* देवेंद्र फडणवीस यशस्वी मुख्यमंत्री ठरले, असं आम्ही का म्हणतो? *
४ पक्षांची भाऊगर्दी असलेल्या महाराष्ट्रात सलग २दा १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून, आणि ५ वर्ष मुख्यमंत्री पद टिकवून, खरं तर जनतेनं वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे! तरी गेल्या पाच वर्षांतील काही ठळक मुद्दे 👇🏻
१. समृध्दी महामार्गा सारखे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मेट्रो सारखे बहुचर्चित पण रखडलेले प्रकल्प हातात घेणे, पुढे नेणे.
विदर्भ- मराठवाड्याला न्याय्य निधी वाटप.
वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पातून औद्योगिक विकासातली पिछाडी भरून काढण्याबाबत आग्रही.
नाणार सारख्या प्रकल्पासाठी आग्रह.
२.मराठा आरक्षणा सोबतच EBC शिष्यवृत्ती साठी उत्पन्न मर्यादा वाढवली, खाजगी शिक्षण संस्था आणि नेत्यांच्या गल्लेभरू संस्था, ह्यांना चाप. (बिनकामाची ८० पेक्षा जास्त इंजिनियरिंग कॉलेजेस बंद केली आहेत)
३.शहरी भागात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद आणि नियोजन. वृक्षारोपणा सारख्या कार्यक्रमाला सरकारी पातळीवरून पुढाकार. दिव्यांग नागरिकांना विशेष सुविधा मिळावी म्हणून सर्टिफिकेट.
४. जलयुक्त शिवार सारखी अभिनव योजना पुढे आणणे. सिंचनाखाली आलेल्या जमिनीत लक्षणीय वाढ शिवाय कृषी उत्पन्न विकास दर उणे ४ टक्यावरून अधिक मध्ये आणणे.
५. पीक विमा, मुबलक वीज - पाणी - खते, शेती - पूरक व्यवसायाला प्रोत्साहन, धनदांडग्यांना कर्जमाफी पासून दूर ठेवणे.
लाभार्थींना थेट बँक खात्यात मदत.
ग्राम सडक योजनेतून खेड्यांमध्ये चांगले रस्ते.
६. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सारखी अत्यंत यशस्वी आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचू शकणारी आरोग्य विषयक योजना राबवली.
अटल महा आरोग्य शिबिरे, भरवली लाखो रुग्णांना दिलासा.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुद्धा सामान्य माणसाला उपयुक्त.
- अवंतिका
#DevendraFadnavis4Maharashtra
You can follow @avantika_speaks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.