सोपं नसतं प्रतिभावंत स्त्रीवर
प्रेम करणं
कारण तिला पसंत नसते जी हुजुरी
झुकत नसते ती कधी जोवर असत नाही नात्यांमध्ये प्रेमाची भावना
तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं
कारण ती शिकलेलीच नसते नकली धाग्यात नाती गुंफणे
तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या
पाकात बुडवून
आपले म्हणणे मान्य
करवून घेणे
तिला तर ठाऊक असते बेधडक
खरे बोलत जाणे
फालतू चर्चेत पडणे,
तिच्या स्वभावात बसत नाही
मात्र तिला ठाऊक असते तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते
ती वेळोवेळी दागदागिने
कपडेलत्ते यांची मागणी नाही करत
ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने
सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती
निरागस स्मितहास्याने
तुमच्या चूकांविषयी ती तुम्हांला
अवश्य बोलणार
पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार
तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत
तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील
तिला जमत नाही कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे
पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,
झुकते जरुर पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे
आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व
उधळून देऊ शकते
धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच अशा स्त्रीवर प्रेम करावे
कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,
पुरुषी अहंकाराने,जी
पुन्हा जोडली जाऊ शकत नाही
कुठल्याही प्रेमाखातर....! कॉपीपेस्ट आहे. *पोलंड *च्या प्रसिध्द
"कवयित्री डोमिनैर"
यांची ही कविता आहे..
मराठी अनुवाद भारत यादव यांनी केला आहे..
सौजन्य चंद्रकला कदम मुंबई.
You can follow @real_amruta.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.