किल्ल्याविषयी काही महत्वपूर्ण संकल्पना
१. घेरा- किल्ल्याच्या परिघात असणारा प्रदेश
२. मेट- डोंगरउतारावरच्या सोंडावर डोंगराच्या मध्यभागी कायमस्वरूपी घरे बांधून तिथे पहारेकरी तैनात केले जात त्या चौकिनाक्याला मेट म्हणत
३. अर किल्ला/अरक किल्ला- भुईकोटामधे असणारा आतील छोट्या आकाराचा
किल्ला
४. लादनी- तटबंदीवरुण गस्त घालण्यासाठी/चालत जाण्यासाठी फाँजीच्या कटकोणात असलेला फरसबंदी मार्ग
५. अगळा- दुर्गाच्या दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूस कड़ीसारखे आडवे घाटलेले लांब रुंद लाकुड़ किंवा एखाद्या झाडाचे खोड
६. जिभि-दरवाजाच्या बाहेरून दुर्गाच्या आत काय चालले आहे ते दिसू नये
म्हणून दरवाजासमोर काही अंतरावर बांधलेली संरक्षनात्मक भिंत
७. रेवनि- खंदक आणि उंचवटा यांच्या दरम्यान असलेल्या सपाटिच्या भागाला आणि उंचवट्याला रेवनि किंवा रेवण म्हणत
८. अलंगा- दुर्गावर तैनात केलेल्या सैन्यासाठी/लोकांसाठी बांधलेल्या झोपडीवजा घराना अलंगा म्हणतात
९. रणमंडल- भुदुर्गात मुख्य प्रवेशद्वार भक्कम बांधनीच्या दोन बुरुजामधे बांधलेले असते आणि तो दरवाजा बाहेरून तोफा बंदुकाच्या माऱ्यात येऊ नये म्हणून संरक्षनासाठी आडोसा देनारे तट बुरुजांचे बांधकाम
१०. इटा- बांधकामासाठी वापरन्याच्या वीटा
११. इळा- विळा
१२. खासबाग- क्रिडेसाठी निर्माण
केलेली बाग़
१३. खंबीर- बांधकामासाठी वापरन्याचा घाणित मळलेला चुना
१४. गडकोंन- गडाच्या अरणीवरुण पुढे डोकावणाऱ्या प्रचंड शिळा
१५. गोंडा- भिंत बांधनारा कारागिर
१६. घाटगस्ती- नियमित वेळेवर चालणारा फिरता पहारा
१७. चिरे- बांधकामासाठी सर्व बाजुनि तासुन घडविलेले दगड
१८. दिवानवाडा- राजाचा
गडावरील वाडा
१९. धबधबा- गडांच्या डोंगरावरील पाणलोट
२०. पनाळि- पाणी वाहून नेण्यासाठी केलेली खोलगट वाट
२१. बालंगरेज- छपराच्या पुढे आलेला भाग व भिंत यामधील जागा किवा वळचन
२२. बेलदार- दगड तासनारा कारागिर
२३. बंक- ओसरी
२४. मगर्बिवी- दगड फेकन्याचे यंत्र
२५. ईस्तादेची घरे- चुण्याचे
पक्के बांधकाम असलेली घरे
२६. चरक्या- बाण
२७. भांडे निववायच्या कुंच्या- तोफेतून बार उडऊन झाल्यावर तिचे तापमान कमी कमी करत थंड करण्यासाठी तयार केलेली खोळ
२८. कीट- जळके लोखंड
२९. रेजगिरि- तोफा बंदुकामधून उडविण्यात येणारे धातुचे तुकडे हे बहुतेक शिशाचे असत
३०. जामग्या- तोफा/बंदुकामधील
दारुला बत्ती देण्यासाठी वापरलेली वात/तोडा/काकडा हा सुतळीचा असे
३१. काने- तोफा बंदुकामधे ठासलेल्या दारुला शीलगावन्यासाठी केलेले छिद्र
३२. सामते- छिद्र पाडण्याचे यंत्र
३३. उपराळा- कुमक किंवा गडोपोयगी कोणत्याही प्रकाराची मदत
३४. माळा- जंगलातल्या वेलींच्या मध्यम विनीच्या एक
प्रकारच्या शिड्या
३५. नारळ- कमी वजनाच्या तोफा
३६. वोघ- पाण्याचा स्त्रोत/झरा

पुढील वेळी कोणत्याही किल्ल्याला भेट दिल्यास यापैकी किती जागा सापडतात ते पाहा. तेथील कोणी जाणकार असेल तर त्यांना विचारा या जागेबद्दल. नवीन माहिती नवीन उत्साह निर्माण करते.
You can follow @KaduAmol.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.