28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याला आज 8 महिने पूर्ण झाले आहेत !
त्यानिमित्ताने महाविकास आघाडी ने आज परेंत कसे फक्त खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे ह्यावर हा #Thread
आर्थिक पॅकेज ला आधी मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता , पण स्टीयरिंग हातात असलेल्या दादांनी "आर्थिक पॅकेज" देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही असले कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही !
सात बारा कोरा नाही केला तर पवार नाव लावणार नाही अश्या गोष्टी केलेल्या दादांनी
आणि शेतकऱ्यांना बांधावरून 25 हजार प्रति हेक्टरी मदत करणाऱ्या उद्धव साहेबानी फक्त 2 लाख परेंतची कर्जमाफी तेही 3 महिन्यात देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही !!
कोरोना काळात , पाच सदस्यांची "कोरोना समिती स्थापन करणार" अशी माहिती राजेश टोपेनी दिली होती !
कोणी बघितली का ही समिती ??
कधी प्रेस कॉन्फरन्स झाली का ह्या समिती ची ???
रुग्ण वाहिकेचे दर निश्चित करणार असे बोलले होते टोपे साहेब !!
कोणी सांगू शकेल काय दर निश्चित झाला ???
फिव्हर क्लिनिक सुरू करणार होते !
पण ही घोषणा देखील हवेत विरून गेली !!
पशुधनाची काळजी घेण्यासाठी किती फिरती चिकित्सालये सुरू झाली बरे ?!!
शाळा फी निश्चित झाली का ??
किती शाळा सुरू झाल्या बरे ????
पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटण्याची पुडी सोडली होती !!
किती विद्यार्थी ?? तर पावणे दहा लाख !! 😁
भाजपा ने आमचे फोन टॅप केले असा आरोप करून रान पेटवले होते !! त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी समिती पण नेमली होती !! आता ही समितीच "टॅप" करायची वेळ आली आहे ! पण त्यांचा रिपोर्ट अजूनही आला नाही 😂
नौकर भरतीची थापच होती हे आता स्पष्ट झाले आहे !!
महसुलात वाढ व्हावी म्हणून , खाजगी वाहन धारकांना बस बांधणी कडे आकर्षित करणार म्हणाले होते !! पण उलट ह्यांनी 10 हजार ST कर्मचाऱ्यांना नारळ दिला !
निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या लोकांना रोख 10 हजार देणार अशी घोषणा करण्यात आली होती ! पण वादळ गेलं तशी घोषणा ही गेली !!
खोट्या बियाणावरून तोंडावर पडलेल्या सरकार ने , कारवाई करू असे आश्वासन दिले होते पण ते देखील खोटेच निघाले !!
घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीत "समनवय समिती" स्थापन करून , प्रत्येक निर्णय एकमताने घेवू असे पवार साहेब बोलले होते !
पण अशी कोणतीही समिती कधीच काम करतांना दिसली नसून , ही शुद्ध थाप होती हे आता सिद्ध झालय !
आघाडी स्थापन झाल्याच्या दिवशी पक्षप्रमुखानी सह्या मारून "कॉमन मिनिमम प्रोग्रॅम" जाहीर केलेल्या तिघाडीने ह्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नसून , ह्या कागदाला रद्दी मोल केलेले आहे !
एकाहून एक मोठी खोटी आश्वासने देवून ह्यांनी विरोधकांचा जाऊच द्या त्यांच्याच समर्थकांच्या डोळ्यात ...
धूळफेक केलेली आहे !आघाडीत कोणीच कोणाला अकाऊंटेबल नसून वाट्टेल तसा कारभार हाकण्यात येत आहे! जनतेसाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करण्यात येत आहे! त्यामुळेच जनता उपाशी असतांना मंत्र्यांच्या गाड्या साठी कोट्यवधी खर्चले जात आहेत ! तेव्हा सावधान रहे सतर्क रहे👍
You can follow @khadaksingh_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.