⚫ शी जिनपिंग

चीनमध्ये माओ नंतर सगळ्यात शक्तिशाली नेता जर कुणी असेल तर ते नक्कीच जिनपिंग आहेत. ज्या कल्ट पर्सनॅलिटीमुळे शी ने आपलं अख्खं परिवार कल्चर रिव्हाल्यूशन मध्ये गमावलं त्याच वाटेवर ते आहेत. पुतीननंतर जगात सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती म्हणून शी नां पाहिलं जातयं.
पुतीनंच्या उदयापेक्षा जिनपिंगची कहाणी फारच विस्मयकारक आहे. डेंग झाओपिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांविरूध्द कल्चर रिव्हाल्यूशन सुरू केलं होतं त्यावेळी शी अवघ्या 15 वर्षांचे होते. त्यांचे वडील सधन कुटुंबात गणले जायचे ते चायनीज कम्युनिस्ट पार्टी प्रोपंगडा टिमचे हेड होते.
Xi Zongxan यांची ओळख मोठी होती पण ते डेंग झाओपिंग च्या समर्थनार्थ होते. कल्चर रिव्हाल्यूशन वेळी त्यांना पकडून जेलमध्ये डांबण्यात आलं. शी च्या आई Qi Xin यांची गावात परेड करण्यात आली त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं त्यावेळी कशे बसे शी वाचले त्यांनी घर सोडलं नंतर ते गुहेत राहायचे.
त्यांनी कम्युनिस्ट पार्टीत सहभागी होण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांच्या हाती निराशा आली. पण शेवटी 1974 मध्ये त्यांना कम्युनिस्ट पक्षात प्रवेश मिळाला. आधी त्यांना अतिशय दुय्यम वागणूक दिली जायची तरीही त्यांनी सांभाळून घेतलं होतं. ( हे शींच्या लहानपणीच्या लोकांच्या नोंदी आहेत.)
शींना चार महत्त्वाच्या प्रोव्हिन्स मध्ये संधी मिळाली त्यांनी त्या संधीचे सोने करत अँटी करपश्न मोहीम राबवली. त्यामुळे त्यांना महत्त्व प्राप्त झाले. अनेकांना तुरुंगात धाडलं. त्या परिणामी शींना कम्युनिस्ट पार्टी डेप्युटी सेक्रेटरी म्हणून फुजियानला पाठवण्यात आलं.
नंतर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना सेक्रेटरी पदाची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपलं इमेज अँटीकरप्ट लीडर म्हणून ठेवण्यात यश मिळवलं. अतिशय प्रामाणिक नेता म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांना कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरो कमिटीत
निवड झाली. पॉलिट ब्युरो ही कम्युनिस्ट पक्षातील सगळ्यात महत्त्वाची समिती आहे. या कमिटीत त्यांच्या प्रवेशानंतर त्यांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. माओच्या तत्वज्ञानात थोडं फार मार्क्सिस्ट लेनिन्सिट तत्त्वज्ञान घालून अग्रेसिव इकॉनॉमिक प्रश्नांची मांडणी सुरु केली.
त्याचा परिणाम म्हणून त्यांची निवड कम्युनिस्ट पक्षातील सगळ्यात शक्तिशाली पॉलिट ब्युरो स्टँडिंग कमिटीत निवड झाली. ही स्टँडिंग कमिटी फक्त 'सात' जणांची असते ते फक्त राष्ट्रपतींना सल्लागार म्हणून कार्यरत असतात. या कमिटीनंतर एकच मोठं पद उरलेलं असतं - जनरल सेक्रेटरी ऑफ कम्युनिस्ट पार्टी
चीनमध्ये जितके राष्ट्रपती होऊन गेले त्या प्रत्येकाने प्रभाव पाडलाच असेही नाही पण ज्या राष्ट्रपतींकडे चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदाचीही धुरा होती त्या सगळ्यांनीच आपलं प्रभाव पाडला. जनरल सेक्रेटरी हे पद चीनमधील सगळ्यात शक्तीशाली पद आहे.
शींची नजर फक्त त्याच पदावर होती. पॉलिट ब्युरो कमिटीत त्यांनी आपलं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याचाच परिणाम म्हणून चीनी राष्ट्रपती हू जिंताओ यांनी 2008 ला शी जिंनपिंग यांना उपराष्ट्रपती पदी नियुक्ती केली.
हू जिंताओ यांना ' Paramount leader ' म्हणून ओळखले जायचे.
त्यांच्या कार्यकाळात बीजिंगची प्रगती समाधानकारक होती पण स्वतःच्याच रिझर्व्ह बँकातून गंगाजळी काढून अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर आणून ठेवली होती. त्यांना आपल्या सक्षम, शक्तीशाली, प्रामाणिक व विलक्षण उत्तराधिकाऱ्याची गरज होती जी फक्त आणि फक्त शी जिनपिंग यांच्यात दिसून यायची.
2013 ला शी जिनपिंग यांच्या हातात राष्ट्रपती पदाचा कार्यभार आला. त्यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदी वॉग कुशियान यांना निवडलं.
त्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की माओं प्रमाणे कल्ट पर्सनॅलिटी वर कार्यक्रम न राबवता सुधारणावादी कार्यक्रम हाती घेतील आणि सामान्य रित्या
ते कल्ट पर्सनॅलिटी व्यवस्थेचे स्वतः एक बळी होते त्यामुळे या पासून लांब राहण्याचेच धोरण ते राबवतील याची सरासर अपेक्षा होती. पण त्यांनी सगळ्यांच्या अपेक्षे विरुद्ध जात त्यांनी स्वतः कडे Power Consume करायला सुरुवात केली. पॉलिट ब्यूरोत स्वतःच्या मर्जीतील लोकांना बसवले गेले.
चीनमधील जुना कायदा Intelligence law वर अग्रेसिव रित्या अमंलबजावणी केली. कोणत्याही कंपनीला चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या सहकार्याशिवाय चीनमध्ये व्यापार करता येत नाही. हुआवेई सारखी कंपनी जी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे ती याच इंटेलिजन्स कायद्यामुळे आहे. शांघाय मधील अनेक कंपन्या या
संपूर्ण पणे कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणात आहेत. हुआवेईचे मुख्य कार्योलय कुठे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक जाणकार इंटेलिजन्स कायद्याचा वापर कसा करायचा याचा अभ्यास शीं कडून इतर चायनीज नेत्यांनी करावी अशी टिप्पणी करतात. त्यांनी या कायद्यांना अँटीकरप्शन कायद्याची जोड दिली
त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांवर बोलण्याची हिम्मत कुणी करत नाही. आपल्या भविष्यातील स्पर्धकांना या अँटीकरप्शन कायद्यात अडकवून स्वतःचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे शीं विरोधी आवाज पक्षातंर्गत आणि पक्षाबाहेरही संपूर्ण पणे दाबला गेला. 2013 नंतर 'लिटल बट इफेक्टीव' अंतर्गत मिलीटरी
रिफॉर्म्स केले गेले. या अंतर्गत मोठ्या संख्येने सैनिकांची तैनाती करण्यापेक्षा त्यांना उत्तम साधनांची परिपूर्ती करणे हे महत्त्वाचे सैन्य धोरण ठरवले गेले. साऊथ चायना सी मध्ये अग्रेसिव धोरण अवलंबणे, OBOR, CPEC, इतर आफ्रिकन, एशियन बंदरात गुंतवणूक करणे, WTO मध्ये महत्त्वाचा रोल घेणे
यासारखे अनेक धोरण बदल अवघ्या काही वर्षांत केले. काही वर्षांत याचा परिणाम दिसू लागला चीन विकासात्मक दृष्टया अग्रेसर झाला. आता कम्युनिस्ट पक्षात कुणीच अंतर्गत विरोधक उरला नव्हता त्यामुळे त्यांना तह्यात अध्यक्ष बनण्याची उत्तम संधी असल्याचे जाणवले.
1982 चा फक्त दोन अध्यक्षीय कार्यकाल असण्याचा बंधन असलेला ऐतिहासिक कायदा 2018 ला बदलून आपल्या मार्गाचा मोठा काटा बाजूला केला. आता ते तह्यात अध्यक्ष राहतील. पण ते तितक्यावरच न थांबता पुढे जाऊन चेअरमन ऑफ द सेंट्रल मिलिटरी कमिशन पदाची धुरा घेतली. त्यासोबत ' Paramount leader ' झाले.
नॅशनल सिक्युरिटी कमिशन या अतिशय महत्त्वाच्या संरक्षणात्मक संस्थेचे अध्यक्ष पदही स्वतः कडे घेतले त्यामुळे त्यांच्या नंतरही ते आपल्या मर्जीनुसार कोणाही डमीला बसवू शकतात. सोशल & इकॉनॉमिक कमिटीचे अध्यक्ष पदही स्वतः कडे घेतले. यामुळे Mass Survivalnce वरही अप्रत्यक्षपणे शींचे नियंत्रण
आहे. शी जिनपिंग यांच्या विचारांना कम्युनिस्ट पार्टीच्या संविधानात आणि देशाच्या संविधानात लिहण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत चीनमध्ये एकाही सामान्य नागरिकांला शीं विरुद्ध बोलता,लिहता येत नाही. प्रत्येक प्रॉव्हिन्स मध्ये एका Survivalnce कमिटीची स्थापना केली.
जाणकारांनुसार जागतिक राजकारणात अमेरिकेचे स्थान घेणे, माओ सारखी ओळख निर्माण करणे हा शींचा एकमेव उद्देश आहे.
त्यामुळेच शी जिनपिंग हे पुतीननंतर जगातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

Borrowed points : Alice Ekman's Book ( China in the World )

#IRmarathi
____________
You can follow @prathameshpurud.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.