मजिद माजीदीचा मुहम्मद सिनेमा आणि त्यावर येवू घातलेली बंदी

2015 मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली. 1/n

#MusingOfAMuslim
आणि मग गृहमंत्र्यांनीही केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनावावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे. 2018 मध्ये हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार होता, तेव्हा दोन गोष्टी झाल्या. 2/n
एक म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले म्हणून रझा अकॅडमीने रहमान विरुद्ध फतवा काढला. (रहमानने त्याविरुद्ध जे पत्र प्रसिद्ध केले ते वाचण्यासारखे आहे.) 3/n
या रझा अकॅडमीने काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात प्रदर्शन केले होते. त्यानंतर तिथे जमलेल्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य मुस्लिमांना आजही आपल्या मान खाली घालाव्या लागतात.

4/n
रझा अकॅडमीची पार्श्वभूमी ही अशी आहे. ती गृहमंत्र्यांना माहीत नाही काय? या अशा संघटनेला पॅट्रोनाइज का करावे वाटते पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारला?

अशा संघटना मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतात असा समज समाजाने आणि शासनाने करून घेतला असेल तर तो वस्तुस्थितीला धरून नाही.
5/n
हा गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लीम समाजाने याविषयी व्यक्त व्हायला हवे. तुमच्या राजकीय- सामाजिक प्रश्नांवर कायम यांच्या धार्मिक प्रश्नांनी कडी केली आहे.
6/n
जोवर ही मुल्ला मौलवी तुमच्या अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करत असतील, तोवर तुम्हाला मला भविष्य नाही हे लक्षात घ्या. या गोष्टींचा आणि संघटनांचा विरोध करा.

7/n
आता मूलभूत मुद्याकडे येतो. इस्लाममधील काही पंथांमध्ये पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे चित्रण आज निषिद्ध मानले जाते. (आज शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण या सर्वांचे चित्रण केलेली अनेक चित्रं मुस्लिम कलाकारांनी काढली आहेत मध्ययुगात. ती सर्व ऑनलाईन उपलब्ध आहेत.) 8/n
या सिनेमात पैगंबरांचा चेहरा वगैरे दाखवण्यात आलेला नाही, कारण सिनेमा त्यांच्या जन्मापर्यंतच आहे. सिनेमाचे दोन भाग अजून येणार आहेत.

मजिद माजीदीच्या प्रतिभेविषयी आणि त्याच्या चित्रपटाविषयी विस्तारभयामुळे लिहिणं टाळतोय. 9/n
मजीदीने हा सिनेमा बनवला कारण त्याला मुहम्मद पैगंबराचे पॉप कल्चर मध्ये होत असलेले विकृतीकरण थांबवायचे होते, त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करायचे होते. त्यामुळे अतिशय कष्टाने त्याने हा सिनेमा बनवला. चित्रपटाला संगीत देण्यामागेही रेहमानची भूमिकाही काहीशी अशीच होती. 10/n
सिनेमाला इराण सरकारकडून सहकार्य मिळाले. मुहम्मद Trilogy तील हा पहिला सिनेमा आहे, आणखी दोन यायचे आहेत. (या भागात पैगंबरांच्या बालपणापर्यंतचं अरबी जीवन दाखवले आहे.) इराण शिया बहुल देश. शियापंथीय पैगंबर आणि त्यांचे सहकारी (विशेषतः अली) यांच्या चित्रणाविषयी काही अंशी लिबरल आहेत. 11/n
भारतात सुन्नी बहुसंख्य आहेत, जवळपास 80-85 टक्के. सिनेमा आला तेव्हा किंवा आत्ताही या सिनेमविरोधात त्यांनी काही आक्रीत केल्याचे ऐकिवात नाही. 12/n
असे असूनही रझा ऍकॅडमी सारख्या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या संघटनेच्या मागणीवर प्रोऍक्टिव्ह व प्रॉम्प्ट भूमिका घेणाऱ्या शासनाचा विरोध व्हायला हवा तो अशा संघटनांचे प्रतिनिधित्व मुस्लीम समाजाच्या माथी मारण्यासाठी आणि या जमातवाद्यांचे हात बळकट करण्यासाठी.

13/n
यांच्या मिस्ड प्रायोरिटीजचा भुर्दंड मात्र सामान्य मुस्लिमांना भोगावा लागतोय (या निमित्तानेही भोगावा लागेल). मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्यांवर भूमिका घेण्याऐवजी या असल्या मुल्ला मौलवींपुढे लोटांगण घातले की मुस्लिम सुखावतील, आणि स्वस्तात काम होईल ... 14/n
ही पूर्वापार चालत आलेली कुप्रथा या सरकारने बंद करावी, ती बंद करायची जबाबदारी सुशिक्षित आणि तरुण मुस्लिमांची आहे, त्यामुळे मुल्ला मौलवींची तळी उचलणाऱ्या सरकारच्या या भुमिकेविरोधात त्यांनी भूमिका घ्यायला हवी, निषेध करायला हवा.

15/n
पैगंबरांचे चित्रण करणे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे, इतरांनी ते केले तर त्यावर यांनी आक्षेप घेणे अनैतिक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजाने अशी जबरदस्ती धुडकावून लावायला हवी.

16/n
सुन्नी मुस्लिमांच्या, मुल्ला मौलवींच्या भावना दुखावणार असतील तर त्यांनी सिनेमा बघू नये, त्यांच्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही, तसा कोणता कायदाही नाही. मात्र इतरांनीही तो बघू नये हा आक्रस्ताळेपणा कशासाठी?
17/n
सलमान खानच्या सिनेमाने माझा इंटलेक्ट दुखावला जातो, म्हणून तो इतर कुणीच बघू नये, अशी मागणी मी माननीय गृहमंत्र्यांकडे केली तर ते तातडीने केंद्राला पत्र लिहिणार काय?
18/n
माझ्या भावना एखाद्या सिनेमामुळे दुखावतात म्हणून इतरांनीही तो बघू नये यासाठी शासनावर दबाव आणाणे, नाहीतर कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा इशारा देणे हा सांस्कृतिक दहशतवाद नाही काय? (हमाम में सभी नंगे है, इतर धर्मियांनी आणि पंथीयांनीसुद्धा हेच केले आहे, कितीतरी उदाहरणे आहेत.)

19/n
हा सिनेमा मी पाहिला आहे, तो ऑनलाईन उपलब्ध आहे. सरकारने ऑनलाईन रिलीजवर बंदी आणली तर या निर्णयाचा प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी, मजीद माजिदी आणि रहमानच्या चाहत्यांना हा सिनेमा पाहता यावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

- हाजी समीर दिलावर शेख.

#MusingOfAMuslim

20/20
You can follow @sameer7989.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.