तरीही महाराज secular???

जय शिवराय, आजचे #शिव_दिनविशेष उपलब्ध नाही आणि खालील माहिती देण्याचेही काही खास कारणही नाही पण गुरुवर्य मेहंदळे सरांनी केलेलं संभाषण ऐकून त्यातील काही निवडक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

१/१५
शिवकाळाआधी आणि नंतरही हिंदूंना त्रास देणे आणि हिंदूंना संपवणे हाच हेतू घेऊन हे इस्लामी राज्यकर्ते हिंदुस्तानात आले होते, ह्यात काहीच शंका कुणालाही नसावी.
जिझिया कर ऐकला असेल तर त्यातील फक्त २ कलम सांगतो, बाकी त्याबद्दल स्पेशल धागा नंतर लिहिन.

२/१५
त्यावेळी फक्त हिंदूंना दोनच पर्याय होते.
१. इस्लाम धर्म स्वीकारा किंवा
२. मृत्यू

त्यामुळे हिंदू संपतील असा विश्वास त्यावेळी येणाऱ्या इस्लाम राज्यकर्त्यांना होता.
जिझिया कर मधले २ कलम खाली सांगून आजून एक मूळ उद्देश सांगणार आहे.

३/१५
पहिला: जिझिया कर देणाऱ्याने कर देताना घुडघ्यावर बसून कर द्यावा आणि घेणारा निवांत बसून राहणार.
दुसरा: एखाद्या इस्लामी सरदाराला हिंदूंच्या तोंडात थुंकायचे असल्यास हिंदूने मुकाट आपले तोंड उघडून थुंकायला द्यावे.

इतकी कठोर वागणूक हिंदुस्तानात येऊन फक्त हिंदूंनाच होती.

४/१५
ह्याव्यतिरिक्त हिंदूंच्या भक्ती भावनेशी खेळायचे सुद्धा कृत्य सुरू झाले होते.
#मूर्तींचे_भंजन हे दुसरे मूळ उद्देश ह्या इस्लामी राज्यकर्त्यांचे होते. मूर्ती भंजन म्हणजे आपल्या देवी देवतांच्या मूर्ती फोडणे, विटंबना करणे, मंदिरे उध्वस्त करणे.

५/१५
काही राज्यकर्त्यांनी केलेली निश्कृत्य खाली मांडत आहे.

१. पैगंबर
मक्केच्या जवळ एक मोठे प्रार्थनास्थळ होते ज्याला काबा म्हणत. त्यातील ३६० मूर्ती पैगंबरने फोडल्या आणि आसपासच्या परिसरातील ही मूर्ती फोडल्या.
हेच उदाहरण घेऊन पुढे एक एक हैवान येत राहिले.

६/१५
२. मोहम्मद घौरी
पृथ्वीराज चौहाणांचा पराभव करून गझनीला परत गेला पण त्याचा प्रतिनिधी कुतुबुद्दीन ऐबतला इथे ठेवला होता. घौरी मेल्यानंतर ऐबतने इ.स. ११९२ ला दिल्लीमध्ये मशीद बांधली आणि त्यावर शिलालेख मध्ये लिहिलंय की २७ बुधखाण्याचे साहित्य वापरून ही मशीद बांधली आहे.

७/१५
बुधखाना म्हणजे मूर्ती मंदिर.
त्याला कुवतू इस्लाम म्हणत. ह्या अश्या गोष्टी करण्याची कुवत.

३. मोहम्मद बखतीयर खिलजी
इ.स. १२०२ मध्ये खिलजीने बिहार मधली मोठी बुद्धविहार पाडली होती. आसपासच्या लहानमोठया विहार ही पाडल्या होत्या. मिन्हाज लिखित तबाकत-इ-नासिरी मध्ये उल्लेख आहे.

८/१५
४. इलतुतमिश
उज्जैनला बारा जोतिर्लिंगांपैकी एक असे महाकालेश्वर मंदिर पाडले आणि मंदिरातील पिंड दिल्लीला घेऊन आला.
ती पिंड जामा मशिदीपुढ्यात टाकली ज्यानेकरून येणाऱ्या जाणाऱ्यानी तुडवावी. हा ही उल्लेख मिन्हाज लिखित तबाकत-इ-नासिरी मध्ये आहे.

९/१५
५. फिरोजशहा तुघलक
जगन्नाथपुरीच्या मंदिरातील मूर्ती फोडून दिल्लीला घेऊन आला आणि निरनिराळ्या मशिदींपुढे वाटेत टाकल्या.
ह्याचा उल्लेख शम्स-इ-सिराज-अफिफ लिखित तारीख-इ-फिरोजशाही ह्या ग्रंथात आहे.

१०/१५
६. बाबर
अयोध्येच्या राम मंदिराची गोष्ट वाचकांना नवीन नाही.
म्हणून जास्त सांगत नाही.
पण ग्वालिअरचा किल्ला काबीज करून जैन मूर्ती पाडल्या, विटंबना केली आणि ह्याचा उल्लेख स्वतःच्या ग्रंथात म्हणजे बाबरनामा मध्ये लिहून ठेवला आहे.

११/१५
७. शहाजहान
इ.स. १६३४ मध्ये लाहोरचे गुरुद्वारा पाडले ह्याचा उल्लेख शीख साधनांमध्ये सापडतो.

८. औरंग्या
इ.स. १६४५-४६ मध्ये अहमदाबाद मधील शांतीदास नावाच्या माणसाने बांधलेले जैन मंदिर पाडले.

१२/१५
ह्या मंदिराचा वर्णन एका मेंडल्स लो नावाच्या जर्मन प्रवाशाने मंदिर पाडायच्या आधी केलेला आहे.

इ.स. १६६९ मध्ये काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडून पुन्हा हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचे कृत्य केले आणि त्याजागी मशीद बांधली.

१३/१५
पुढे जेव्हा मराठ्यांचे स्वराज्य वाढले तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनी त्या मशिदीच्या शेजारी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा स्थापन केले आणि आता जे मंदिर आपण बघतो ते हेच मंदिर.

१४/१५
पुढे इ.स. मार्च १६७९ ते ऑगस्ट १६८० मध्ये ३०० हुन अधिक मंदिरे पाडली, ज्याचा उल्लेख मासिर-इ-आलमगीर मध्ये आहे.

आता हे सगळं वाचून मला तरी निश्चित उत्तर मिळाले की महाराजांनी #हिंदवी_स्वराज्य का स्थापन केले आणि ते #secular तर मुळीच न्हवते.

१५/१५
You can follow @The_Lion_RS.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.