कोविड 19 मधून एकदा बरे झाल्यानंतर तुम्हांला कोरोना रिइन्फेक्शनची शक्यता कमी पण होऊ शकते. कोरोना वायरस ज्या फॅमिलीतून आहे त्या SARS 2003 चायना आणि MERS 2012 वायरस अँटिबॉडीज 1 वर्षभर टिकत असल्या कारणाने कोरोना अँटिबॉडीसुद्धा वर्षभर टिकावी असा अंदाज होता पण सध्या तसे दिसत नाही ...1
इम्युनिटी पासपोर्ट स्कीम नुसार अनेक देशांमध्ये कोरोनातून बरे झालेल्या लोकांसाठी ट्रॅव्हलींग, वर्कींग तसेच त्यांच्या रोजच्या जगण्यावर कोणतीही बंधनं न लावता मोकळीक देणार होते मात्र अँटिबॉडी लेव्हल कमी होत असल्याने ते लोक पुन्हा कोरोना बाधित होऊ शकतात म्हणून हा प्रयोग केला नाही
किंग्स कॉलेज लंडन , नेचर मेडिसिन तसेच इतरही काही संस्थेचे रिसर्च पेपर मी वाचले त्यामहिती नुसार शरीरातील अँटिबॉडीज 4 महिन्यातच कमी होत आहेत. अँटिबॉडीचे प्रमाण कमी होत असताना जर तुमच्या शरीरात वायरसचा प्रवेश झाला आणि त्याचा वायरल लोड जास्त असेल तर रिइन्फेक्शनची शक्यता असते
जेव्हा तुम्हांला रिइन्फेक्शन होते तेव्हा तुम्ही माईल्ड or सिम्पट्म फ्री असण्याची शक्यता अधिक असते. कारण कोरोना वायरस तुमच्या शरीरातील मेमरी सेल्सच्या आधीच लक्षात असल्याने इम्युन सिस्टीम पटकन उभी करता येते म्हणून पहिल्या अनुभवापेक्षा दुसऱ्यांदा कोरोना वायरसला बॉडी ईजिली मॅनेज करते
जर अँटिबॉडीज काही महिन्यातच वेगाने कमी होणार असतील तर आपण अँटिबॉडी इम्युनिटीवर डिपेंडं राहू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल्सचे T सेल आणि B सेल असे दोन प्रकार आहेत. दोघेही काम एकत्र करतात मात्र त्यांची काम करायची पद्धत वेग वेगळी आहे
B सेल्स निर्मित अँटिबॉडीज ... वायरसला आपल्या शरीरातील सेल्समध्ये जाण्यापासून रोखतात त्यामुळे आपल्या शरीरात कुठलीही इन्फेक्शन, डॅमेज होत नाही तसेच अँटिबॉडी वायरसला न्यूट्रलाईज करतात म्हणजे कोरोना वायरसची तुमच्या शरीरात इफेक्शन करण्याची शक्ती, क्षमता कमी किंवा नष्ट करतात
T सेल्स शरीरातील वायरसने इन्फेक्ट केलेल्या सेल्सला मारते त्यामुळे इन्फेक्शन वाढत नाही आणि B सेल्सला अँटिबॉडी तयार करण्यासाठी कम्युनिकेट स्टीमुलेट करते. T सेल इम्युनिटी अनेक वर्षे टिकते. SARS वायरस मधून जे लोक बरे झाले, 17 वर्षानंतर आजही त्यांच्या शरीरात T मेमरी सेल दिसून येतात
वायरसचा प्रतिकार करण्यासाठी ज्या प्रकाराची इम्युनिटी सिस्टीम उभी करायची आहे त्यानुसार वॅक्सिन डिजाईन केले जाते. कधी अँटिबॉडी आणि अँटिबॉडी स्टीमूल्येट करणाऱ्या सेल्स वर भर दिला जातो तर जिथे अँटिबॉडीज पुरेशी नाही तिथे T सेल्स आणि अँटिबॉडी B सेल्स कॉम्बिनेशन वापरले जाऊ शकते
वायरस नुसार डिजाईन बदलते ऑक्सफर्ड वॅक्सिन T आणि B सेल्स ट्रिगर करतात. दुसरा बूस्टर डोस वायरसला 100% न्यूट्रलाईज करण्यात यशस्वी आहे. सर्वात महत्वाची फेज 3 ट्रायल ज्यामध्ये वॅक्सिनचे किती डोस द्यावे लागतील, त्याची इफिशिअन्सी लेव्हल, सेफ्टी स्टडीज अश्याअनेक पॅरामीटर्स वर अभ्यास होईल
अनेक देशात मोठ्या प्रमाणात फेज 3 ट्रायल होतील त्यामध्ये आपल्या देशातील 5 हजार लोकांवर ट्रायल होणार आहे. फेज 3 ट्रायल झाल्यानंतर लहान मुलांवर सुद्धा ट्रायल करणार आहेत .... या सगळ्या पॅरामिटर्स वर ट्रायल यशस्वी झाल्यानंतरच वॅक्सिन निर्मिती होईल ... फेब 2021 👍
You can follow @Madhuri47_47_47.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.