वाचनाची खरी गोडी लावण्यात माझ्या शाळेतील "करूणा जोशी" मॅडम यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्यामुळे मला #वाचनाची गोडी लागली व कालांतराने तिचे सवयीत रूपातर झाले.शाळेत ऑफ तासाला त्या वर्गात #अवांतर वाचनाचं एखादं पुस्तक वाचुन दाखवायच्या.त्या वेळी https://twitter.com/LetsReadIndia/status/1287958738444464135?s=19

त्या लक्षुमीबाई टिळकांच " #स्मृतिचित्रे" हे पुस्तक वाचुन दाखवत होत्या.त्यांच वाचन इतकं उत्तम होतं की बस,मोठ्याने वाचत असताना आवाजातील चढ-उतार कसे असावेत हे सांगण्याचा त्यांचा हेतू होता. वाचताना त्या अक्षरशः प्रसंग समोर उभा करायच्या.
#LetsRead
#LetsRead
पण प्रत्येकवेळी ऑफ तास मिळेल असं व्हायच नाही त्यामुळे "स्मृतिचित्रे" हे पुस्तक अर्ध राहिलं व ते अश्या ठिकाणी थांबलं कि पुढे काय होणार याची उत्सुकता मुलांना लागून राहिली. घराशेजारी असणाऱ्या लायब्ररीत ते पुस्तक असल्याच कळालं,पण ते पुस्तक घरी नेऊन वाचायच असेल तर त्या ठिकाणी सभासद
व्हायच असा नियम होता.ते काय मला त्यावेळी शक्य नव्हतं.घरी घेऊन जायच नसेल तर त्या ठिकाणी बसून वाचता येऊ शकत होतं. पहिल्यांदा असं लायब्ररीत बसून पुस्तक वाचुन काढलं साधारण ७वित असेन त्यावेळी.
हळू हळू पुस्तक वाचनासोबत त्या ठिकाणी येणारे पेपर देखील वाचनात येऊ लागले.
हळू हळू पुस्तक वाचनासोबत त्या ठिकाणी येणारे पेपर देखील वाचनात येऊ लागले.
सकाळ पेपर मधील #सप्तरंगच्या पुरवणीत उत्तम कांबळे यांचे खूप मस्त लेख यायचे,हा माझ्या वाचन प्रवासात भर टाकणारा महत्वाचा घटक होता.अश्या पद्धतीने मला वाचनाची गोडी लागली. स्वतःखरेदी करून वाचलेलं पहिलं पुस्तक वीणा गावणकर यांनी अनुवादित केलेलं "एक होता कार्व्हर" स्वतःच्या संग्रही
असावीत अश्या पुस्तकांपैकी ते एक पुस्तक होतं.त्यानंतर कित्येक पुस्तकं खरेदी करण्याची जणू आवड लागली.
आज @LetsReadIndia तुमच्या स्तुत्य उपक्रमामुळे मला माझा वाचन प्रवास कसा सुरु झाला हि सांगण्याची संधी दिलीत या बद्दल तुमचे धन्यवाद.शाळा व लाययब्ररीतील घटनांना पुन्हा उजाळा मिळाला
आज @LetsReadIndia तुमच्या स्तुत्य उपक्रमामुळे मला माझा वाचन प्रवास कसा सुरु झाला हि सांगण्याची संधी दिलीत या बद्दल तुमचे धन्यवाद.शाळा व लाययब्ररीतील घटनांना पुन्हा उजाळा मिळाला