#थ्रेड
कोरोना षडयंत्र की वास्तव?
काही दिवसांपासून सोशल मीडिया वर काही पोस्ट फिरत आहेत. कोरोना हे षडयंत्र आहे, प्रत्येक पेशंट मागे दीड लाख मिळतात, सुटाबुटांतील लोकांना कोरोना होतो तुमचे कपडे फटके असतील तर रिपोर्ट निगेटिव्ह येईल,घरातच गुळण्या करा, वाफ घ्या डॉक्टर कडे जाऊ नका.
असले समाजप्रबोधन करत अनेक सुपीक बुद्धिमत्तेचे वीर सोशल मीडिया वर लाईक्स चा पाऊस घेत आहेत.आणि लोकं स्वतःला बुद्धी नसल्यासारखे ते वाचून अंमलात आणत बसले आहेत. आणि याचे गंभिर परिणाम झाल्यावर आपण वाचले ते खोटे होते याची जाणीव त्यांना होते आहे.
एका लॅब मध्ये निगेटिव्ह आणि दुसरीकडे पोजिटिव्ह - हे होणं सहाजिक आहे यात कुठेही षडयंत्र नाही. मुख्यत्वे अँटीजेन टेस्ट आणि आरटी पीसीआर या 2 टेस्ट केल्या जातात. दोन्हीची reliability 100% आहे म्हणजे टेस्ट पोजिटिव्ह असेल तर ती 100% पोजिटिव्ह च असते. पण दोन्ही टेस्ट चा एरर रेट 30%
पर्यंत आहे म्हणजे पोजिटिव्ह असून ही निगेटिव्ह येणे ही गोष्ट होऊ शकते पण निगेटिव्ह असून परत पोजिटिव्ह आलो हे होऊ शकत नाही. आणि असं झालं हे म्हणणारे महाभाग दुर्लक्षित केलेले बरे.
पेशंट मागे दीड लाख😂- हे नवीन प्रकरण सध्या चर्चेत आहे. असे संगणाऱ्याला पहिले कानाखाली हणा. अशी कुठलीही योजना सरकार कडे नाही,आणि मुळात एवढे पैसे ही सरकार कडे नाहीयेत. 5% लोकांच्या टॅक्स वर आयते बसून सरकार कुठे काय करते आहे अश्या बाता मारणारे किती सिरीयस घ्यायचे?
हे करून तुम्ही तुमच्यासाठी काम करणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वछता कर्मचारी जे जीव धोक्यात घालत आहेत त्यांची राक्षसी थट्टा तुम्ही करत आहात हे लक्षात ठेवा. देशात पेशंट चा मृत्युदर 3-4%तर डॉक्टर्स आणि पोलिसांचा मृत्युदर10%आहे हे लक्षात घ्या. उगाच त्यांच्या जीवाची किंमत कमी करू नका
सुटाबुटांतील लोकांचे रिपोर्ट पोजिटिव्ह देतात- हे एक असच थोतांड सांगितलं जातं आहे.पण मित्रांनो धरावी सारखा भाग किती वाईट पद्धतीने इन्फेक्ट झाला?? सल्म्स आणि गर्दीची ठिकाणे पुण्यातील पेठा, पिंपरी तील आनंद नगर, येरवडा, खडकी हे भाग फिरा आणि पहा किती सुटबुटवाले तिथे रहातात.
घरीच काढे प्या, वाफ घ्या लक्षणं असतील तरी घरीच उपचार घ्या पण डॉक्टर कडे जाऊ नका.कारण तुम्हाला ऍडमिट करतील- या एका हेकेखोर पणा मुळे अनेक रुग्ण त्यांची लक्षणे अति गंभिर झाल्याशिवाय दवाखान्यात जात नाही, आणि परिणाम सांगायला नको.
त्यामुळे सोशल मीडिया वरून आपण काय
घ्यायचं आणि काय नाही हे तारतम्य राखून काळजी घ्या. आपल्यासाठी आरोग्य सेवक, स्वछता कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी त्यांचे जीव धोक्यात घालून लढत आहेत, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उमेद खचवु नका,कारण ते खचले तर तुम्हाला कोणी वाली रहाणार नाही हे नक्की☹️☹️
You can follow @sukrutkuchekar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.