US defence warfare अभ्यासक्रमात पालखेडच्या लढाईचा अभ्यास केला जातो.... जगातल्या काही मोजक्या अतिउच्य युद्धनीतिशास्त्र म्हणून ज्या लढाया आहेत, त्यातली पेशवे बाजीराव बल्लाळ भट्ट ह्यांचा नेतृत्वाखाली लढली गेलेली पालखेड ची लढाई.. चला आज त्या बद्दल थोडक्यात जाणून घेऊ..
शत्रू : निजाम-उल-मुलूक
सैन्यबळ : 65000 सैनिक + 650 तोफखाना
वय: 55-57 च्या आसपास, अनुभवी आणि राजकारणात मुरलेला.

मराठा नेतृत्व : स्वराज्यनिष्ठ पेशवे बाजीराव बल्लाळ भट्ट
सैन्यबळ : 24000 घोडदळ
वय : 28 फक्त

पेशवे दक्षिणेच्या मोहिमेत गुंतलेले पाहून निजामाने
थेट स्वराज्याची राजधानी - सताऱ्यावर हल्ला केला,
उद्देश्य हे की थेट राजधानी वर आक्रमण केले तर पेशवे आणि छत्रपती शाहू महाराज जीव मुठीत धरून शरण येतील.

पण झाले उलटेच. पेशव्यांनी निजामाची राजधानी औरंगाबादलाच थेट धडक दिली आणि निजामाच्या समृध्द प्रदेशात लुटालुट सुरू केली.
निजामाला हे सगळे अनपेक्षित होतं. तो पुरता गोंधळून जाऊन स्वराज्यातून माघारी फिरून आपली राजधानी वाचविण्यासाठी धावला.

ह्यावेळी पेशवे केवळ 7000 घोडदळ घेऊन रोजचा 30-40 मैलांचा प्रवास करत निजामाला हुलकावणी देत त्याला स्वतःचा पाठलाग करायला भाग पाडत होते.
माहूर, जाफराबाद, वऱ्हाड, हदगाव, खानदेश, असे एकामागून एक निजामाचे मुलुखात लुटालुट करून धुमाकूळ घालत होते.

पेशवे बाजीराव नावाच्या वादळाला रोखायचे कसे ह्याचं उत्तर निजामाला सापडेना. त्याला समजेना, वाऱ्याचा वेग जास्त की मराठ्यांचा ?? निजाम आणि त्याचे सैन्य पार रडकुंडीस आले.
घळीतून, डोंगरांमधून, वाट्टेल तिथे मराठ्यांचे सैन्य चालले होते. आता पेशव्यांनी अफवा पसरवून दिली की ते बऱ्हाणपूर लुटणार.. अफवा खरी वाटावी म्हणून 1 लहानशी तुकडी बऱ्हाणपूरच्या दिशेला पाठवून दिली.

आणि मातब्बर असलेला निजाम फसला.. तो स्वतः त्याचे शहर वाचवायला धावला.
बऱ्हाणपूरच्या नजीक आल्यावर त्याला उमगले की पेशवे तिथे नव्हतेच.
आता तर तो पार मेटाकुटीस आला होता, एव्हाना त्याची रसद पण पुरवठयास येत नव्हती.

इकडे बाजीराव अफलातून डावपेच आखत नर्मदा नदी ओलांडत, निजामाचा शत्रू, मोगल सरबुलंदखानावर (गुजरात मध्ये) चालून गेले.
निजामानी वैतागून पुण्याचा मार्ग पकडला. मराठ्यांनी परत निजामाच्या मुलुखात लुटालुट करत औरंगाबाद गाठले. आता मात्र निजाम गारठला. तो पुण्यातून तळ हलवत पेशव्यांच्या पाठलागावर निघाला.
पेशव्यांचा तळ पालखेडला होता. निजामाची रसद तोडताच,आधीच गलितगात्र झालेल्या सैन्याचे मनोबल खच्ची करण्यात
यश आले. पुणतांब्या पाशी येताच पेशव्यांनी
त्याच्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. निजामाला गोदावरी ओलांडताना त्याचा तोफखाना मागेच ठेवावा लागला होता, आणि नेमके हेच मराठ्यांना हवे होते. पाणी देखील मिळणार नाही अश्या मैदानात त्यांना येण्यास भाग पाडले. रसद आधीच तोडली होती.
आता गनिमी कावा वापरात मराठे आपल्यावर कधी घाव घालतील ह्या विचाराने निजाम पार वेडापिसा झाला. शेवटी निजाम शरण आला आणि मग पेशव्यांनी आपल्या तहाच्या अटी त्याचा समोर ठेवून त्या निजामाकडून मान्य करून घेतल्या.

६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला.
तहाच्या अटी :
१. छत्रपती शाहू महाराज हे मराठा साम्राज्याचा राजा म्हणून मान्यता
२. मराठ्यांना दख्खनमधील चौथाई व सरदेशमुखी हक्क परत केला गेला.
३. मराठ्यांची देशमुखी, आपआपल्या जहागिरी परत करणे
ह्या शिवाय थकलेली महसूल रक्कम निझामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.
700 मैलाची घोडदौड मराठे सलग करत होते, न थकता, न वैतागता.. केवळ स्वराज्यासाठी, आपल्या धर्मासाठी.. कोण होती ही माणसे आपली? का आपल्यासाठी त्यांनी इतकं बलिदान दिलं? आणि आपण त्यांना काय देऊ शकतोय? निदान समाधीतरी नीट सांभाळू शकलोय का !!
कोणताही शत्रू, बाजीरावांचे नेतृत्व असलेले मराठ्यांचे चक्रव्यूह भेदू शकत नव्हता. असा हा स्वामींनिष्ठ, स्वयंभू, अजेय योद्धा पुन्हा होणे नाही.

आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की मराठ्यांची ही पालखेडची लढाई जगाच्या उत्तम रणनीती मध्ये धरली जाते.

सगळे PC : GOOGLE
You can follow @AadiShakti1010.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.