु शकत नाही व संसदेत बिल-कायदा आणुन हिंदूंना मंदीर सुपुर्त करावे.

कॉंग्रेसने याला चुनावी मुद्दा बनु नये म्हणून हायकोर्टाला या चार पेंडींग याचिकेंसाठी स्पेशल बेंच बनवायला सांगितले.
(19)
26 सप्टेंबर 1990: सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणीच्या नेतृत्वात सुरू झाली.

23 आक्टोबरला समस्तीपुर येथे लालु यादवने रथयात्रा रोकली.

पण आता अयोध्येला कारसेवक जमा होऊ लागले होते.
(20)
त्याचवेळी मुलायमसिंह यादवने घोषणा केली कि अयोदामे पईंदा बी पय नई माय सकता.
व 30 अक्टोबर व 2 नव्हेंबरला गोळीबार झाला, कारसेवकांना टार्गेट करुन मारण्यात आलं, बजरंग दलाच्या कोठारी बंधुंना घरातुन काढुन गोळ्या घालण्यात आल्या.
व शरीर शरयु नदीत किंवा अज्ञात स्थळी फेकण्यात आले.
(21)
1991: भाजपा मुख्य विरोधी पार्टी म्हणुन उभरली, युपीत भाजपाचे कल्याणसिंह मुख्यमंत्री बनले, मंदीर आंदोलन जोरात सुरू झाले.

या सगळ्यात मंदीर आंदोलन आणि रामायण सिरीयलमुळे देशातील वातावरण राममय झाले होते.
(22)
सन 1992: डिसेंबरमधे पुन्हा कारसेवेची घोषणा झाली. सर्व नेतृत्व, संत आणि कारसेवक अयोध्येत जमा झाले. भाषणे झाली.

6 डिसेंबर 1992: दिड लाख लोकांनी बाबरी ढांचा तोडला.

युपीच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला.

देशात दंगे भडकले 2000 लोक मृत्युमुखी पडले.
(23)
1992-93: याचा बदला म्हणून मुंबईमधे दाऊदने ब्लास्ट केले.

1993: सरकारने आसपासची 67 एकर जमीन अधिग्रहित केली.

याच वर्षी आडवाणीसह 19 लोकांवर CBI जाच सुरू झाला.

1994: इस्माईल फारुखी जजमेंटमधे मशीदीला इस्लामचा अभिन्न अंग सांगितल.

2001: आडवाणीवरील चार्ज हटला.
(24)
6 डिसेंबर शौर्यदिनाच्या 10 व्या वर्धापनदिनी विहीप वाजपेयी सरकारसमोर मंदीर बनवण्यासाठी अडुन बसले.

2002: अयोध्येवरुन येणाऱ्या कारसेवकांची गोधरा येथे ट्रेन जाळली 58 कारसेवक मृत्यूमुखी. गुजरातमध्ये दंगे भडकले, ज्यात 1000 च्यावर लोक मृत्युमुखी पडले.
(25)
याच वर्षी इलाहाबाद हायकोर्टामधे सुनवाई सुरू झाली.

2003: इलाहाबाद हायकोर्टाने पुरातत्व खात्याला खोदकामाचे आदेश दिली.

याच वर्षी संघ,विहीप,भाजपाशी संबंधित 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाने फैसला सुनावला, आडवाणी उप पंतप्रधान असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
(26)
2004: कॉंग्रेस सरकार आली. आडवाणीवर कारवाई करण्याची एका कोर्टाने पुनविचार करण्यास सांगितले

2005: लष्कर ए तयैबाचा अयोध्यावर आतंकवादी हमला, श्रद्धालुंच्या वेषात नेपालमार्गे प्रवेश केला व गाडीत बारुद भरुन मंदीराची भिंत उडवायचा प्रयत्न, CRPF ने खात्मा केला.
(27)
2009: लिब्रहान कमीटीचा रिपोर्ट आला, दोषींवर जांचसाठी बनवला होता.
भाजपा, विहीप, संघाचे 58 लोक दोषी.

2010: इलाहाबाद हायकोर्टाने विवादीत भुमिवर फैसला सुनावला, भुमिला तीन भागात विभागले.

डिसेंबर मधे हिंदू महासभा व सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली.
(28)
2011: सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निर्णयावर स्टे आणला, प्रकरण जसे आहे तसे ठेवण्यास सांगितले.

2014: केंद्रात भाजपाची मोदी सरकार आली.

2015: विहीपने देशभरातुन लोकांना विटा जमा करायचे आवाहन केले.

अखिलेश यादव सरकारने विटांचे ट्रक अयोध्येत जाऊ देणार नाही म्हणून घोषणा केली.
(29)
6 महिन्याच्या आत दोन ट्रक विट अयोध्येत पोहचली.

2016: सुब्रमण्यम स्वामीने मंदीर बनवण्यासाठी एक याचिका दाखल केली.

2017: सुप्रीम कोर्टाने आडवाणी व इतर दोषींवर कारवाई रोखण्यासाठी नकार दिला.

याच वर्षी उत्तर प्रदेशमधे भाजपाची योगी सरकार आली.
(30)
सुप्रिम कोर्टने संबंधित सर्व कागदपत्रांचे भाषांतर करण्याचे आदेश युपी सरकारला दिले.

2018: याचिका कर्तांनी इस्माईल फारुखीच्या रिपोर्टवर लक्ष देण्याची विनंती केली.

कोर्टाने लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

2019: 5 जानेवारीला 5 लोकांचे स्पेशल बेंच बनवण्यात आले.
(31)
8 मार्च कोर्टाने 3 लोकांना प्रकरणाच्या मध्यस्थीसाठी निवडले. 1. कल्लीफुल्ला 2.श्री रविशंकर 3. श्रीराम पंचु

2 ऑगस्ट मध्यस्थी पॅनल मध्यस्थी करु शकले नाही.

6 ऑगस्ट प्रतिदीन सुनवाईची सुरुवात.
18 सप्टेंबर महिनाभरात सुनवाईचे कोर्टाचे आदेश.
(32)
16 अक्टोंबरला सुनवाई समाप्त, मुस्लिम पक्षकाराने कोर्टात नकाशा फाडला.

9 नवेंबर कोर्टाने हिंदू पक्षाकडून निर्णय दिला, मशीदीसाठी वेगळी 5 एकर जागा दिली.

मंदीर समीतीचे गठन करण्यात आले.

5 ऑगस्ट 2020 भाजपाच्या पंतप्रधानांच्या हस्ते भुमिपुजन,संत, विहीप, संघाची आंदोलनातील
(33)
लोकं आमंत्रित.
(मंदीराचे सचिव चंपतरायजी (विहीप) यांनी 5 डिसेंबर 1992 ला एक वक्तव्य केलं होतं ज्याची ग्वाही बैठकींमधे दिली जाते "जब अयोध्यामे मंदीर की ईट रचना सुरू हो जाएगी हम मथुरा कि ओर प्रस्थान कर देंगे)
(34)
80% लोकसंख्येच्या देशात मंदीर निर्माणाला एवढा वेळ का लागतो?
याचे दोन उत्तर आहेत एक मुस्लिमांचा विरोध दुसरे मुस्लिम, इंग्रज, गांधी, कम्युनिस्ट यांच्या विचारांनी तयार झालेली सेक्युलर किड.
(35)
#Translated4DharmicCause
You can follow @indologyreturns.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.