खूप वर्षांपासून हिंदूनाच 'सर्व धर्म समभाव' शिकवण्यात येत आहे. राम मंदिर पुनर्निमाणाच्या निमित्ताने ह्यात हिंदूंच्या भावनांचा अनादर आणि उपेक्षाच केली जात आहे. मनात कुठेतरी ह्या गोष्टी खटकत होत्याच.. त्यामुळे आपले विचार ईथे व्यक्त करत आहे.
माझी एक मैत्रीण आहे. तिला पाठपूजेमध्ये अजिबात रस नव्हता. देवावर विश्वास नव्हता. तिचं लग्नाचं वय झालं. ती स्पष्टवक्ती असल्याने ह्या सर्व गोष्टी आधीच सांगायची. परिणाम अपेक्षित असेल तोच व्हायचा. लग्न जुळायचं नाही. आम्ही दोघी मग आपापल्या आयुष्यात व्यस्त झालो.
एक वर्षाने मी तिला फोन केला. वरवर गप्पा झाल्यावर मी तिला रविवारी भेटूया म्हटलं. 'रविवारी नको, रविवारी मला दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत चर्चमध्ये सर्व्हिसला जायचं आहे'
मी उडालेच!! हीच का ती मैत्रीण जी म्हणायची माझा अश्या कर्मकांडावर विश्वास नाही? म्हणाली 'मला चर्चेमध्ये शांती मिळाली'
मी उडालेच!! हीच का ती मैत्रीण जी म्हणायची माझा अश्या कर्मकांडावर विश्वास नाही? म्हणाली 'मला चर्चेमध्ये शांती मिळाली'
हा एकच किस्सा नाहीये. खूप वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये असताना ख्रिसमसला बिल्डिंगमधल्या एका बाईने मला घरी बोलवून केकसोबत बायबलचं निळं पुस्तक भेट दिलं. मी ते घेतलंही. नंतर त्या आमच्याकडे गप्पा मारायला आल्यावर मी त्यांना इंग्रजीत अनुवादित भगवद्गीता भेट केली, ती त्यांनी नम्रपणे नाकारली
माहिम पश्चिमेला कधीतरी रात्री स्टेशनबाहेर 'जिस लव्ह्ज यू' चा प्रसार करणाऱ्या कोवळ्या हिंदू मुली तुम्हाला पहायला मिळतील. मिशनऱ्यांचं हे धर्मांतरण केवळ गावच्या वेशीपाशी न थांबता शहरात येऊन दाखल झालंय आणि अजूनही जर आपण 'सर्व धर्म समभाव' करत गप्प बसलो तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू.
राममंदिर पुनर्निर्माण हा 'नॅशनल डिबेट' चा मुद्दा होऊच कसा शकतो? का आम्हां हिंदूंना आम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करावं लागतं पदोपदी. का आम्ही आमच्याच देशात हिंदू असल्याची शिक्षा भोगायची? हिंदू धर्म ईतका पुरातन आणि विशाल आहे कि तुमचं बेगडी 'सर्व धर्म समभावा'चं ज्ञान तोकडं पडेल.
सर्वं खल्विंदं ब्रम्ह तज्जलानिती शान्त उपासित।
ब्रम्ह चराचरातीत आणि कालातीत आहे. आपण ईश्वरापासून भिन्न नाही. त्यामुळे ईश्वरास प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अमुक करा असं बार्गेनिंग नाही किंवा तुमच्या पापांसाठी ईश्वराने मृत्यू स्वीकारला अशी उपकाराची भाषाही नाही. आपण सारे, हे जगच ईश्वर
ब्रम्ह चराचरातीत आणि कालातीत आहे. आपण ईश्वरापासून भिन्न नाही. त्यामुळे ईश्वरास प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अमुक करा असं बार्गेनिंग नाही किंवा तुमच्या पापांसाठी ईश्वराने मृत्यू स्वीकारला अशी उपकाराची भाषाही नाही. आपण सारे, हे जगच ईश्वर
हिंदू धर्म ईतका सार्वभौम आहे कि इतक्या हजारों वर्षांत आम्हाला आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करावा लागला नाही. किंवा आम्ही आमचाच धर्म श्रेष्ठ असा वादही घालत बसत नाही. हजारों लाखों वर्षांपासून हिंदू केवळ आपलाच धर्म पालन करीत आले आहेत. हिंदूंशिवाय सर्व धर्म समभावाला कोण विचारतं हो?
तुम्ही मस्जिद, चर्च उभारता तेव्हा कोणीही हिंदू तुम्हाला धर्मविरोधी, असहिष्णू, आतंकवादी ठरवत नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा संवैधानिक आणि मनुष्य म्हणून अधिकार आहे हे आम्हांला कळतं, मग हिंदूंच्याच सण-समारंभावेळी, मंदिर निर्माणावेळी तुमचा 'सर्व धर्म समभाव' जागा होतो?
तुमचा रोजा संपवायची वेळ झाल्यावर दुकानात 30-40 मिनीटे वाट पाहणारा हिंदूच असतो. तुमच्या ईद, ख्रिसमसला जेव्हा तुम्ही 20 दिवस रजेवर असता तेव्हा आॅफिसमध्ये तुमचं काम करणारा हिंदूच असतो. जो स्वतःच्या गणपतीसाठी सुट्टी मिळावी म्हणून महिने आधी अर्ज करतो, ओव्हरटाईम करतो. आम्ही असहिष्णू?
कोण कुठला टुकार हिंदूद्वेषी दिग्दर्शक एक मालिका बनवतो ज्यात आपल्या धर्माच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आपण उघड्या डोळ्यांनी निमूटपणे सहन करतो आणि 'अहं ब्रह्मास्मि' ची टी-शर्ट विकत घेऊन आपण आपला कूलनेस कोशंट दाखवतो. का? तर हिट डायलॉग म्हणून! एकदम लिट! व्वा रे माझ्या मिलेनियल!

'प्रभू रामचंद्र तिथेच, होते आणि राहतील तर मंदिराची गरज का? किंवा मनुष्य ईतका मोठा नाही झाला कि ईश्वरासाठी घर बांधून देईल. माझे वैश्विक विचार आहेत..' असं म्हणणाऱ्यांनी एकदा हे ईतर धर्मियांना बोलून दाखवावं.. ते तुमची ही तळी तोवरच उचलून धरतील जोवर त्यांना आपली पोळी भाजून घेता येईल.
ईश्वर हा इच्छाविरहीत आहे. देवाला मंदिराची गरज खचितच नाही पण मनुष्याला ईश्वराची गरज निश्चितच आहे आणि मंदिर हे करोडो लोकांच्या आस्थेचं प्रतिक आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षांच फलस्वरूप आहे. ईश्वरापेक्षा आपल्याला ईश्वराची जास्त गरज आहे.
आता गरज आहे ती थुकरट सिरीज मधे 'अहं ब्रम्हास्मि' अश्या डायलॉगबाजीने प्रेरित न होता स्वतःलाच ओळखण्याची. स्वतःलाच प्रश्न विचारण्याची, 'कोऽहम'..' कोऽहम?
जीवन्तं मृतवन्मन्ये देहिनं धर्मवर्जितम् ।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी न संशयः ॥
सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥
जीवन्तं मृतवन्मन्ये देहिनं धर्मवर्जितम् ।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी न संशयः ॥
सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥
