भारतभूमीचा इतिहास किती प्राचीन आहे, हे जाणून घेऊया..

शेवटचा जलप्रलय कधी झाला ह्यात खूप मतांतरे आहेत. काही पुरावे 8500, 3500, तर काही 15000 वर्षांपूर्वी असं सांगतात.
ह्या जलप्रलयच्या आधी 11 पिढ्यांचा इतिहास आपल्या कडे लिहिलेला आहे. इतिहासात पहिल्या राजाचे नाव सापडते, तो म्हणजे
राजा बर्ही. बर्हीचा 11वा वंशज म्हणजे प्रचेतस दक्ष. दक्ष-प्रसूती पासून अदिती. अदिती-कश्यप पासून विवस्वान, आणि विवस्वानचा पुत्र मनू.

ह्या मनूच्या वेळेस जलप्रलय झाला (विष्णू मस्त्यावतार) ह्या प्रलयानंतर चालू झालेल्या काळाला मन्वंतर म्हणतात. 1 मन्वंतर ते 2रे ह्यात 4 युगे येतात
वैवस्वत मनू हा 7 वा आहे. असे 6 मनू होऊन गेले ज्यांची नावं पुढील प्रमाणे : स्वायंभु, स्वरोचीष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष. पुढे 7 मनू होणार आहेत आणि त्यांची नावं पण सांगितली गेली आहेत.

4 युगं झाली की मन्वंतर होतं, म्हणजे विचार करा, 6(मनू)×4 युगे इतका प्राचीन आपला इतिहास आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी मनू आणि सप्तऋर्षीनी वसती केली. तिथेच त्यांचा वंश आणि व्यवसाय विस्तार झाला.
मनूच्या देखील पुढील पिढ्या आपल्या कडे लिहून ठेवले आहेत, त्या पुढील प्रमाणे..
मनू- इला, इक्ष्वाकू, नाभाग, धृष्णू, शर्यती, नरीष्य, प्रांशु, नाभगरिष्ट, कुरुष, पृषध्र.
मनूच्या जेष्ठ पुत्र इक्ष्वाकूने नगर वसवले. ह्या नगरीला तटबंदी होती आणि आक्रमण करणे अशक्य होतं, हीच नागरी "अयोध्या" म्हणून प्रसिद्धीस आली. पुढे कित्येक पिढ्यांचा उल्लेख सविस्तर लिहिलेला आहे.
अगदी श्रीरामापर्यंत- त्याही पुढे..
जगाच्या पाठीवर कुठल्याच देशाचा इतका प्राचीन इतिहास नाही किंवा तश्या नोंदी पण कुठेही नाही.

भारतभूमी सर्वश्रेष्ठ आहे. जे ह्या इतिहासाला mythology म्हणतात, त्यांनी दुसऱ्या कुठल्याही देशाचा इतका प्राचीन इतिहास आहे का, इतक्या वंशावळी आणि माहिती आहे की ते पहावे.
You can follow @AadiShakti1010.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.