बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!!

संताजी आणि धनाजी यांना पाहून मोगल सैनिक घाबरत असे आणि आपल्या घोड्याला टाच देऊन पळून जात असे अश्या अर्थाचे विधान आहे. आणि ते संपूर्ण सत्य आहे . मुघल इतिहासकार, परदेशी पत्रे आणि मराठी इतिहासकार यांनी -
त्याकाळी याविषयी खुप लिहलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजाचे क्रूर हत्ये नंतर (मार्च1689 ) लयाला जाणारे मराठ्याचे राज्य मे 1690 पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते,आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व उधळले होते. यांच्या विशेषतः संताजी घोरपडेच
प्रसिद्ध लढाई यामध्ये किमान 10 मुघल सरदार मारले गेले किंवा पराभूत झाले.

1. सातारच्या लढाईत सर्जाखान

2. रायबाग हुक्केरीचा लढाईत जाननिस्सारखान,तहव्वुरखान

3. कांजीवरम च लढाईत अलीमर्दनी खान,

4.जिंजी च लढाईत झुल्फिकार खान

5.दोड्डेरी च लढाईत खानजादा खान आणि कासिम खान
6.बसवपटणं च लढाईत हमिनिदुईन खान, हिम्मत खान , सफशिखन खान, रुस्तम खान

7. खटाव सातारा जवळ ,लुत्फुल्लाखान

8. कोल्हापूर जवळ मुकर्रखान खान आणि इनायत खान

यांसारख्या कितीतरी बलाढ्य सेनापतींचा पराभव करुन आपली घोडी संताजी आणि धनाजी चौफेर उधळत होता.
खानदेशापासून जिंजीपर्यंतचे विस्तृत मैदानी युद्धक्षेत्र या दोघांच्या पराक्रमा ने गाजले होते आणि त्याचा दहशतीचा पुरेपूर वापर संताजी धनाजी यांनी केला नसता तर आश्चर्यच . धनाजी जाधव ने गुजरात पार करून भरूच वैगेरे इथे मुघल वर विजय मिळवला. नर्मदा क्षेत्रात आणि पुणे ते खानदेश मध्ये
मुघाल वर अनेक हल्ले करून उत्तरेत दबाव निर्माण केला.

बुरहानपुरच्या मुघली सुभेदाराला बादशाहकडून बांगड्यांचा आहेर मिळाला,तो या दोघांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे..मराठ्यांपेक्षा मुघलांचे सैन्य जास्त असूनही त्या सुभेदाराला पराभवाचे तोंड पहावे लागले होते..
जेव्हा राजाराम महाराज हे झुल्फिकार खानासोबत जिंजीच्या किल्ल्यावर मुरब्बी राजकारण करत होते,तेव्हा संताजी धनाजी साऱ्या दख्खन मध्ये आपली तलवार गाजवत हिंडत होता..!!

दोड्डेरी म्हणजे संताजीच्या लढाईचा परमोच्च कळस..छत्रपती शिवराय यांच्यानंतर त्याकाळात मराठ्यांच्या युद्धकलेमधे
क्रांतिकारी बदल करण्याचा मान संताजी घोरपडे यांचाच..!!

मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे.

मराठ्यांनी औरंगजेबाची आणि मोगल सैन्याची हालत इतकी खराब करून टाकली होती की औरंगजेबाच्या
अखेरच्या काही दिवसाचे वर्णन करताना मनूची लिहतो

त्याच्या छावणी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीवर दूसरी नसेल. दररोज असंख्य माणसे, जनावरे मरून एकच घाण सुटलेली असते.

जनावराप्रमाणे मेलेल्या माणसाना दोरी बांधून ओढुन नेतात आणि अंगावार असेल नसेल ते सर्व लुबाडून कोठे खड्डा दिसेल त्यात टाकून
देतात.

प्रवासी लोकात सर्वात मोठा धाक मराठयाचा

मुघलांच्या स्तुती करणारे अनेक नामांकित इतिहासकार हे दोघांची तारीफ करताना थकत नाही.

दोड्डेरीला संताजीने मोगलावर मिळविलेल्या यशाबाबत परकीय इतिहास कार लिहितात. खाफीखान व साकी मुस्तेदखान यांनी त्याकाळी महणाजे 1690 मध्ये लिहून ठेवले आहे
(थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात लिहलेले इग्रजी पुस्तकात )

" the most glorious santaji ever fought in the karnatak. This battle proved that the mavathas were mattchless in planning the battle strategy and conducting the same in the most successful manner .
He(santaji)made it clear that he was fighting against the homeland of the marathas and thus did not any grouse against those ordinary and common people in the mughal employment. Such examples are rarely found wherein a victor has shown so much of generosity and magnanimity
towards a vanguished for.

It is more delightful to note that the details of this battle come to us from the pen of Muslim historians like "saki must'ad and khaki Khan

मिर्झा मुहंमद--

औरंगजेब बादशहा च्या बरोबर मिर्झा मुहंमद हा इतिहास कार होते याला औरंगजेब बादशहा कडुन 150 ची
मनसब होते. त्याने

"तारीख मुहंमदी "ग्रंथात संताजी घोरपडे याचा उल्लेख "मुफसदाने दखन" फार्सो भाषेत च्याच मराठीत " मराठे सरदार लढवय्ये यापैकी एक श्रेष्ठ कोण व्यक्ती,"असे होते. मिर्झा मुहंमद-- आपले" तारीख मुहंमदी " मधून संताजीचा उल्लेख "'अजकबार रऊसाय मरहट्टा"' असे करून सरसेनापती
संताजीराव घोरपडे याचा विशेष अधोरेखित करतात.

मोगल दरबारातील बातमीपत्रे-- दोड्डेरीच्या लढाईत औरंगजेब याचा आयुष्यातील सर्वात मोठा पराभव होत कारण अनेक नामजाद सरदार एकट्या संताजीकडे पराभूत झाला हे बातमी औरंगजेब यास दरबारात सांगतील गेले तेव्हा औरंगजेब "जे काही घडले ते परमेश्वराच्या
इच्छेने झाले सरदारांच्या हातची गोष्ट नव्हती, संताजी जिंकला

काफीखान व साकी मुसस्तादखाना या मोगल लेखकाने सदैव मराठ्यांनी विरोधात लेखन केले पण संताजीच्या पराक्रम बद्दल काय लिहितात पहा " संताजी सर्वात मोठी यशस्वी सेनानी होता. त्याने मोगलावर दहशत बसण्याइतके पराक्रम करून ६/७ मोगल
सेनानी कैद केले, मारले घेऊन। होते. त्याच्या मुळे मोगलांना मराठ्यांचा दरारा वाटु लागला. व स्वराज्याच्या लढाईस त्याचे स्थान प्रथम व अव्वल दर्जाचे। सेनानी म्हणून आहे.

आपले इतिहासकार सुद्धा स्तुतिसुमनं बांधत आहे.

रियासतकार म्हणतात की --""विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून
शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी घोरपडे एवढा कुशल सेनानी बहुदा मराठ्यांच्या इतिहासात क्वचितच आढळतो.विरूध्दपक्षाच्या क्षणोक्षणी फिरणार्‍या योजनेस बिनतोड जवाब दयावे असे संताजीनेज 

सेतूमाधव पगडी --

सन १६९०पासून सन १६९७ पर्यत सेनापती संताजी घोरणपडे यांनी मोंगलचे कमीच यांनी
मोगलांचे कमीते कमी बारा सेनापती लोळविले " पन्हाळा च्या लढाईत मुकर्रबखान, सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान, व तहब्बुरखान , कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दाखान , जिंजीच्या लढाईत

औरंगजेब याचा मावस भाऊ झुल्पीकारखान, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व
खानजादाखान, बसवपट्टणच्या लढाईत हिमंतखान , हमीदुद्दीनखान, सफशिकखान व रूस्तुमखान अशी अनेक नाव आहेत,

संताजी घोरपडे यांनी 1689 ते 1697 पर्यंत संपूर्ण मोगल छावणीवर त्यांनी दहशत बसवली होती. शिवाजी महाराज 1680, संभाजी महाराज 1689 , हंबीरराव मोहिते 1686 महान लोकं मराठा साम्राज्याला
पोरका करून गेले. त्याशिवाय अनेक मराठा सरदार मृत्यू पडले किंवा फितूर झाले . राजाराम महाराजांना सुद्धा हजारो मैल लांब जिंजी वर 1689 ते 1697 पर्यंत अडकून राहावे लागले. अश्यावेळी औरंगझेबाच्या पाच लाख सैन्याला तुटपुंजी सैन्यानं संताजी धनाजी ल नुसते थोपवून नाही धरले तर अनेक मोठ्या
युद्धात अनेक नामांकित सरदार मारले गेले. संभाजी महाराज मृत्यू नंतर लगेचच संताजी विठोजी धनाजी ने शिखर शिंगणापूर जवळ थेट पाच लाख फौज असलेल्या औरंगझेब च छावणीवर हल्ला केला. ज्या तंबूत औरंगझेब झोपला होता ती जागा बदलली असल्यामुळे औरंगझेब च जीव वाचला. त्या तंबूच्या कळस कापून संताजी नी
ती राजाराम महाराज ना दिली. हा होता पहिला धक्का. दैव बलवत्तर म्हणून औरंगजेब त्यादिवशी संताजींच्या हाती सापडला नाही.

त्यानंतर कोल्हापूर जवळ शंभू राजांना पकडणाऱ्या मुकर्रब खाना आणि त्याच्या मुलाला हरवले त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर सर्जा खानाला संताजी धनाजी ने सातारा
जवळ रामचंद्र अमात्य आणि शंकराजी या सर्वांनी मिळून घेरले.

मराठ्या कडे तुटपुंजी फौज होती, खजिना रिकामा होता, महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी औरंगझेब च मोठी फौज महाराष्ट्रात चाल धरून होती. या काळात स्वराज्य लष्करी नेतृत्व संताजी धनाजी कडे होते. राजाराम महाराजांचे वय
आणि अननुभवी पण मुळे या दोघांना तामिळनाडू पर्यंत लक्ष द्यावे लागायचे. संताजी धनाजी दोघे शुर असले तरी स्वभावात खुप फरक होता. संताजी शिस्तप्रिय होते. संताजी वागण्यात सौम्य नव्हते. पण धनाजी मात्र सौम्य होते. एखदी चूक झाली तर संताजी कडून माफी नसायची . संगाजी धनाजी दोघे घनिष्ट मित्र
असले तरी नंतर कटुता आली. सत्ता संघर्ष कारणीभूत पण होता. दोघांना लष्करात उच्च पद हवे होते.सुरुवतीला धनाजी वर संताजी च इतका प्रभाव होता की धनाजी ने पहिल्या मुलाचे नाव संताजी ठेवले. दुर्दैवाने एका लढाईत संताजी जाधव च मृत्यू झाला.
संताजी शिस्तप्रिय होते , आणि शत्रूला माफी द्यायच्या फंद्यात पदात नसे. शंभू राजांचा क्रूर मृत्यू याला कारणीभूत होते. त्यामुळे मुघल वर याची चांगली जरब बसली होती. संताजी च तावडीत सापडणे पेक्ष लोकांनी मरण स्वीकारले . उदाहरण नामांकित मुघल सरदार कासिम खान
संगमेश्वरला संभाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील म्हाळोजी घोरपडेंना वीरमरण आल्यावर संताजींना सरनोबत नेमण्यात आलं. ह्या तालवारबाजाच्या शौर्याला कोणतीच सीमा माहिती नव्हती. गनिमीकाव्यात तरबेज असे संताजी ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिष्य होते.
त्यांच्या गनीमीकाव्यांनी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीमुळे मोगल सैन्य संताजींना जाम घाबरून होतं. कुठून येऊन संताजी नावाची संकट आपल्यावर कधी कोसळेल ह्याचा त्यांना नेम राहिला नव्हता.
माहिती चा स्त्रोत्र :-

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=231111094441&PreviewType=ebooks

लेखक आशिष माळी
You can follow @ShriRajTripute_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.