वारकरी आणि दर्गा...♥️🇮🇳
पैठण हे संत एकनाथ महाराजांचे गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले व एकेकाळी सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान उर्फ पैठण गावातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला अनेक लोक येतात.
संत एकनाथ महाराजांची समाधी असलेल्या ह्या गावात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे जिथे हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा आणि सलोखा बघायला मिळतो.

पैठणमधील हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण वारीसाठी जाणाऱ्या किंवा
नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या ह्या दर्ग्यामध्ये थांबतात.
त्यांच्या निवासाची व्यवस्था ह्या दर्ग्यातच केली जाते आणि ह्या दर्ग्याची व्यवस्था सांभाळणारे मुस्लिम बांधव दिंडीत व वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची अतिशय प्रेमाने व उत्साहाने सेवा करतात, त्यांचा यथायोग्य पाहुणचार करतात.
तसेच वारकरी सुद्धा ह्या दर्ग्यात आल्यावर, तिथल्या मुक्कामात ह्या दर्ग्याची मनोभावे पूजा करतात, उपासना करतात.मुस्लिम बांधवांकडून दिंड्यांना शिधा दिला जातो आणि इथल्या वस्तीत दिंडीतील भाविकांना भोजन दिले जाते. ह्या दर्ग्यात नमाज सुद्धा होतो आणि भजन सुद्धा होते.
ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते तेव्हा वारकरी आपले भजन थांबवतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी पुन्हा भजन सुरु करतात.
हा दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जे लोक इथे येऊन एकनाथ महाराजांचे दर्शन घेतात ते दर्ग्याचेही दर्शन घेतात
आणि जे लोक दर्ग्यात येतात ते लोक एकनाथ महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत अशी इथली परंपरा आहे.

असे म्हणतात की नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराज येथे २४ वर्ष वास्तव्याला होते आणि त्यांनी त्या काळात येथे नदीतून पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली.
इथले मुस्लिम लोक जसे त्यांच्या धर्मगुरूंना मानतात तसेच एकनाथ महाराज व कानिफनाथ महाराजांनाही मानतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि अजूनही ती इथल्या लोकांनी कायम ठेवली आहे.त्यांच्या धर्मगुरूंनी व एकनाथ महाराजांनी इथल्या लोकांना सलोख्याने राहण्याची,
एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली.
सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र चालण्याची शिकवण दिली ती अजूनही इथले लोक उत्साहाने पाळताना दिसतात.
पैठणमधील ही “सलोख्याची वारी” बघून खरंच इथल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले “भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” आत्मसात केले आहे म्हणूनच हे लोक एकमेकांचा, एकमेकांच्या श्रद्धांचा व धर्माचा आदर करून वागताना बघून मनाला आत्मिक समाधान मिळते.
हीच शिकवण जगातील सर्वच लोकांनी आत्मसात केली आणि ह्या बांधवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर जगातील निम्मे प्रश्न अगदी सहज सुटतील.
@SahilVastad @RahulPustode @santosh_shindey @Liberal_India1 @ruturajdyp @Rutuja0304 @prash_dhumal
@SufiCulturalOrg
#वारकरी #sufism
You can follow @Mustafaj7272.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.