#टिळक_पुत्रांची_शोकांतिका
सन १९२४ मध्ये ब्राम्हणी वृत्तीचा समाचार घेणारे" देशाचे दुश्मन " हे पुस्तक दिनकरराव जवळकरांनी लिहून प्रसिद्ध केले.यात टिळक-चिपळूणकर घराण्याची बदनामी होत आहे म्हणून टिळकांचे चिरंजीव श्रीधर टिळक यांनी या पुस्तकाचे
(1)
सन १९२४ मध्ये ब्राम्हणी वृत्तीचा समाचार घेणारे" देशाचे दुश्मन " हे पुस्तक दिनकरराव जवळकरांनी लिहून प्रसिद्ध केले.यात टिळक-चिपळूणकर घराण्याची बदनामी होत आहे म्हणून टिळकांचे चिरंजीव श्रीधर टिळक यांनी या पुस्तकाचे
(1)
लेखक ,मुद्रक आदी सर्वांवर न्यायालयात खटला दाखल केला आणि न्यायालयाने जवळकर-जेधे-लाड-बागडे आदींना शिक्षा ठोठावली. पुढे या खटल्याविरुध्द डॉ आंबेडकर यांनी पिटीशन दाखल केले व सर्वांची मुक्तता करून दाखविली. पण काळाचा महिमा अगाध असतो.
(2)
(2)
ज्या श्रीधरपंत टिळकांनी जेधे-जवळकर यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता तेच श्रीधरपंत टिळक पुढील काही वर्ष जेधे-जवळकरांचे जिवलग मित्र म्हणून वावरले. टिळकांचे वारसदार म्हणून त्यांचा राजकीय वारसा चालवणारे न. चि. केळकरांचा गट गांधी-आंबेडकर विचारधारा संपवण्याची मनसुबे रचत असताना
(3)
(3)
त्याच टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत डॉ आंबेडकरांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या विचारधारेला वाहून घेतात. पुढील आयुष्यात अशी कोणती प्रचंड उलथापालथ झाली, ज्यामुळे श्रीधरपंतांनी टिळकपंथीयांची विचारधाराच उलटवून टाकली.
लो. टिळकांचे दोन्ही चिरंजीव धार्मिक व सामाजिक बाबतीत
(4)
लो. टिळकांचे दोन्ही चिरंजीव धार्मिक व सामाजिक बाबतीत
(4)
अत्यंत पुरोगामी विचार सरणीचे होते. साहजिकच टिळकांनी काही बाबतीत स्वीकारलेल्या सनातणीपणाला त्यांचे दोन्ही चिरंजीव विरोधच करीत. त्यामुळे टिळकांच्या मृत्यू नंतर सनातनी टिळक पंथीया सोबत या दोन्ही चिरंजीवाना जुळवून घेणे शक्यच नव्हते. पण त्यातून टिळकपुत्रांची
(5)
(5)
उद्भवलेली शोकांतिका प्रचंड उद्विग्न करणारी ठरली. त्यांच्या शोकांतिकेस कारणीभूत ठरणाऱ्या घटना त्यांच्या जीवित कार्यातच सापडतात
◆ फर्ग्युसन कॉलेज : :- सन १९१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज हे टिळक विरोधकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असे.कुठलाही टिळकभक्त या कॉलेज पासून
(6)
◆ फर्ग्युसन कॉलेज : :- सन १९१६ मध्ये फर्ग्युसन कॉलेज हे टिळक विरोधकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असे.कुठलाही टिळकभक्त या कॉलेज पासून
(6)
चार हात दूर राहत असताना टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांनी मात्र या कॉलेजात प्रवेश घेतला तेव्हाच अनेक टिळक पंथीयांच्या भिवया रागाने श्रीधर पंतावर उंचावल्या. पण श्रीधरपंतांनी त्याची भीडमुर्वत अजिबात बाळगली नाही.
(7)
(7)
◆ रामभाऊ टिळक: :- लोकमान्य टिळकांचे जेष्ठ चिरंजीव रामभाऊ टिळक हे मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण घेत होते..त्यावेळेस त्यांच्या सोबत प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खड यांच्या नात मुक्ताबई डिसेक्शन पार्टनर होत्या.
(8)
(8)
दोघेही भिन्न जातीचे टिळकांच्या चाहत्यांना ही बाब सहन झाली नाही. त्यांनी टिळकांचे कान फुंकण्यास सुरुवात केली. रामभाऊ मुक्ताशी लग्न करण्याची शक्यता आहे ,तेव्हा वेळीच पावले उचला. लगोलग टिळकांनी रामभाऊ ना फैलावर घेऊन पार्टनर बदलून घ्यायला सांगितले.
(9)
(9)
रामभाऊनी त्यांना समजावून सांगितले की अडनावतील T या समान आद्यक्षरामुळे माझी व मुक्ताईची डिसेक्शन पार्टनरशिप झाली. स्वतःहून पार्टनर बदलून घ्यायला रामभाऊनी नकार दिला. टिळकांनी प्राचार्या कडून ही पार्टनर शिप बदलून घेतली आणि रामभाऊ - मुक्ताची जवळीक संपवली.
(10)
(10)
पण त्यामुळे रामभाऊ प्रचंड दुखावले रामभाऊंचे म्हणणे होते की दोन हिंदू घराणी जातीभेद मोडून जोडली जाण्यात गैर काय आहे ? असा विवाह झाला तर मोठा व्याकरणकार किंवा डॉक्टर टिळक घराण्यात निपजेल. पण आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या पटेल विधेयका विरुद्ध विरोधाची
(11)
(11)
प्रचंड झोड उठवणाऱ्या टिळकांना हा मिश्र विवाह कसा पसंत पडेल.साहजिकच रामभाऊंकडे दात - ओठ खात बसण्या शिवाय पर्याय नव्हता.
(12)
(12)
◆ समुद्रगमनाचे प्रायश्चित : :- #टिळक विलायतेतून परत आल्यापासून सनातनी चाहत्यांनी त्यांना समुद्रगमनाचे प्रायश्चित घ्यावे असा लकडा लावला. टिळकांनीही सवडीनुसार प्रायश्चित घेईन म्हणून वेळ मारून नेली. पुढे जेव्हा १९२० मध्ये श्रीधर पंतांचे लग्न निघाले तेव्हा टिळकांनी
(13)
(13)
प्रायश्चित घ्यायचे ठरवले. श्रीधर पंतांना वडिलांनी प्रायश्चित घ्यावे हे तर मान्यच नव्हते. लग्नाचे निमित्त करून सनातनी लोक आपल्या वडिलांची कोंडी करतील हेही श्रीधर पंतांना लक्षात आले होते. तरीही त्यांनी वडिलांशी वाद घातलाच.परंतु टिळकांनी शेवटी मुलाचे न ऐकता समुद्र गमनाचे
(14)
(14)
प्रायश्चित घेतले ते घेतलेच. वरील प्रसंगातूनही श्रीधर पंतांचा धार्मिक पुरोगामी पणाचा दृष्टिकोन लक्षात येतो.
(15)
(15)
◆ केसरी पत्राचे विश्वस्त::- सॅन १९२० मध्ये टिळकांच्या मृत्यू नंतर न. चि. केळकर व आदी विश्वस्तकडे केसरी व मराठा वृत्तपत्राची जबाबदारी आली. परंतु केसरीचे विश्वस्त व टिळकपुत्र यांचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हते. विशेषतः केळकर केसरीच्या माध्यमातून जे राजकारण करत ते
(16)
(16)
श्रीधरपंतांना अजिबात मान्य नव्हते . केळकर,विद्वांस,केतकर या विश्वस्तांनी टिळकांचा विश्वासघात केला. सोबत आमची आई व आम्हालाही फसवले. प्रत्यक्ष आपल्या अन्नदात्या गुरूंच्या पुत्रांना ज्यांनी चकवले ते लोक हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देण्याच्या खरोखरीच लायकीचे आहे का ?
(17)
(17)
असा ते जाहीर प्रश्न विचारू लागले आणि त्यामुळे केसरी विश्वस्त व टिळकपुत्र यांच्यातील संबंध अधिकच ताणल्या गेले.
(18)
(18)
◆ म.फुले जन्मशताब्दी::-नोव्हेंबर १९२७ मध्ये मुंबई येथे म. फुले यांची जन्म शताब्दी साजरी झाली. या सभेत श्रीधर पंतांनी केलेल्या भाषणाने प्रचंड खळबळ माजली. म. फुले यांचा गौरव करताना श्रीधरपंत म्हणाले की, म.फुले जन्माला आले त्याच दिवशी पेशव्यांच्या भव्य वाड्याला आग लागली हा
(19)
(19)
योगायोग काही विलक्षण आहे. स्वतःच्या लेखनातूनही श्रीधरपंत अत्यंत स्फोटक विचार मांडू लागले. एकदा त्यांनी लिहिले की भिक्षुक वर्ग हा आपखुषीने चातुवर्ण व्यवस्थेच्या डोलाऱ्याखाली सुरुंग लावण्यात कधीही तयार होणार नाही. ते काम ब्राम्हणेतर चळवळीचे आहे. व ते काम त्यांनी मोठ्या
(20)
(20)
शिताफीने व धिटाईने पार पाडले पाहिजे. सत्यशोधक ब्राह्मणे तरांशी श्रीधरपंतांनी साधलेल्या या जवळीकीमुळे जेधे-जवळकर ,श्रीपतराव शिंदे गायकवाड वाड्यातील टिळकांच्या दिवाणखान्यात तर श्रीधरपंत जेधे मेनशेंनमध्ये ,असा प्रकार पुणेकरांना पाहायला मिळू लागला.
(21)
(21)
◆ #गायकवाड_वाड्यातच_समता_संघ::- बाबासाहेबांनी समता संघाची स्थापना केल्या नंतर ८ एप्रिल १९२८ रोजी श्रीधरपंतांनी गायकवाड वाड्यातच समता #संघाची_शाखा_उघडली .पुढे वाड्यातच #सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला. श्रीधरपंतांचा हा कार्यक्रम सनातनी #टिळक पंथीयांना सहन होणे शक्यच नव्हते.
(22)
(22)
शिवाय बाबासाहेबांनी नुकतीच महाड सत्याग्रहात मनुस्मृती जाळलेली आणि या सत्याग्रहाला श्रीधरपंतांचा पाठिंबा त्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले. भोपटकरांनी आपले मुखपत्र" भाला" मध्ये लिहिले -समता संघाची शाखा लोकमान्यांच्या सज्जन वाड्यात त्यांच्याच चिरंजीवाच्या
(23)
(23)
नेतृत्वाखाली स्थापन व्हावी हे दुर्दैव आहे. लोकमान्य चातुवर्णभिमानी होते हे अम्हास पक्के माहित आहे. खुद्द लोकमान्यांच्यवाड्यात व त्यांच्याच चिरंजीवाच्या देखत ब्राम्हण-ब्राम्हणेतर व अस्पृश्यानी एके ठिकाणी चहापान करावे ही ब्राह्मण जातीवर मोठी आपत्ती ओढवली आहे..
(24)
(24)
◆ श्रीधरपंतांची आत्महत्या::- केसरी विश्वस्तांशी चाललेल्या कोर्ट कचेऱ्याच्या ताणामुळे श्रीधरपंत पार खचून गेले. केसरी- मराठा सारख्या साधन संपन्न संस्थेशी कायद्याची लढाई करण्यात आपण पुरे पडत नाही, हा अनुभव त्यांना आला. प्रचंड निराशेने त्यांनी आत्मघाताचा मार्ग स्वीकारला आणि
(25)
(25)
◆ श्रीधरपंतांचे बाबासाहेबास पत्र::-मरणाच्या काही तास अगोदर श्रीधर पंतांनी बाबासाहेबांना आपल्या आत्महत्येची पूर्वसूचना देणारे पत्र लिहिले. परन्तु २६ मे१९२८ला जळगाव येथे भरणाऱ्या सभेसाठी बाबासाहेब निघून गेले होते. त्यामुळे श्रीधर पंतांचे पत्र त्यांच्या हातात पडलेच नाही.
(27)
(27)
त्यांनी पत्रात लिहिले होते की, हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल .माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरनविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्र मंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा.
(28)
(28)
◆ बाबासाहेबांच्या नजरेतून श्रीधरपंत टिळक::- श्रीधरपंतांच्या आत्महत्येने बाबासाहेबांना अत्यन्त दुःख झाले. आपल्या भावना प्रदर्शित करणारा लेख त्यांनी "दुनिया" पत्रासाठी लिहिला तो असा- श्रीधरपंताची आत्महत्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पाडते.
(29)
(29)
आपले आयुष्य केसरी कंपुशी भांडण्यात जाणार. विधायक काम करण्यास अवसर राहणार नाही. यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतावर यावी यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती? टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी टिळकांचा
(30)
(30)
मुलगा म्हणून नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात त्यांचा समावेश करावयास पाहिजे होता. श्रीधर पंतांचीं दृष्टी अनुदार नव्हती ,तसे जर असते तर त्यांनी ट्रस्टडिड वर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे विश्वस्त म्हणून वावरत आहे,
(31)
(31)
त्यांना तसे वावरता आले नसते. याची आठवण केसरी कंपूला असती तर किती बरे झाले असते. समता संघाच्या स्थापनेचा पश्चाताप होऊन आत्महत्या केली, अश्या मूर्खपणाच्या वलग्ना करणाऱ्या भालाकाराणे आपला शहाणपणा आटोपता घ्यावा. समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यायचे होते,
(32)
(32)
हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते समता संघ असे नाव न देता. "चातुवर्ण विध्वंसक समता संघ " हे नाव दिले यावरून सिद्ध होत आहे. त्यांचे वडील बा. ग. टिळक यांना १९१९ साली जेव्हा मी "मूकनायक" पत्र चालवत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहत असे.
(33)
(33)
ब्राम्हण्यशी अहर्निश झगडणाऱ्या माझ्या सारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राहमन्यभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधर पंतांच्या मरणाने दुःखी व्हावे. हा योगायोग विशेष विलक्षण आहे. हे कोणीही कबूल करेल .(दुनिया ,मुंबई शनि. २जून१९२८).
(34)
(34)
◆ रामभाऊचा एकाकी लढा::- श्रीधरपंतांच्या मृत्यूनंतर रामभाऊ एकटे पडले ,ते विलक्षण जिद्दी असल्यामुळे त्यांनी हार मानली नाही. न्यायालयीन व न्यायालयबाह्य उपोषणादी लढाया लढण्यात त्यांनी हयात घालविली, ती जवळ- जवळ अपयश पचवितच .श्रीधरपंतांनी आपला लहान मुलगा जयंत याचा
(35)
(35)
अज्ञानपालक म्हणून रामभाऊची नियुक्ती केली होती. परन्तु केसरी विश्वस्ताशी लढणे आवाक्या बाहेर असल्याची खात्री पटल्याने जयंताची आई त्याला घेवून माहेरी निघून गेली. तरीही रामभाऊंची एकाकी लढत चालूच राहिली. अश्याच एका खटल्यात रामभाऊंना दहा दिवसांची शिक्षा झाली
(36)
(36)
३०सप्टेंबर १९२८ रोजी शिक्षा भोगून येरवड्याच्या तुरूंगातून बाहेर पडले. तेव्हा जेधे-जवळकर -शिंदे-राजभोज त्यांच्या स्वागतासाठी आले. त्यांनी रामभाऊंची मिरवणुक काढली. गायकवाड वाड्यातील पटांगणात भरलेल्या सत्कार सभेत ज्यांनी रामभाऊंच्या गौरवपर भाषणे केली.
(37)
(37)
त्यात "देशाचे दुश्मनकार" दिनकरराव जवळकरही होते. काळ चक्र फिरते ते असे-पण पुढे केसरी विश्वस्तांशी लढतांना रामभाऊंना शेवटपर्यंत यश आलेच नाही....परन्तु टिळक पुत्रांच्या शोकांतिकेतून आपणास बघावयास मिळतो काळाचा अगाध महिमा.
(38)
(38)